Join us   

भिजवलेले की भाजलेले? बदाम कधी आणि कसे खाल्ले तर शरीराला जास्त फायदा होतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2023 1:09 PM

Soaked Vs Raw Almonds: Which Is Healthier And Why : हृदय निरोगी, बीपी कंट्रोल यासह वजन कमी करण्यासाठी होईल मदत, पण बदाम नेमके कसे खावे ते आधी पाहा..

निरोगी आरोग्यासाठी बदाम (Healthy Benefits of Almonds) खाणं फायदेशीर ठरते. बदामात फॅटी अ‍ॅसिड्स, प्रोटिन्स, फायबर व व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात आढळते. बदाम फक्त मेंदूला चालना देण्यासाठी कार्य करत नसून, यामुळे वेट लॉस, डायबिटिज, कोलेस्टेरॉल नियंत्रित यासह ब्लड सर्क्युलेशन फ्लोमध्ये ठेवण्यास मदत करते. पण बदाम खाण्याची योग्य पद्धत कोणती? बदाम अनेक प्रकारे खाल्ले जाते. काही जण भिजवलेले बदाम तर, काही जण रोस्टेड, साल किंवा सालीसह बदाम खातात. पण कोणत्या पद्धतीने बदाम खाल्ल्याने याचा फायदे आरोग्याला जास्त होतो? बदाम नेमकं कधी आणि किती खावे?

याबद्दल नवी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ डॉ. मनीषा वर्मा सांगतात, 'दररोज शरीरासाठी प्रथिने आणि ओमेगा ३ फॅटी ऍसिडची गरज असते. त्यामुळे प्रत्येकाने नियमित १४ ग्रॅम बदाम खाणे आवश्यक आहे. निदान रोज ५ बदाम खाल्ल्याने शरीराला ४ ग्रॅम प्रथिने मिळतात. शिवाय १ ते २ ग्रॅम फायबरही मिळते'(Soaked Vs Raw Almonds: Which Is Healthier And Why).

भिजवलेले की रोस्टेड बदाम कसे खावे?

ऋतू कोणताही असो, भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर ठरू शकते. यासाठी रात्रभर पाण्यात बदाम भिजत ठेवा. सकाळी त्याची साल काढून किंवा सालीसह खा. पण अनेक ठिकाणी भाजलेले बदामही खाल्ले जातात. रोस्टेड बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. वडीलधारी लोकं आपल्या मुलांना रोस्टेड बदाम खायला देतात.

भात खाल्ला की सुस्ती येते? भात खाऊनही झोप यायला नको तर लक्षात ठेवा १ गोष्ट

लहान मुलांना द्या रोस्टेड बदाम

लहान मुलांना रोस्टेड बदाम खायला द्या. जर त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास झाला असेल तर, त्यांना तुपात तळलेले बदाम खायला द्या. शिवाय आपण बदामाची पावडर तयार करून दुधामध्ये मिसळून त्यांना प्यायला देऊ शकता. यामुळे पचनशक्ती मजबूत होते. याशिवाय उच्च रक्तदाब आणि वाढते वजन नियंत्रित राहू शकते.

ऐन तारुण्यात हाडं कटकट वाजतात? पंचविशीनंतर रोज खायलाच हवे ४ पदार्थ, चाळीशीनंतरही हाडं राहतील मजबूत-चालाल बेफिकीर

सालीसह की साल काढून? बदाम कसे खावे?

भिजवलेल्या बदामाची साल काढून खाण्याची जुनी पद्धत आहे. तज्ज्ञानुसार भिजेलेले बदाम साल काढून खाणे उत्तम मानले जाते. बदामाच्या सालीमध्ये टॅनिन असतात, जे पोषण रोखतात. तसेच बदाम भिजवल्याने साल सोलणे सोपे होते. भिजवलेले बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे पचन सुधारते, वजन कमी होते, शिवाय शरीराला योग्यरित्या आयर्न मिळते.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य