या जगात जो तो आपल्या पोटासाठी जगतो. २ घास पोटात जावे यासाठी दिवसरात्र कष्ट घेणारे अनेक जण आपण पाहिले असतील. मात्र, हेच पोट कधी कधी आपल्या शरीरात विविध आजारांना निमंत्रण देतात. यापैकी मुख्य आजार म्हणजे पोट वेळेवर साफ न होणे. पोट वेळेवर साफ न झाल्यामुळे पित्त, गॅस, ढेकर, जळजळ अशा समस्या उद्भवतात, तसंच अपचनही होते.
आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. निकिता कोहलीने तिच्या इन्स्टाग्रामवर पोट साफ करण्याच्या पद्धती शेअर केल्या आहे. त्यांनी पोट साफ न होण्याच्या कारणे सांगितले. त्यातील मुख्य कारण म्हणजे पुरेसं पाणी न पिणं, व्यायामाचा अभाव, वेळेवर शौचाला न जाणं, चहा-कॉफीचं अतिरेक सेवन व धूम्रपान या सवयी कारणीभूत ठरतात. यावर काही घरगुती उपाय रामबाण उपाय म्हणून काम करतील.
स्वतःला हायड्रेटेड ठेवा
बद्धकोष्ठतेचे सर्वात सामान्य कारण म्हणजे डिहायड्रेशन. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्या. यासह सकाळी देखील भरपूर पाणी पिणे गरजेचं आहे. याने पोट साफ होते. यासह शरीर देखील हायड्रेट राहते.
दलिया
दलिया हे एक सुपरफूड आहे जे प्रथिने, फायबर आणि आवश्यक जीवनतत्वांनी समृद्ध आहे. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी आहारात याचा समावेश करा. पोट साफ न होण्याच्या समयेपासून त्रस्त असाल तर, यावेळी तिखट पदार्थ खाणे टाळा.
ज्येष्ठमध
ज्येष्ठमध ही एक उत्तम आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. जी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यासाठी अर्धा चमचा ज्येष्ठमधाची पावडर घ्या. त्यात अर्धा चमचा गूळ मिसळा. आता हे मिश्रण कोमट पाण्यासोबत प्या. पोट साफ करण्यासाठी हे सर्वोत्तम पर्याय आहे.
अंजीर
बद्धकोष्ठतेपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी अंजीर खा. अंजीर कोमट पाण्यात काही काळ भिजवून नंतर खावे. यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, अशावेळी ते फायदेशीर ठरू शकते.
तूप आणि दूध
रात्री झोपताना एक कप कोमट दुधात तूप मिसळून प्या. असे केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून नैसर्गिक आराम मिळू शकतो.