Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सोनम कपूर- निक जोनास यांना ऐन तारुण्यात छळणारा टाइप वन डायबिटीज नक्की कशाने होतो?

सोनम कपूर- निक जोनास यांना ऐन तारुण्यात छळणारा टाइप वन डायबिटीज नक्की कशाने होतो?

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँण्ड प्रिव्हेंशन या संस्थेचा अभ्यास सांगतो की जर टाइप 1 डायबिटीजकडे लक्ष दिलं नाही, योग्य ती काळजी घेऊन त्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर पुढे गंभीर स्वरुपाच्या आजारांचा आणि परिणामांचा सामना करावा लागतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 06:41 PM2021-12-22T18:41:53+5:302021-12-22T18:50:10+5:30

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँण्ड प्रिव्हेंशन या संस्थेचा अभ्यास सांगतो की जर टाइप 1 डायबिटीजकडे लक्ष दिलं नाही, योग्य ती काळजी घेऊन त्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर पुढे गंभीर स्वरुपाच्या आजारांचा आणि परिणामांचा सामना करावा लागतो.

Sonam Kapoor, Nick Jonas are suffer from type 1 diabetes in thier youth? What is exactyle type 1 deabetes? How to control ? | सोनम कपूर- निक जोनास यांना ऐन तारुण्यात छळणारा टाइप वन डायबिटीज नक्की कशाने होतो?

सोनम कपूर- निक जोनास यांना ऐन तारुण्यात छळणारा टाइप वन डायबिटीज नक्की कशाने होतो?

Highlightsडायबिटीजचे चार प्रकार आहेत, त्यातला टाइप 1डायबिटीज हा प्रकार आहे.हा आजार गंभीर असेल तर इन्शुलिनची इंजेक्शनं घ्यावी लागतात.कमी प्रमाणात समस्या असल्यास केवळ जीवनशैली बदलून ती शिस्तबध्द करुन हा आजार नियंत्रणात ठेवता येतो.

सोनम कपूर, समंथा , फवाद खान, निक जोनास आणि गौरव कपूर या पाच जणांमधे काय साम्य आहे असा प्रश्न विचारल तर उत्तर काय असेल? कितीही विचार केला तरी यांच्यात साम्य शोधणं अवघडच. पण हा प्रश्नच मुळी यासाठी विचारला कारण या पाच जणांमधे साम्य आहे. हे साम्य आहे ते तोंड देत असलेल्या आजारात. टाइप 1 डायबिटीज या आजाराचा सामना करताना हे पाचही जण आपल्या करिअरमधे यशस्वी आहेत. आपल्या खाजगी आयुष्यातही आनंदी आहेत.

Image: Google

सोनम कपूर 17 वर्षांची असताना तिला टाइप 1 डायबिटीजचं निदान झालं. तिच्या स्वादुपिंडात इन्शुलिन इतकं कमी स्त्रवत ( जवळ जवळ नाहीच) की त्यामुळे तिला रोज इन्शुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं.
 समंथाला वयाच्या 26 व्या वर्षी टाइप 1 डायबिटीजचा त्रास व्हायला सुरुवात झाली. पण आज तिच्याकडे पाहाल तर समंथानं जबरदस्त फिटनेस निक जोनास ( हॉलिवूडमधील पॉप गायक आणि प्रियंका चोप्राचा नवरा. याला तर वयाच्या 13 व्या वर्षीच टाइप 1 डायबिटीजनं गाठलं. आपली योग्य ती काळजी घेऊन निक जोनास या आजारपणातही एकदम फिट आहे. शिवाय टाइप 1 डायबिटीजचा शरीर आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो याबाबत तो जनजागृतीही करतो आहे.

फवाद खान हा पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेता. याला वयाच्या 17 व्या वर्षी टाइप 1 डायबिटीज झाला.
गौरव कपूर म्हणजे टेलिव्हिजवरचा प्रसिध्द चेहरा आणि नाव. गौरव कपूरला वयाच्या 22 व्या वर्षी टाइप 1 डायबिटीसचं निदान झालं. वयाच्या 25 व्या वर्षापासून गौरवला इन्शुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं. पण गौरव आपल्या आजाराकडे खूप सकारात्मक पध्दतीने पाहातो. नियम उत्तम पाळले तर कसली भीती असा त्याचा प्रश्न आहे. गौरवच्या मते डायबिटीजचं निदान झालं म्हणून आपण उत्तम , नॉर्मल आणि आनंदी आयुष्य यापुढे जगू शकणार नाही असं अजिबात नाही. शिस्त आणि पथ्य याबाबत काटेकोर राहिल्यासहा आजार असतानांही आपण फिट राहू शकतो, हे केवळ त्यानं सांगितलं नाही तर दाखवुन दिलं आहे. गौरव हा या आजाराबद्द्ल जनजागृती देखील करतो. ज्यांना असा त्रास होतोय त्यांना उपचाराचे मार्गही सूचवतो आहे. सोनम कपूर असू देत की गौरव कपूर आपल्याला झालेला आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी हे सर्वजण संतुलित आहार, नियमित योग आणि व्यायाम या दोन गोष्टींवर जास्त भर देतात.

