अनेक जणांना जेवण केल्यानंतर बडीशेप खाण्याची सवय असते. इवल्याशा बडीशेपमध्ये अनेक गुणधर्म दडलेत. नियमित बडीशेप खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. शिवाय अनेक समस्याही सुटतात. बडीशेपमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. शिवाय त्यात फॉस्फेट, कॅल्शियम, लोह, झिंक, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन 'के' आढळते. ज्यामुळे हाडं बळकट होतात. याचे सेवन नुसते न करता, दुधासोबत केल्याने पोटाचे विकार दूर होतात.
दुधात आपण हळद घालून पितोच. याचे आरोग्यदायी फायदे आपल्याला ठाऊकचं आहे. पण आपल्याला दुधात बडीशेप घालून पिण्याचे फायदे ठाऊक आहे का? यासंर्भात पोषणतज्ज्ञ श्वेता शाह यांनी दुधात बडीशेप घालून पिण्याचे फायदे किती? दुधात बडीशेप घालून कसे तयार करायचे? याची माहिती दिलीय(Start Drinking Fennel Seeds Milk Or Saunf Doodh For These Health Benefits).
या पद्धतीने तयार करा बडीशेप घालून दूध
एका भांड्यात एक कप दूध घालून गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर त्यात एक चमचा बडीशेप घाला. त्यात चवीनुसार मध किंवा गुळ घालून मिक्स करा. ५ मिनिटासाठी मध्यम आचेवर दूध उकळवत ठेवा. नंतर गॅस बंद करा. तयार दूध एका ग्लासमध्ये काढून घ्या, व हे दूध रात्री झोपण्यापूर्वी प्या.
नाश्ता करूनही थकवा जाणवतो? वारंवार भूक लागते? सकाळी उठताच ५ पैकी एक गोष्ट खा; आरोग्यासाठी उत्तम
रोगप्रतिकारशक्ती होते मजबूत
थंडीच्या काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणं गरजेचं आहे. मजबूत रोगप्रतिकारशक्ती आपल्या शरीराचे विषाणूजन्य आजारांपासून सरंक्षण करते. बडीशेपमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे आपले आरोग्य सुदृढ राहते.
वजनावर येईल नियंत्रण
आजकाल बहुतांश लोकं वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत. दुधामध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे काही लोकं दूध पिणं टाळतात. पण त्यात बडीशेप मिसळून प्यायल्यास वजन नियंत्रणात राहते.
मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम
बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी आणि क्वेर्सेटिन अँटीऑक्सिडंट असतात, जे मेंदूतील इंफ्लामेशन कमी करतात. यामुळे मेंदू दीर्घकाळ निरोगी राहते. शिवाय स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण होते.
लागते निवांत झोप
झोपण्यापूर्वी बडीशेप घालून दूध प्यायल्याने गाढ निवांत झोप लागते. मन आणि शरीराला आराम देण्यासाठी ७-८ तासांची झोप गरजेची आहे. या दुधामुळे आपले स्ट्रेस काही अंशी कमी होते. ज्यामुळे आपल्याला शांत झोप लागते.
हाडांना मिळते बळकटी
बडीशेप स्नायूंना मजबूत करते आणि ताकद वाढवते. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी नियमित दूध प्यावे. यामुळे गुडघेदुखी कमी होते. शिवाय हाडांच्या मजबुतीसाठी मदत करते.