प्रत्येकाची जीवनशैली बदलत चालली आहे. अनेकांच्या खराब लाईफस्टाईलचं मुख्य कारण मोबाईल बनत चाललं आहे. आपण रात्री उशिरापर्यंत मोबाईल हातात घेऊन जागता का? उद्या सुट्टीच आहे, आज वेब सिरीज पाहून झोपतो, असे म्हणून तुम्ही झोपेचं खोबरं करता का? किंवा आठवड्यातले पाच दिवस अपुरी झोप घेऊन विकेंडला झोप पूर्ण करता का? अशा झोपेच्या दिनक्रमाकडे लक्ष देणं आवश्यक. झोप अपुरी झाली की, दुसऱ्या दिवशी आपल्या वागण्यावर परिणाम दिसून येते. सतत होणाऱ्या अपुर्या झोपेमुळे शारीरिकसह मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
यासंदर्भात, मसिना हॉस्पिटलमधील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट,डॉ.रुचित शाह म्हणतात, “रात्री उशिरा झोपणे किंवा निद्रानाश होणे ही एक गंभीर समस्या आहे. याच्यामुळे मानसिकसह शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. ज्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराच्या संबंधित आजार, स्ट्रोक, मधुमेह यासह इतर आजार उद्भवण्याची शक्यता आहे.''
हृदयरोग
अनेकांना रात्री जागे राहण्याची सवय लागते, अशा स्थितीत त्यांच्यामध्ये हृदयाच्या संबंधित आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण होते. झोपेतून जागे होणारे चक्र हृदयाचे आणि रक्तवाहिन्यांचे कार्य नियंत्रित करते, हे चक्र बिघडले की त्रास होतो. हेल्थ टेक कंपनी हुमाच्या मते, जे लोक रात्री ११ नंतर झोपतात त्यांच्यामध्ये हृदयरोग किंवा स्ट्रोकचा धोका २५ टक्क्यांनी वाढतो.
टाइप २ मधुमेह
जे लोकं रात्री लवकर झोपतात त्यांना टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. जे लोक उशिरापर्यंत जागतात ते दिवसभरात कमी सक्रिय असतात. झोपेच्या चुकीच्या सवयींमुळे टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो. या आजाराने ग्रस्त असलेले लोकं ६ तासांपेक्षा कमी झोपतात.
डिप्रेशन
द सनच्या रिपोर्टनुसार, सकाळी उशिरापर्यंत झोपणे आणि रात्री जागरण केल्यामुळे, हृदयाच्या संबंधित आजार उद्भवण्याची शक्यता असते. ज्यामुळे मूड स्विंग होतात. अशा परिस्थितीत डिप्रेशन होण्याची शक्यता वाढते. मन नैराश्याच्या स्थितीत जाते. व सकाळी उठल्यानंतर काम करण्याची इच्छा कमी होते.
कर्करोग
सकाळी उशिरापर्यंत झोपणाऱ्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका दुप्पट वाढतो. झोपेची बिघडलेली सवय, कॅन्सरची शक्यता वाढवण्याचे काम करते. असे अनेक संशोधनात आढळून आले आहे.