मोबाईल हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री उशिरा झोपेपर्यंत तो वापरतो. अनेक जण सतत फोन वापरतात. मोबाईलचं व्यसन आरोग्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. फक्त फोनच नाही तर त्यावर येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे देखील तुम्ही आजारी पडू शकतात. नोटिफिकेशन अनेक आजारांना आमंत्रण देत आहे.
दिवसरात्र फोन वापरण्याचे दुष्परिणाम
- सकाळी उठून फोन हातात घेऊन वारंवार एखाद्या गोष्टीचा विचार केल्याने चिंता निर्माण होऊ शकते. यामुळे हाय ब्लड प्रेशरच्या तक्रारी उद्भवू शकतात.
- वारंवार मोबाईलची स्क्रीन पाहिल्याने चिंता वाढते, शरीराची ऊर्जा कमी होते आणि तुम्हाला थकवा आणि सुस्ती जाणवते.
- सकाळी उठल्याबरोबर ईमेल किंवा नोटिफिकेशन्स तपासल्याने तुमचं हृदय आणि मन अस्वस्थ होऊ शकतं.
- जर तुमच्या मोबाईलवर सकाळी लवकर खूप नोटिफिकेशन्स, मेसेज, ईमेल, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामवर मेसेज येत असतील तर ते तुमची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती हिरावून घेऊ शकतं.
- फोन आणि सोशल मीडियावर वारंवार येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे चिडचिड होऊ शकते. याचा तुमच्या मूडवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
- मोबाईलवर नोटिफिकेशन्स पाहिल्यानंतर मन त्याच गोष्टींबद्दल विचार करत राहतं. जर सोशल मीडिया काही तणावपूर्ण घडलं तर तुमचा संपूर्ण मूड खराब होऊ शकतो.
- रात्री मोबाईल बघून झोपणं आणि सकाळी मोबाईल बघून उठणं यामुळे गंभीर डिप्रेशन येऊ शकतं. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर राग येऊ लागतो.
मोबाईलवरील नोटिफिकेशन्स किती धोकादायक?
फोनचा जास्त वापर लाईफस्टाईलवर नकारात्मक परिणाम करत आहे. कधीकधी ते प्राणघातक देखील असू शकतं. स्मार्टफोनच्या व्यसनाला नोमोफोबिया म्हणतात. नोटिफिकेशन्स तपासण्याची, ते मिस होण्याची, फोन हरवण्याची आणि फोनशिवाय राहण्याची भीती नेहमीच असते. एडोबच्या एका रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की, देशातील बहुतेक तरुण या फोबियाचे बळी आहेत. हार्ट केअर फाउंडेशन ऑफ इंडियाच्या तज्ज्ञांच्या मते, फोन असो, संगणक असो किंवा लॅपटॉप असो, त्यावरील नोटिफिकेशन्स आणि अन्य अलर्ट आपल्याला सतत त्यांच्याकडे पाहण्यास भाग पाडतात. आपण फक्त त्यांची वाट पाहत राहतो. जर ते नसेल तर एखाद्याला अस्वस्थ आणि एकटे वाटू लागतं. अशाप्रकारे या नोटिफिकेशन्स आपल्याला आजारी पाडत आहेत.
काय करावं आणि काय करू नये?
- फोन सेटिंग्जमध्ये जा आणि नोटिफिकेशन्स बंद करा, जेणेकरून तुमचं लक्ष पुन्हा पुन्हा त्याकडे जाणार नाही.
- दिवसभरात काही तास फोनचा डेटा बंद ठेवा, जेणेकरून शांतता मिळेल.
- तुमचा फोन वारंवार चेक करत बसू नका. दर काही तासांनी अपडेट्स तपासा.
- सकाळी उठल्याबरोबर काही तास फोनपासून दूर राहा आणि रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी तो बंद करा.