बाथरूमच्या आतील किंवा बाहेरील पायपुसणी, बारदान देखील आपल्या आरोग्याचे नुकसानकारक ठरू शकतात. आपल्या सर्वांच्या घरात पायपुसणी असतात, विशेषत: बाथरुमच्या बाहेर किंवा आत, त्यांची साफसफाई न केल्यामुळे ते रोगाचे कारण देखील बनू शकतात. ई-कोलाय नावाचा जीवाणू तुमच्या त्वचेवर येऊ शकतो. यामुळे त्वचा संक्रमण, पुरळ, खाज आणि इतर त्वचा रोग होऊ शकतात. रोग टाळण्यासाठी, आपण बाथमॅट स्वच्छ ठेवायला हवी आणि त्यातून होणारे रोग टाळण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरायला हव्यात. डर्मेटोलॉजिस्ट डॉ देवेश मिश्रा यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे.
घाणेरड्या पायपुसणीमुळे आरोग्यावर कसा परिणाम होतो?
आपण बाथरूम स्वच्छ करतो परंतु बाथरूम मॅट किंवा बारदान साफ करायला विसरतो. अशावेळी खराब झालेल्या पायपुसणीच्या माध्यमातून त्वचेवरचे आजार पसरण्याची दाट शक्यता असते. गलिच्छ बारदान वापरल्याने खाज सुटणे, जळणे, त्वचा कोरडी होणे, पाय लाल होणं अशी लक्षणं दिसू शकतात.
रिंगवर्म रोग पायांच्या बुरशीजन्य संसर्गामुळे होऊ शकतो. घाणेरड्या मॅट्समुळे नखांना संसर्ग देखील होऊ शकतो. जर पाय वारंवार ओल्या मॅटच्या संपर्कात आले तर नखं लाल होऊ शकतात किंवा त्यांना संसर्ग देखील होऊ शकतो. गलिच्छ किंवा ओल्या पायपुसणीमुळे तुमच्या पायाला एक्जिमा होऊ शकतो. एक्जिमा या त्वचेच्या आजारात बारीक बारीक पुळ्या येऊन त्या भागावर तीव्रतेनं खाज येते.
खराब पायपुसणीमुळे होत असलेल्या आजारांपासून बचावाचे उपाय
घरात दोनपेक्षा जास्त बाथरूम मॅट्स ठेवावेत, जेणेकरून तुम्हाला खराब झालेली पायपुसणी बदलता येईल.
जर तुमच्या घरात जास्त लोक असतील तर पायपुसणी दररोज धुतली पाहिजे.
पायपुसणीवर आपण फक्त ओले पाय पुसा, पाय घासू नका. असे केल्याने संक्रमणाचा धोका कमी होईल.
बाथरूममॅटला बाथरूमच्या आत न ठेवता बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात ओलावा वाढणार नाही.
पायपुसणी धुण्याआधी त्यावरची माती साफ करून घ्या, त्यासाठी पायपुसणी कोरडी असताना ब्रशच्या मदतीनं माती साफ करा.
माइक्रोफायबर क्लोथच्या मदतीनं तुम्ही चिकटलेली मातीसुद्धा काढू शकता. नंतर एक बादली पाण्यात डिर्टेजंट घालून ढवळून घ्या. पायपुसणी या पाण्यात घालून ठेवा आणि काहीवेळानंतर बाहेर काढून स्वच्छ धुवा.
यावेळी डिस्इंफेक्टंट्सचा वापर तुम्ही करू शकता. धुवून उन्हात सुकवल्यानंतर पाय पुसणीतील बॅक्टेरियाज निघून जाण्यास मदत होईल.
उपाय
जर तुम्हाला गलिच्छ मॅट्समुळे पायाला संसर्ग झाला असेल तर तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. बेकिंग सोडा बुरशीजन्य संसर्गाची समस्या दूर करतो. एका बादलीत अर्धा कप बेकिंग सोडा टाकून त्यात पाणी घाला, आता पाय या पाण्यात बुडवून ठेवा, 20 मिनिटांनी पाय धुवून कोरडे करा. पायाला संसर्ग झाला असेल तर तुम्ही नारळाचे तेल लावू शकता, त्वचेसाठी नारळाच्या तेलाचे फायदे असंख्य आहेत. लक्षणं जास्त दिसत असतील तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.