हल्ली बदललेल्या जीवनशैलीमुळे वाढत्या वजनाचा आणि वाढत्या कोलेस्ट्रॉलचा त्रास बहुसंख्य लोकांना छळतो आहे. यासाठी बऱ्याचशा प्रमाणात आपलं बैठं काम आणि बदलेली आहारपद्धती कारणीभूत आहे. तरुण वयात खायचं नाही तर मग कधी खायचं, असा विचार अनेक लोक करतात... त्याचं म्हणणं बरोबर असलं तरी आपण जे खातो, ते पचविण्याइतका व्यायाम आपण करत नाही, हा विचारही करणं गरजेचं आहे. त्यामुळेच तर कमी वयात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे (Spices that helps to reduce cholesterol?). आता कोलेस्ट्रॉलचा संबंध थेट हृदयाशी. त्यामुळे तुम्हालाही सतत वाढत्या कोलेस्ट्रॉलची चिंता छळत असेल तर कोलेस्ट्रॉलची पातळी कायम नियंत्रणात (Food that helps to control high cholesterol) ठेवण्यासाठी स्वयंपाक घरातल्या दालचिनीचा (health benefits of cinnamon) वापर तुमच्या आहारात नियमितपणे करा..(what to eat for reducing cholesterol level?)
The American Heart Association यांनी दिलेली माहिती eatingwell.com या पेजवर शेअर करण्यात आली आहे. त्यानुसार डॉ. रिनी कोर्कझॅक म्हणतात की मसाल्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचं बायोॲक्टिव्ह कम्पाउंड असतं.
वयाच्या कितव्या वर्षीपर्यंत मुलांनी आई- वडिलांजवळच झाेपणं याेग्य असतं? तज्ज्ञ सांगतात..
त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास तसेच रक्ताभिसरण क्रिया वाढण्यास आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्या मसाल्यांमध्ये दालचिनी ही सगळ्यात जास्त परिणामकारण आहे. तिच्यामधे ॲण्टी इंफ्लामेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे दररोज साधारण पाऊण ते दोन टीस्पून दालचिनी पावडर आपल्या पोटामध्ये गेली पाहिजे.
याविषयी अनेक लोकांवर अभ्यास करण्यात आला. जे लोक नियमितपणे आहारात दालचिनी घेत होते,
पिवळट दात पांढरेशुभ्र होऊन मोत्यासारखे लख्ख चमकतील- बघा केळीच्या सालींचा खास उपयोग
त्या लोकांचे वजन तर कमी झालेच पण कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, रक्तदाब, low-density lipoprotein (LDL) नियंत्रित राहण्यासही मदत झाली. त्यामुळे तुम्हालाही सतत वाढत्या कोलेस्ट्रॉलची चिंता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमितपणे दालचिनी खाण्यास सुरुवात करा. चहा मसाला किंवा भाजी, वरण या पदार्थांमध्ये टाकून तुम्ही दालचिनी खाऊ शकता.