Fruits To Lower Uric Acid Levels: उन्हाळ्यात शरीरात वाढलेलं यूरिक अॅसिड वेगवेगळ्या समस्या निर्माण करू शकतं. यूरिक अॅसिड (Uric Acid) वाढलं तर जॉइंट्समध्ये वेदना, सूज आणि गाउटसारख्या समस्या निर्माण करू शकतं. अशात यूरिक अॅसिड लेव्हल कमी कशी करावी असा प्रश्न अनेकांना पडत असतो. जर तुम्हाला औषधांशिवाय वाढलेली यूरिक अॅसिड लेव्हल कमी करायीच असेल तर काही फळांचा तुम्ही आहारात समावेश केला पाहिजे. ही फळं यूरिक अॅसिड लेव्हल कमी करण्यास मदत करतात. सोबतच त्यांचे शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. चला जाणून घेऊ कोणती फळं खावीत.
हाय यूरिक अॅसिड कमी करणारी फळं
१) चेरी
चेरी यूरिक अॅसिड कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात चांगलं फळ मानलं जातं. यातील अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि एंथोसायनिन्स सूज कमी करतात आणि यूरिक अॅसिड लेव्हल कंट्रोल करतात. यासाठी रोज काही चेरी खाणं सुरू करा.
२) लिंबू
लिंबाचा रस शरीराची पीएच लेव्हर संतुलित ठेवतो आणि यूरिक अॅसिड कमी करतो. यासाठी सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्यानं शरीराची सफाई होते आणि यूरिक अॅसिड लेव्हल कंट्रोल होते.
३) सफरचंद
सफरचंदामध्ये असलेले तत्व यूरिक अॅसिड कमी करण्यास मदत करतात. तसेच यानं बॉडी डिटॉक्स होण्यासही मदत मिळते. नियमितपणे संफरचंद खाल्ल्यानं सांधे हेल्दी राहतात. यासाठी रोज एक सफरचंद खावं, यानं हृदय सुद्धा निरोगी राहतं.
४) कलिंगड
उन्हाळ्यात सगळ्यात जास्त खाल्लं जाणारं फळ म्हणजे कलिंगड. यानं शरीर आतून थंड राहतं आणि शरीराला भरपूर पाणी मिळतं. त्यासोबतच इतरही अनेक पोषक तत्व मिळतात. महत्वाची बाब म्हणजे यूरिक अॅसिड लेव्हल कमी करण्यासही कलिंगड मदत करतं. यात पाणी भरपूर असल्यानं यूरिक अॅसिड शरीरातून बाहेर निघतं.
५) पपई
पपई सुद्धा शरीरात वाढलेली यूरिक अॅसिड लेव्हल कमी करते. यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. जे यूरिक अॅसिड कंट्रोल करतं आणि बॉडी डिटॉक्स करतं.
उन्हाळ्यात या फळांचा समावेश आपल्या आहारात केल्यानं केवळ यूरिक अॅसिड लेव्हल कमी होते असं नाही तर शरीराला इतरीही अनेक पोषक तत्व मिळतात. शरीर हेल्दी आणि एनर्जेटिक राहतं.