सकाळी उठल्यावर बरेचदा आपल्याला भूक लागते अशावेळी आपल्याला काहीतरी खावेसे वाटते. सकाळच्या दिवसाची सुरुवात हे बरेचजण चहा, कॉफी पिऊन करतात. परंतु सकाळच्या दिवसाची अशी सुरुवात करणे हे अतिशय चुकीचे आहे. आपण सकाळी उठल्यानंतर सगळ्यातआधी काय खातो यावर आपला पुढचा सगळा दिवस कसा जाणार हे ठरलेले असते. सकाळी उठल्या उठल्या जर आपण काही चुकीचे पदार्थ खात असू त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम झालेला दिसून येतो.
दिवसाची सुरुवात ही पौष्टिक नाश्त्यानेच व्हायला हवी. परंतु आपण काहीवेळा अतिशय हेव्ही, मसालेदार, गोड, तेलकट पदार्थ खाऊन दिवसाची सुरुवात करतो जे चुकीचे आहे. आपण जर बराचकाळ असे चुकीचे पदार्थ खाऊन (Worst Foods To Eat For Breakfast) दिवसाची सुरुवात करत असू तर आपल्याला पोटाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. दिवसाच्या सुरुवातीला चुकीचे पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होऊन दिवसभर आपल्याला थकल्यासारखे वाटू शकते. आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्यात सकाळचा नाश्ता महत्वाची भूमिका बजावतो. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्राने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ५ असे पदार्थ सांगितले आहेत. जे खाऊन आपण दिवसाची सुरूवात अजिबात करू नये. (5 common food items that you should avoid in the breakfast) या पदार्थांमुळे आपल्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी सांगितलेले ५ पदार्थ सकाळी खाणे प्रामुख्याने टाळाच(Start your day right ! Avoid these 5 worst breakfast foods in the morning).
सकाळी उठल्यावर कोणत्या ५ पदार्थांनी दिवसाची सुरुवात करु नये ?
१. कॉफी :- बऱ्याचजणांना सकाळी उठल्यावर आधी कॉफी पिण्याची सवय असते. परंतु न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांच्या मते, सकाळी कॉफी पिणे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे आहे. सकाळी आपल्या शरीरात स्ट्रेस हार्मोन्स कॉर्टिसॉलचं प्रमाण जास्त असतं. हा हार्मोन्स आपली अलर्टनेस आणि फोकस वाढवण्यास मदत करतं. त्याचबरोबर रक्तदाब आणि पाचनक्रिया प्रत्येक गोष्ट नियंत्रित करतं. सकाळी उठल्याबरोबर कॉफी प्यायल्यास कॉर्टिसॉलच्या पातळीत बिघाड होऊ शकतो. जे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतं. दिवस जसजसा वाढत जातो तसतसे कोर्टिसॉलची पातळी हळूहळू कमी होते, नंतर आपण कॉफी पिऊ शकता.
ब्लॅक कॉफी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का ? ब्लॅक कॉफी कधी आणि कशी प्यावी, पाहा खास टिप्स...
वजन कमी करण्यासाठी ४ मंत्र विसरुच नका ! तापसी पन्नूच्या न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालचा सल्ला...
२. फळांचा ज्यूस :- सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी फळांचा ज्यूस पिणे आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरु शकते.फळांच्या रसामध्ये फायबर नसते आणि सकाळी प्रथम फळांचा ज्यूस घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेह आणि इतर पचनाशी संबंधित आजार असलेल्या लोकांनी शक्यतो सकाळी उठल्यावर फळांचा रस पिणे टाळावे. फळांच्या रसाऐवजी आपण संपूर्ण फळ खाऊ शकता. त्यासोबतच लिंबू पाणी, काकडीचा रस ही पर्यायी पेये घेऊ शकता.
३. नाश्त्यासाठी सिरियल्स घेणे :- आपल्यापैकी बरेचजण सकाळी नाश्त्याला पॅकेजिंग केलेले कॉर्नफ्लेक्स, सिरियल्स खाणे पसंत करतात. जरी हे सकाळच्या नाश्त्याला खाणे चांगले असले तरीही दिवसाची सुरुवात असे पदार्थ खाऊन करु नये. कॉर्नफ्लेक्स, सिरियल्स यांसारखे पॅकेजिंग केलेले पदार्थ हे प्रोसेस्ड फूड असतात. असे पदार्थ दीर्घकाळ चांगले टिकण्यासाठी त्यावर खूप प्रक्रिया केलेली असते. अशा पदार्थात मैदा, साखर, फ्लेवर्ड इसेंन्स यांचे प्रमाण अधिक असेल तर पौष्टिक धान्यांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे शक्यतो सकाळी असे पदार्थ खाणे टाळावे.
मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...
पोट आणि कंबरेचा घेर कमीच होत नाही ? रोज १० मिनिटे करा ६ गोष्टी...
४. पॅनकेक्स व वॅफल्स :- सकाळच्या कामांच्या गडबडीत आपण झटपट बनून तयार होणारा इन्स्टंट नाश्ता बनवणे पसंत करतो. परंतु हा इन्स्टंट नाश्ता बनवणे जितके सोपे असते तितकेच ते आपल्या आरोग्याला बिघडवू शकते. आपली सकाळची भूक भागविण्यासाठी बरेचजण असा इन्स्टंट नाश्ता करतात. सकाळी असा इन्स्टंट नाश्ता खाल्ल्याने आपल्याला दिवसभर अस्वस्थ वाटू शकते.
५. चहा :- झोपेतून उठल्यानंतर लगेच चहा पिणे हे चुकीचे आहे. चहा - कॉफी यांसारखी पेय सकाळी घेतल्याने दिवसाची सुरुवात तर फ्रेश होते परंतु इतर संपूर्ण आरोग्यावर त्याचे हळुहळु वाईट परिणाम दिसू लागतात. सकाळीच चहा प्यायल्याने, त्यात असणाऱ्या साखर, कॅफिन आणि निकोटीनच्या अधिक प्रमाणामुळे आम्लपित्त, पोटात जळजळ आणि रक्तातील साखर वाढू शकते.