Join us   

पोट सतत बिघडतं, तुमची एन्झायटी तर वाढत नाही? तज्ज्ञ सांगतात, अस्वस्थतेचं कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2022 8:10 AM

Anxiety Causes Stomach Issue: सारखं पाेट दुखतं असं वाटतं.. पण तपासणी केली तर काहीच नसतं? म्हणूनच तर तज्ज्ञ म्हणतात तुमच्या पोटदुखीचं (gut health issues) कारण जेव्हा शारिरीक नसतं, तेव्हा ते......

ठळक मुद्दे टेन्शन येणं आणि पाेटदुखी..... या दोघांचं एकमेकांशी नेमकं काय कनेक्शन आहे, ते डॉक्टरच सांगत आहेत. 

लहानपणी जवळपास सगळ्यांसोबत झालेला हा एक किस्सा.. अभ्यास करायचा राहून गेला, एखादी वही पुर्ण करायची होती पण नाही झाली किंवा मग गणित, भुगोल, विज्ञान असे अवघड विषयांचे पेपर आहेत, पण अभ्यासच नाही झाला... तर अशा वेळी हमखास एक त्रास व्हायचा आणि तो म्हणजे पोटदुखी (Stomach problems, indigestion issues due to anxiety). कारण असं काही झालं आणि त्याचं टेन्शन आलं की त्याचं रुपांतर आपोआप पोटदुखीत होतं. आता टेन्शन येणं आणि पाेटदुखी (why anxiety causes stomach pain?) यांचा काय बरं संबंध? असा विचार मनात येतो. पण तो संबंध वारंवार जाणवत राहतो. म्हणूनच तर या दोघांचं एकमेकांशी नेमकं काय कनेक्शन आहे, ते डॉक्टरच सांगत आहेत. 

 

काही जणांच्या बाबतीत असे किस्से फक्त लहानपणीच घडतात. पण ज्या लोकांमध्ये खूप जास्त एन्झायटी असते, जे लोक कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊन खूप लवकर पॅनिक होतात, त्यांना मात्र वय वाढलं तरी असा त्रास जाणवतो. अनेकदा पेाटदुखीचं कारण शारिरीक आहे, असं वाटतं आणि ते अनेक तपासण्या करून घेतात. पण कोणत्याच तपासणीत काहीच दोष आढळून आला नाही, तर तुमच्या पोटदुखीचं कारण हे तुमची एन्झायटी आहे, हे लक्षात घ्या. "it's all in your mind" यानुसार आपल्या मनाची अवस्था कशी आहे, यावर आपल्या शरीराची अवस्था खूप जास्त अवलंबून असते. कारण आपलं मन आणि शरीर यांचा खूप जवळचा संबंध असतो, असं HT Lifestyle शी बोलताना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अस्थाना यांनी सांगितलं. 

 

एन्झायटीमुळे कोणकोणते त्रास होऊ शकतात? - एन्झायटीचा सगळ्यात जास्त त्रास आपल्या पोटावर किंवा पचनसंस्थेवर होत असतो. - एन्झायटीमुळे पोटदुखी किंवा पोटात कळ येणे असा त्रास तर होतोच पण त्यासोबत इतरही अनेक त्रास होतात. - डायरिया, कॉन्स्टिपेशन, इरिटेबल बाऊल सिंड्रोम ( Irritable Bowel Syndrome), ब्लोटींग किंवा पोट फुगल्यासारखे वाटणे, छातीत जळजळ होणे, मळमळल्यासारखे वाटणे, असे सगळे त्रासही एन्झायटी वाढल्याने होऊ शकतात.

असे त्रास होण्याचं नेमकं कारण काय? याचं कारण म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटू लागते, तेव्हा आपले शरीर निरुपयोगी पदार्थ शरीरातून फेकू लागतं. अस्वस्थ असताना किंवा घाबरलेलं असताना खूप घाम येणं, हे त्याचंच एक उदाहरण. अशावेळी शरीराची cortisol levels वाढते. त्याचा परिणाम पोटावर, आतड्यांच्या कामावर होतो. 

 

एन्झायटीमुळे पोटाचा त्रास होत असल्यास... कोणत्याही शारिरीक त्रासामुळे नव्हे तर मानसिक त्रासामुळे पोट दुखत आहे, हे तुमच्या लक्षात आलं तर अशा वेळी पोट दुखत असल्यास खालील उपाय करून बघा.. १. मेडिटेशन आणि योगा २. दही, ताक, योगर्ट, चॉकलेट असे प्रोबायोटिक्स घ्या. ३. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ, साखर, गव्हाचे पदार्थ खाणं टाळा. ४. झोप घ्या. ५. फायबर भरपूर प्रमाणात असणारी फळं, भाज्या आणि कडधान्य खा.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समानसिक आरोग्ययोगासने प्रकार व फायदे