Join us   

पोट डब्ब होतं-धड गॅसही पास होत नाही? चमचाभर हा पदार्थ पाण्यासोबत घ्या, पोट बिघडणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 8:53 PM

How To Get Rid Of Gas Immediately : तुमचं पोट फुगलं असेल आणि पोटात गॅस तयार झाला असेल तर काही सोपे उपाय करून तुम्ही पोटातील गॅसपासून सुटका मिळवू शकता.

पोटात गॅस होण्यासारख्या समस्या अनेकांना उद्भवतात. पोटात गरजेपेक्षा जास्त गॅस तयार झाल्यास  त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करू शकता. (Gas Problem) जर तुमचं पोट फुगलं असेल आणि पोटात गॅस तयार झाला असेल तर काही सोपे उपाय करून तुम्ही पोटातील गॅसपासून सुटका मिळवू शकता.  ओव्याचं पाणी हा एक कमालीचा उपाय आहे.  याच्या सेवनाने गंभीर समस्याही टाळता येतील. (How To Get Rid Of Gas Problem)

वेब एमडीच्या रिपोर्टनुसार ओव्याच्या सेवनाने पोटातील एसिड्स कमी होण्यास मदत  होते. इन्डायजेशन, ब्लोटींग, गॅसची समस्याही उद्भवत नाही.  यामुळे अल्सरचा त्रास कमी होतो. आतडे अन्ननलिका आणि पोट निरोगी राहते.  (Ref) उंदरांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात दिसून आले की ओव्याच्या सेवनाने त्यातील थायमल अतिरिक्त कॅल्शियमला हार्टच्या ब्लड वेसल्समध्ये जाण्यापासून रोखते आणि ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. ओवा वेदना आणि सूज शांत करण्यासाठी देखिल प्रभावी ठरते.

१ महिन्यात ४ किलो वजन कमी करा-आहारतज्ज्ञांनी सांगितलं खास डाएट; मेंटेन राहण्याचं साधं सिक्रेट

पोटातील गॅसचा त्रास दूर करण्यासाठी जीऱ्याच्या पाण्याचे सेवन करा (How To Get Rid Of Gas Immediately)

जीरं फक्त पोटाचा त्रास दूर करत नाहीतर अनेक समस्यांपासूनही सुटका मिळवून देतो. जिऱ्यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात.  यात आयर्न, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी पोषक तत्व असतात. गॅस दूर करण्यासाठी एक चमचा जीर व्यवस्थित कुटून एक ग्लास गरम पाण्यात घालून ५ ते १० मिनिटांसाठी तसंच ठेवून द्या. त्यानंतर गाळून या पाण्याचे सेवन करा. ज्यामुळे पोटात गॅस तयार होण्याची समस्या उद्भवत नाही. 

दही कधी खाता येते

जेव्हा पोट गरजेपेक्षा जास्त फुगते तेव्हा तुम्ही दही  खाऊ शकता. दह्यात प्रोबायोटिक्स असतात. ज्यामुळे पोटाला गट बॅक्टेरियाज मिळतात आणि पोटात गॅस तयार होण्याची समस्या उद्भवत नाही. 

मुलांचा मेंदू तल्लख होईल-स्मरणशक्ती वाढेल; रोज ५ पदार्थ खायला द्या, शार्प माईंड होईल

केळी खाणं अधिक फायदेशीर

जेव्हाही कधी पोट फुगते तेव्हा तुम्ही केळी खाऊ शकता. केळ्यात पोटॅशियम असते. ज्यामुळे शरीरातील फ्लुइड्स रेग्युलेट होण्यास मदत होते. पोटाच्या त्रासापासून आराम मिळतो. 

बडीशेपचे दाणे

बडीशेप (Fennel Seed) खाल्ल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. जेवणानंतर बडीशेप तुम्ही कच्ची खाऊ शकता किंवा यात पाणी घालूनही खाऊ शकता. बडीपशेपेमुळे पोट थंड राहण्यास मदत होते. पोटाच्या वेदना दूर होतात. याशिवाय बडीशेपेच्या सेवनाने पोटातील गॅस आणि ब्लोटींगचा त्रासही होत नाही. 

टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सलाइफस्टाइल