Join us   

चपात्या उरल्या तर शिळ्या चपात्या खाव्या का? तज्ज्ञ सांगतात, शिळी चपाती नेहमी खात असाल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2023 3:55 PM

Stale rotis have amazing health benefits that you may not be aware of शिळया चपात्या खाणं चांगलं की वाईट हा नेहमीचा वाद, त्यातलं खरंखोटं काय?

अनेकदा घरातील गृहिणी एक्स्ट्रा चपाती करते, किंवा ज्यांची भूक कमी असते. ते रोजच्यापेक्षा कमी चपाती खातात. ज्यामुळे सकाळपर्यंत चपात्या शिळ्या होतात. लोकं चपाती गरम असतानाच खातात, शिळी झाल्यानंतर चपातीची चव बदलते. पण फ्रेश चपातीपेक्षा शिळी चपाती खाण्याचे अनेक फायदे आहेत. जर रात्रीची तयार चपाती आपण सकाळी खात असाल तर, याचा फायदा आपल्या शरीराला जास्त होतो.

यासंदर्भात, आयुर्वेदाचार्य मनीष दुडिया सांगतात, 'चपाती आरोग्यासाठी उत्तम जरी असली तरी, शिळी चपाती खाण्याचे फायदे याहून दुप्पट आहे.' शिळी चपाती खाल्ल्याने आरोग्याला किती फायदे मिळतात? शिळी चपाती नक्की कधी आणि कशी खावी पाहूयात(Stale rotis have amazing health benefits that you may not be aware of).

चपाती किती तास खाण्यायोग्य राहते?

शिळ्या चपात्यांमध्ये हेल्दी बॅक्टेरिया लवकर तयार होतात. हे निरोगी बॅक्टेरिया आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवतात. त्यामुळे न घाबरता शिळी चपाती खा. कारण चपात्या या १२ ते १५ तास खाण्यायोग्य राहतात.

रोज सकाळी १ ग्लास कोमट पाणी पिण्याचे ५ फायदे, वजन कमी-त्वचेवर ग्लो हवा तर..

ब्लड शुगरवर कंट्रोल

डायबिटिजमध्ये शरीरात साखरेचं प्रमाण वाढते. जे आपल्या आहारातून नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. सकाळी दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्याने शरीरातील साखरेची पातळी कमी होते. यासाठी चपाती दुधात पाच ते सात मिनिटे भिजवून नंतर खा.

हाय ब्लड प्रेशरवर फायदेशीर

ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी फ्रेश चपातीऐवजी शिळी चपाती खावी. सकाळी थंड दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहते. आपण शिळी चपाती दुधाऐवजी इतर भाज्यांसोबतही खाऊ शकता.

भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम हवे- खा ७ गोष्टी, न्यूट्रिशन डेफिशियन्सी टाळा आणि हाडं ठेवा ठणठणीत

पोटासाठी फायदेशीर

गॅस, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, यासह इतर पोटाच्या निगडीत असणारा त्रास शिळी चपाती खाल्ल्याने कमी होऊ शकतो. यासाठी सकाळी दुधासोबत शिळी चपाती खा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य