Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > भाजलेले की मोड आलेले कोणते चणे खाणं चांगलं? कशातून मिळतं जास्त प्रोटीन आणि पोषण?

भाजलेले की मोड आलेले कोणते चणे खाणं चांगलं? कशातून मिळतं जास्त प्रोटीन आणि पोषण?

Sprouted Gram Benefits : मसल्सच्या विकासासाठी याची फार आवश्यकता असते. हा फायबर्सचा सगळ्यात चांगला स्त्रोत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 08:37 AM2023-09-16T08:37:00+5:302023-09-16T15:22:49+5:30

Sprouted Gram Benefits : मसल्सच्या विकासासाठी याची फार आवश्यकता असते. हा फायबर्सचा सगळ्यात चांगला स्त्रोत आहे.

Sprouted Gram Benefits : Which types of chana beneficial to health sprouted or booiled | भाजलेले की मोड आलेले कोणते चणे खाणं चांगलं? कशातून मिळतं जास्त प्रोटीन आणि पोषण?

भाजलेले की मोड आलेले कोणते चणे खाणं चांगलं? कशातून मिळतं जास्त प्रोटीन आणि पोषण?

चणे खाल्ल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात यात अनेक पोषक घटक असतात. चण्यांमध्ये प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात. मसल्सच्या विकासासाठी याची फार आवश्यकता असते. हा फायबर्सचा सगळ्यात चांगला स्त्रोत आहे. जे पचन सुधारते आणि गॅस, एसिडीटीची समस्या उद्भवत नाही. चण्यात कॅल्शियम असते असते ज्यामुळे दात मजबूत राहतात. (Which types of chana beneficial to health sprouted or booiled) काहीजण शिजवलेले चणे खातात काहीजण भाजलेले तर काहीजण मोड आलेले चणे खातात. कोणत्या प्रकारचे चणे जास्त फायदेशीर ठरतात समजून घेऊ.

१) चण्यांना मोड आल्यामुळे त्यातील पोषक तत्वांचे प्रमाण वाढते. मोड आलेल्या चण्यांमध्ये प्रोटीन्स, फायबर्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्स असतात. ज्यामुळे उर्जा मिळते आणि आरोग्याला अधिकाधिक फायदे मिळतात. मोड आलेल्या चण्यांमध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शारीरिक मांसपेशींच्या विकासास चालना मिळते.

२) मोड आलेल्या चण्यांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे पचन सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता दूर करते. जर तुम्हाला वारंवार पोटासंबंधी समस्या येत असतील तर तुम्ही सकाळी या प्रकारच्या चण्यांचा आहारात समावेश करा. 

३) जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर मोड आलेले चणे खा. यामुळे वजन नियंत्रणात राहतं यात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात आणि जास्त प्रमाणात फायबर्स, प्रोटीन्स असतात.

बारीक होण्यासाठी रोज नाश्त्याला काय खायचं? तज्ज्ञ सांगतात स्लिम-फिट फिगरचं सोपं सिक्रेट

४) डायबिटीसच्या रुग्णांसाठी ब्लड शुगर कंट्रोल करण्याचा हा उत्तम पर्याय आहे. डायबिटीज असलेल्यांनी चणे खाल्ल्यास त्यांच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात याशिवाय पोषक तत्वांची कमतरता भरून निघते.

५) मोड आलेली कडधान्ये कॅल्शियमचा पॉवरहाऊस आहेत. याच्या नियमित सेवनानं हाडांना भरपूर कॅल्शियम असतं. दात आणि हाडं मजबूत राहतात. 

६)  चणे खाल्ल्याने शरीरात रक्तची कमतरता भासत नाही म्हणून महिला आणि लहान मुलांना मोड आलेले चणे खाण्याचा सल्ला दिला जातो.  यामुळे रक्ताची कमतरता उद्भवत नाही. चण्यांमध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असते. यामुळे एनिमियापासून बचाव होतो. रोगप्रतिकारकशक्ती मजबूत राहते. 

ओटी पोट सुटलंय-कपडे घट्ट होतात? जेवणात ५ पदार्थांचे एकत्र-एकावेळी खा, झरझर घटेल चरबी

7) यात व्हिटामीन सी,  व्हिटामीन ए, याबरोबर बी कॉम्पलेक्स असते. ज्यामुळे तुम्ही निरोगी राहता. याव्यतिरिक्त पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखी मिनरल्स यात असतात.

Web Title: Sprouted Gram Benefits : Which types of chana beneficial to health sprouted or booiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.