उत्तम आरोग्यासाठी आहार महत्वाची भूमिका बजावतात (Shri Shri Ravishankar). आहारात पौष्टिक घटकयुक्त पदार्थ नसतील तर, कमी वयात गंभीर आजारांचा धोका वाढतो (Food). सध्या लोक जंक फूडच्या आहारी जात आहेत (Health Tips). पण यात खूप कमी सत्व असतात. शरीराला याचा कोणताही फायदा होत नाही. जर आपल्याला हेल्दी जीवन जगायचं असेल तर, पारंपारिक ताजे शिजवलेले पदार्थ, फळे आणि भाज्या खायला हवे. यात सत्व जास्त असतात.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आणि गुरू श्री श्री रविशंकर म्हणतात, 'आपल्या शरीरावर रज, तम आणि सत्त्व या तीन मुख्य गुणांचा प्रभाव असतो. याचा परिणाम आपल्याला शरीरावर दिसून येतो. शिवाय आहारकडेही विशेष लक्ष द्यायला हवे. पारंपारिक भारतीय अन्न शरीराला पोषण आणि आरोग्याला फायदेशीर ठरते'(Sri Sri Ravi Shankar says, eat 'this' nutritious food; Eating it with ghee increases the strength).
भारतीय अन्न अधिक आरोग्यदायी
पदार्थातील छोट्या गोष्टीही गंभीर आजरांचा धोका कमी करतात. उदाहरणार्थ, एकीकडे तळलेले पदार्थ कोलेस्टेरॉल वाढवतात तर, पदार्थातील कडीपत्ता कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
वारंवार घासूनही बर्नर कळकटच? ३ सोपे उपाय- बर्नर होईल साफ - सिलेंडरचीही होईल बचत
इडली म्हणजे हेल्दी नाश्ता
इडली हा एक पौष्टिक नाश्ता आहे. यातून शरीराला प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि अमीनो ॲसिड देखील मिळतात. त्यात अनेक एन्झाइम्स असतात. इडलीसोबत आपण खोबऱ्याची चटणीही खातो. नारळाच्या चटणीतील फायबरमुळे पोट भरलेले राहते. शिवाय यात कॅलरीज कमी असतात. ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
मोड आलेल्या कडधान्यांचा कुबट वास येतो? ५ टिप्स; कडधान्य राहतील फ्रेश - मोडही येतील सुरेख
यामध्ये लोह आणि कॅल्शियम देखील आढळते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. इडली खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
तूप खाण्याचे आरोग्यदायी फायदे
तूप खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यात जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के आहेत, यासह अँटीऑक्सिडंट्स असतात. तूप दीर्घकाळ भूक नियंत्रित ठेवते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. नियमित सकाळी चमचाभर तूप खाल्ल्याने मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. गंभीर आजारांचा धोका टाळण्यासाठी आपण चमचाभर तूप नियमित खाऊ शकता.