Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Sore Throat Remedies : घशातील इन्फेक्शन, सुज यावर रामबाण उपाय, ५ पदार्थ, रोज खा, घशाची खवखव जाणवणारच नाही

Sore Throat Remedies : घशातील इन्फेक्शन, सुज यावर रामबाण उपाय, ५ पदार्थ, रोज खा, घशाची खवखव जाणवणारच नाही

Sore Throat Remedies : अनेकदा घश्यातील खवखव आपोआप बरी होते.  काही घरगुती उपाय तुमचा हा त्रास टाळण्यासाठी फायदेशीर ठरू शकतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 01:03 PM2022-12-14T13:03:45+5:302022-12-14T13:06:29+5:30

Sore Throat Remedies : अनेकदा घश्यातील खवखव आपोआप बरी होते.  काही घरगुती उपाय तुमचा हा त्रास टाळण्यासाठी फायदेशीर ठरू शकतील.

Sore Throat Remedies : Home remedies to heal sore throat quickly in winter | Sore Throat Remedies : घशातील इन्फेक्शन, सुज यावर रामबाण उपाय, ५ पदार्थ, रोज खा, घशाची खवखव जाणवणारच नाही

Sore Throat Remedies : घशातील इन्फेक्शन, सुज यावर रामबाण उपाय, ५ पदार्थ, रोज खा, घशाची खवखव जाणवणारच नाही

घश्यातील खवखव सर्दी, खोकला व्हायरल इन्फेक्शनचं सामान्य लक्षण आहे. आजकाल वातावरणातील बदलांमुळे अनेकांना हा त्रास उद्भवतो आणि गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. (Home remedies to heal sore throat) यात घातक इंफेक्शन, रेस्पिरेटरी सिंकिटियल वायरस (RSV), आणि फ्लूचा सुद्धा समावेश आहे. अनेकदा घश्यातील खवखव आपोआप बरी होते. पण काही घरगुती उपाय तुमचा हा त्रास टाळण्यासाठी फायदेशीर ठरू शकतील. (Home remedies to heal sore throat quickly in winter)

मध

रिसर्च गेटमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार घश्यातील इन्फेक्शनवर मध हा  उत्तम उपाय आहे. मधात एंटीबॅक्टेरीअल आणि एंटी व्हायरल गुण असतात. यामुळे खोकला , सर्दीची लक्षणं दूर होण्यास मदत होते. याशिवाय घश्यातील वेदनांवरही ते प्रभावी आहे.  घसा खवखवणे आणि खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ताज्या आल्याच्या पेस्टसह मध वापरणे फायदेशीर ठरू शकते.

आलं

आल्यामध्ये झिंजेरॉन आणि जिंजेरॉलसारखे संयुगे असतात, जे बॅक्टेरिया आणि विषाणूंना शरीरात प्रवेश करण्यापासून रोखण्याचे काम करतात. जे घसा खवखवण्यासह अनेक त्रास करण्यात मदत करतात. एका कप पाण्यात ताज्या आल्याचे काही तुकडे उकळून आल्याचा चहा बनवा आणि दिवसातून २-३ वेळा प्या.

काळी मिरी

काळ्या मिरीत क्वेरसोटीन असते. यामुळे सर्दी, खोकल्याची लक्षणं कंट्रोल करण्यास आणि इम्यूनिटी वाढण्यास मदत होते. यात एंटी व्हायरल, एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. यामुळे कफ कमी होण्यास मदत होते. 

हळद

हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे पॉलिफेनॉल असते. त्यात अँटीव्हायरस, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत. हे विषाणूजन्य संसर्गाची लक्षणे टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. अशावेळी हळद हा घशाच्या दुखण्यावर प्रभावी उपचार ठरू शकतो. कोमट दुधात थोडी हळद घालून चांगले मिसळा आणि दिवसातून 2-3 वेळा प्या.

हिंग

हिंगाची मुळं नैसर्गिक विषाणूविरोधी संयुगं तयार करतात. ज्यामुळे खोकल्याचा त्रास कमी होतो. हिंगाच्या वासानंही बॅक्टेरियांशी लढण्यास मदत होते. तुम्ही घसा दुखू नये म्हणून हिंगाचे सेवन करू  शकता.  एक ग्लास पाण्यात एक चमचा हिंग पावडर, आलं पावडर आणि मध मिसळा यामुळे घश्यातील खवखवीपासून आराम मिळण्यास मदत होईल. दिवसभरातून २ वेळा या पाण्याच सेवन करा. 

Web Title: Sore Throat Remedies : Home remedies to heal sore throat quickly in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.