Join us   

अगं तू किती स्लो जेवतेस! हळूहळू जेवण्याची सवय कितपत चांगली? पाहा जेवण्याची योग्य पद्धत 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 11:50 AM

Slow Eating Habits Good Or Bad : जेवण व्यवस्थित चावून खात आहात खात्री करा यामुळे जेवणातील पोषक तत्व शरीराला पुरेपूर मिळतात.

जेवणाची (Eating Habits) पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. काहीजण  खूप भराभर खातात तर काहीजण प्रत्येक घास चावून चावून हळूहळू जेवण करतात. (Slow Eating Benefits) अभ्यासातूनही याचे फायदे दिसून आले आहेत. जेवणाच्या पद्धतीवर  बरंच काही अवलंबून असते. जसं की वजन वाढणं किंवा कमी होणं हे तुम्ही काय खाता याच बरोबर कसं याता यावर निर्भर असते. (What Is Right Way To Eat Food)

वेब एमडीच्या रिपोर्टनुसार हळूहळू जेवल्यानं तुम्ही नेहमीपेक्षा कमी खाता आणि जेवताना आनंदाचा अनुभव येतो. तुम्ही जेवताना चांगले संगित ऐकू शकता टिव्ही किंवा मोबाईल पाहत जेवणं टाळा कारण त्यामुळे तुमचं लक्ष विचलित होऊ शकतं (Ref). खरं पाहता हळूहळू जेवणं आणि प्रत्येक घास व्यवस्थित चावून खाणं खूप कठीण आहे. पण नियमित हळू जेवल्यास याची तुम्हाला सवय होईल.

हाडं कमजोर झाली? पोकळ हाडांना कॅल्शियम देतात इवल्याश्या बिया; चमचाभर खा-निरोगी राहा

जपानमध्ये झालेल्या एका अभ्यासात दिसून आलं की स्लो खाणाऱ्या लोकांचे वजन पटकन वाढत नाही. त्यांचे ओव्हरवेट व्हायचे चान्सेस कमी असतात तसंच  त्यांचा बीएमआय मेंटेन राहतो. वेस्ट सर्कमफेरंस म्हणजे मागचा भाग जास्त वाढत नाही आणि तिथे फॅट डिपॉजिशनही होत नाही. म्हणूनच जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर हळूहळू खा.

अमेरिकन हार्ट असोशियेशनकडून करण्यात आलेल्या अभ्यासानुसार जे लोक  स्लो खातात त्यांच्यात मेटाबॉलिक सिंड्रोम उद्भवण्याचे चान्सेस कमी असतात. तसंच स्लो खाणाऱ्या लोकांमध्ये एसिडिटीसह पचनक्रियेसंबंधित समस्या कमी प्रमाणात उद्भवतात.  याचे परिणाम सर्वांमध्येच जाणवतात असं नाही पण जर तुम्ही फास्ट खाणारे असाल तर तुमचा वेग थोडा कमी करून पाहा. 

जेवण्याची योग्य पद्धत कोणती?

जेवण व्यवस्थित चावून खात आहात खात्री करा यामुळे जेवणातील पोषक तत्व शरीराला पुरेपूर मिळतात. आयुर्वेदानुसार तुम्हाला जितकी भूक आहे त्यापेक्षा कमीच खायला हवं. जास्त खाल्ल्यानं पचनक्रियेवर अतिरिक्त दबाव पडतो. ज्यामुळे जेवण व्यवस्थित पचत नाही. जेवताना पाणी पिऊ नका यामुळे जेवण पचायला जास्त वेळ लागू शकतो.

जेवण झाल्यानंतर किंवा जेवणाआधी पाणी प्या. खाल्लेल्या अन्नाचे चांगले पचन होण्यासाठी जमिनीवर बसून जेवण करा. जेवणानंतर थोडावेळ चालणं फायदेशीर ठरतं. यामुळे खाल्लेलं अन्न लवकर पचत, शरीराचा लठ्ठपणा वाढणार नाही. पण जेवणानंतर जास्त पळू नका किंवा धावू नका.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स