Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > फिट कसं रहायचं हेच कुणी शिकवलं नाही? श्री.श्री. रविशंकर सांगतात उत्तम तब्येतीसाठी करायचं काय?

फिट कसं रहायचं हेच कुणी शिकवलं नाही? श्री.श्री. रविशंकर सांगतात उत्तम तब्येतीसाठी करायचं काय?

Sri Sri Ravi Shankar shares health and diet secrets of his grandmother : भावनिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असण्यासाठी आहार कोणता घ्यायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2023 04:39 PM2023-10-02T16:39:24+5:302023-10-02T16:40:36+5:30

Sri Sri Ravi Shankar shares health and diet secrets of his grandmother : भावनिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असण्यासाठी आहार कोणता घ्यायचा?

Sri Sri Ravi Shankar shares health and diet secrets of his grandmother | फिट कसं रहायचं हेच कुणी शिकवलं नाही? श्री.श्री. रविशंकर सांगतात उत्तम तब्येतीसाठी करायचं काय?

फिट कसं रहायचं हेच कुणी शिकवलं नाही? श्री.श्री. रविशंकर सांगतात उत्तम तब्येतीसाठी करायचं काय?

निरोगी आयुष्य जगणे म्हणजे केवळ आजारांपासून दूर राहणे नव्हे. तर आपण हे जीवन किती आनंदात आणि उत्साहीरित्या जगत आहोत, हे प्रतिबिंबित करते. यासाठी आपण काय खात आहोत, जीवनशैली आपली कशी आहे? हे पाहणं देखील तितकेच गरजेचं आहे. श्री श्री रवि शंकर यांनी दीर्घ, निरोगी आणि रोगमुक्त जीवन जगण्यासाठी महत्त्वाची माहिती दिली आहे(Sri Sri Ravi Shankar shares health and diet secrets of his grandmother).

प्रोटीन-कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खा

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नुकत्याच एका व्हिडिओमध्ये श्री श्री रविशंकर यांनी आहाराद्वारे फिटनेस वाढवण्याचे मार्ग सांगितले आहेत. ते म्हणाले, 'आपल्या शिक्षण व्यवस्थेत हे शिकवले जाते की नाही माहीत नाही, पण मुलांना पोषणाच्या निगडीत माहिती असायला हवी. प्रथिने, कार्ब किंवा इतर पौष्टीक घटकांची गरज शरीराला का असते, व हे कार्य कशा पद्धतीने करतात. हे मुलांना माहित असायला हवे. शिवाय आपण काय खातोय, व किती प्रमाणात खायला हवे, याची माहिती मुलांना हवी.'

कॅल्शियमने खच्चून भरलेत ४ पदार्थ, ठणकणाऱ्या हाडांना मिळेल मजबुती, तिशीनंतरही राहाल यंग

पालेभाज्या आहारात हव्याच

श्री श्री रविशंकर यांनी सांगितले की, त्यांच्या आजीच्या जेवणात नेहमीच पालक असायचे. त्या दररोज विविध प्रकारच्या पालेभाज्या खायच्या. त्यांच्या आजीच्या आहारात दही, कोशिंबीर आणि डाळ यांचा नियमित समावेश होता.

केळीच्या पानावर जेवण करावे

केळीच्या पानांवर जेवण वाढण्याची एक पद्धत आहे. ज्यामध्ये उजव्या हाताला वरच्या बाजूला मीठ ठेवले जाते. त्यानंतर कोशिंबीर आणि विविध प्रकारच्या भाज्या वाढण्यात येतात. संपूर्ण जेवणामध्ये १२ ते १३ लहान सहान पदार्थांचा समावेश असतो. जे संपूर्ण संतुलित आहार म्हणून ओळखले जाते.

जेवण करताना लक्षात ठेवा ६ गोष्टी, योग शिक्षक सांगतात २ गोष्टी टाळायलाच हव्या, कारण..

डाएटमध्ये काय असावे?

श्री श्री रविशंकर यांच्या मते, 'योग्य प्रमाणात योग्य अन्न खावे. शाकाहारी, पौष्टिक व पचायला हलके असा आहार घ्यावा. शुद्ध मध, आले, बदाम, सीड्स, ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन नियमित करावे.'

कोणते अन्न टाळावे?

शिळे अन्न, तळलेले पदार्थ, मसालेयुक्त पदार्थ व साखरेचे प्रमाण आहारातून कमी करावे. यासह कांदा, लसूण देखील कमी प्रमाणात खावे. या गोष्टींमुळे आळस आणि थकवा वाढतो, व प्रोसेस्ड फूड आरोग्यासाठी हानीकारक मानले जाते.

Web Title: Sri Sri Ravi Shankar shares health and diet secrets of his grandmother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.