Join us

उन्हाळ्यात घामाच्या दुर्गंधीने कपड्यांनाही घाणेरडा वास येतो, इन्फेक्शनही होते! दुर्गंधी घालवणारे ६ उपाय पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2025 16:28 IST

stench of sweat can make clothes smell bad and even cause infections! Check out these 6 remedies to get rid of bad odor : शरीराला घामामुळे येणारी दुर्गंधी करा कमी. काही सोपे उपाय करणे ठरेल फायदेशील.

उन्हाळ्यामध्ये घाम तर प्रत्येकालाच येतो. ऊन्हाचे प्रमाण एवढे जास्त असते की घामाच्या धारा लागतात. कपडे तर भिजतातच, चेहर्‍यावरून घाम गळत असतो. (stench of sweat can make clothes smell bad and even cause infections! Check out these 6 remedies to get rid of bad odor.)पाठ संपूर्ण भिजून जाते. काहींच्या तर हाता-पायाच्या तळव्यांनाही भरपूर घाम येतो. घाम जरी प्रत्येकाला आला तरी, काहींच्या घामाला प्रचंड घाण वास येतो. आता आपण म्हणतो की, घाम आल्यावर वास तर येणारच. मात्र तुम्हाला माहिती आहे का? घामाला वास नसतोच. (stench of sweat can make clothes smell bad and even cause infections! Check out these 6 remedies to get rid of bad odor.)जेव्हा त्या घामाचे प्रमाण फारच अति असते आणि तो खाकेमध्ये, पोटऱ्यांपाशी, मांडीजवळ त्वचेमध्ये जिरतो. तेव्हा वास येतो आणि येणारा वास घामाचा नसून तयार झालेल्या बॅक्टेरीयाचा असतो. 

क्लेवलॅण्ड क्लिनिक तसेच मायो क्लिनिक आदी साईट्सवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, घामामध्ये काही खनिजे, पाणी आणि मीठ या तीनच गोष्टी असतात. (stench of sweat can make clothes smell bad and even cause infections! Check out these 6 remedies to get rid of bad odor.)त्यांना वास येत नाही. घाम आल्यावर बॅक्टेरीया प्रथिनांवर आणि शरीराच्या चरबीवर परिणाम करतात. त्या प्रक्रियेमुळे अस्थिर संयुगे तयार होतात आणि मग घाम आल्यावर वास येतो. त्यामुळे घाम पुसला तरी वास जात नाही. शरीरावर तयार झालेला बॅक्टेरीया गेला की मगच तो वास जातो. वास तर येतोच मात्र बॅक्टेरीया वाढल्यावर त्वचेला ऍलर्जीही होते. काही सोपे उपाय करून ही समस्या टाळता येते.

१. अंघोळीच्या पाण्यामध्ये ईडलिंबाची पाने टाकायची. थोडावेळ तशीच ठेवायची पाणी जरा हिरवट झाले की मग त्या पाण्याने अंघोळ करा. ईडलिंबाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुण असतात. बॅक्टेरीया कमी करण्यासाठी ते फायदेशीर आहे. रोज शक्य नसल्यास आठवड्यातून ३ दिवस तरी अशा पाण्याने अंघोळ करा. 

२. अंघोळीच्या वेळी लिंबाचा रस शरीराला लावा. लिंबामध्ये जीवनसत्त्व 'सी' असते. तसेच जिवाणू विषाणू मारण्यासाठी गरजेचे असणारे गुणधर्मही असतात. लिंबू त्वचेवर जरा चरचरु शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन वापरा. 

३. हळद अँण्टीबॅक्टेरीयल असते. हळदीचा लेप मांड्यांना तसेच खाकेमध्ये लावा. सुकेपर्यंत तसेच ठेवा. नंतर धुऊन टाका. 

४. झोपण्याआधी अंगाला खोबरेल तेल लावायचे. तेलामुळे त्वचा मऊ पडते. तसेच त्वचेला खाज सुटत नाही. घामामुळे होणारी जळजळही होत नाही. 

५ . रोज अंगाला पावडर लावा. मेडीकलमध्ये मिळणारी अँण्टीबॅक्टेरीयल पावडर वापरा. त्वचेवर रॅशही उठत नाही घामाचाही त्रास होत नाही. 

६. . आपण वास घालवण्यासाठी सेंट वापरतो. त्यामध्ये असलेले रसायन बॅक्टेरीयामध्ये मिसळते आणि त्याचा त्वचेला आणखी त्रास होतो. त्यामुळे अवयव सतत पाण्याने साफ करा. कापडाने घाम पुसा सेंट वापरू नका.

टॅग्स : हेल्थ टिप्सहोम रेमेडीआरोग्यत्वचेची काळजी