Image: Google

डायबिटीज आणि टाइप 1 डायबिटीज

सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँण्ड प्रिव्हेन्शनुसार आपण जे खातो , त्या पदार्थांचं सखारेत विभाजन होतं. आणि रक्तात साखर मिसळते. जेव्हा रक्तात साखरेचं प्रमाण वाढायला लागतं तसं स्वादुपिंडातून इन्शुलिन हार्मोन स्त्रवण्याचा इशारा मिळतो. इन्शुलिनद्वारे रक्तातील ग्लुकोज वापरायला गती मिळते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहाते. पण जेव्हा डायबिटीज होतो तेव्हा मात्र इन्शुलिनची निर्मिती कमी होते किंवा शरीर हे इन्शुलिनबाबत असंवेदनशील होतं.

टाइप 1 डायबिटीज म्हणजे?

डायबिटीजचे चार प्रकार आहेत, त्यातला टाइप 1 डायबिटीज हा प्रकार आहे. डायबिटीजच्या या प्रकारात शरीराची रोगप्रतिकारशक्ती चुकून इन्शुलिनची निर्मिती करणार्‍या स्वादुपिंडातील पेशी नष्ट करायला लागते. यामुळे इन्शुलिनचं प्रमाण फारच कमी होतं. साधरणत: हा आजार लहानपणी आणि किशोरावस्थेत आढळतो. म्हणूनच याला जुवेनाइल डायबिटीज किंवा इन्शुलिन डिपेंडण्ट डायबिटीज असंही म्हणतात. वयाच्या 6 ते 18 वर्षांच्या मुलांमधे ही समस्या प्रामुख्याने आढळते.

Image: Google

टाइप 1 डायबिटीजचे लक्षणं काय?

1. खूप तहान लागणं.
2. सारखं लघवी लागणं.
3. थकवा वाटणं, सुस्ती येणं.
4. त्वचेवर झालेल्या जखमा पटकन भरुन न येणं.
5. सारखी भूक लागणं.
6. अंगाला खाज येणं.
7. त्वचेला संसर्गजन्य आजार होणं.
8. अस्पष्ट दिसणं.
9. कारण नसताना वजन कमी होणं.
10. सतत मूड बदलत राहाणं.
11. डोकं दुखणं आणि चक्कर येणं.
12. पायाच्या स्नायुंमधे पेटके येणं, वेदना होणं.

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँण्ड प्रिव्हेंशन या संस्थेचा अभ्यास सांगतो की जर टाइप 1 डायबिटीजकडे लक्ष दिलं नाही, योग्य ती काळजी घेऊन त्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर मग पुढे हदयविकाराचा झटका, कमी दिसणं, रक्तवाहिन्यांची हानी होणं, गंभीर प्रकारचे संसर्ग होणं, किडन्या निकामी होणं आणि वजन वाढणं यासारखे गंभीर आजार किंवा परिणाम होवू शकतात.
मधुमेहासंबंधीच्या ए1सी टेस्ट, फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट, ग्लूकोज टॉलरन्स टेस्ट, रॅंडम ब्लड शुगर टेस्ट या चाचण्या करुन डायबिटीजचं, डायबिटीजच्या प्रकाराचं निदान होवून त्यांचं गांभिर्यही या चाचण्यांद्वारे तपासलं जातं. ते पाहून उपचार ठरवले जातात. जर ब्लड शुगर रिपोर्टमधील आकडे गंभीर असतील तर इन्शुलिनचं इंजेक्शन दिलं जातं. पण जर समस्या गंभीर नसेल तर मात्र जीवनशैलीत बदल करुनही टाइप 1 डायबिटीज नियंत्रणात येतो.

Image: Google

काय काळजी घ्यावी?

1. रक्तातील साखर ही नियमित तपासायला हवी.
2. रोज न चुकता 20 मिनिटं ते अर्धा तास व्यायाम आवश्यक. योगचा सराव करावा.
3. अति साखर असलेले पदार्थ आहारातून वजा करणं.
4. वजन नियंत्रणात ठेवणं.
5. फास्ट फूड तसेच काबरेनेटेड पेयं यांचं सेवन न करणं.
6. एकदम पोटाल तड लागेल इतकं न खाणं. 20 टक्के भूक राहिल इतकं जेवावं.
7. हिरव्या पालेभाज्या , आंबट फळं, रताळी, टमाटे आणि ओमेगा 3 युक्त पदार्थ यांचा आहारात आवर्जून समावेश करावा.

Web Title: Sonam Kapoor, Nick Jonas are suffer from type 1 diabetes in thier youth? What is exactyle type 1 deabetes? How to control ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.