ऑक्टोबर हिट संपून आता हळूहळू वातावरणात गारवा येऊ लागला आहे. आता थंडीचे दिवस सुरु झाले असल्याने सकाळी भल्या पहाटे थंडीचे वातावरण पाहायला मिळते. थंडीतील वातावरणातील गारवा सगळ्यांनाच आवडतो. हिवाळा ऋतू कितीही आवडत असली तरी थंडीच्या दिवसांत अनेक लहान - मोठे आजार डोकं वर काढतात. थंडीच्या दिवसांत होणारा सगळ्यांत कॉमन आजार म्हणजे सर्दी. एकदा सर्दी झाली की पुढेच काही दिवस या सर्दीने हैराण होते. सर्दीमुळे काहीवेळा आपल्याला दोन्ही नाकपुड्या चोंदतात. सर्दीने नाक चोंदण्याच्या समस्येमुळे नाकपुड्या बंद होऊन काहीवेळा श्वास घ्यायलाही त्रास होतो. ही समस्या विशेषतः रात्रीच्या वेळी प्रचंड वाढते. बंद नाकामुळे नीट श्वास घेता येत नाही. त्यामुळे नीट झोप देखील लागत नाही. आणि याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो(Stuffy Nose Difficulty In Breathing One Yoga Mudra Will Get Relief ).
सुप्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Celebrity yoga trainer Anshuka Parwani) हिने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंशुका सर्दीमुळे नाक चोंदल्यावर नेमका झटपट उपाय काय करावा हे सांगताना दिसत आहे. चोंदलेल्या नाकाची (Yoga Mudra For Blocked Nose & Congestion In Winter Season) समस्या झटपट दूर करण्यासाठी तिने एक खास उपाय सांगितला आहे. सर्दीने नाक चोंदल्यावर नेमकं काय करावं, ते पाहूयात. या उपायाचा वापर करून मिनिटभरात आपलं चोंदलेल नाक मोकळं होऊन आपण मोकळा श्वास घेऊ शकता(Celebrity fitness trainer Anshuka Parwani tells a Yoga Mudra For Blocked Nose).
नाक चोंदल्यावर नेमकं काय करावं ?
सुप्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी हिने सांगितल्यानुसार, सगळ्यातआधी मांडी घालूं खाली बसा. जर आपली उजवी नाकपुडी सर्दीने चोंदली असेल तर उजव्या हाताचा अंगठा आपल्या हातांच्या पंज्याला चिकटवून घ्यावा. म्हणजेच अंगठा सगळ्या बोटांसमोर आणून हातांच्या तळव्याला स्पर्श करेल असा घेऊन मग उरलेली चार बोट दुमडून हाताची मूठ बंद करा. आता हाताची ही मूठ आपल्या डाव्या हाताच्या काखेत धरा. त्यानंतर आपल्या डाव्या हाताचा तळवा उजव्या हाताच्या कोपरावर ठेवावा. पुढील ३ ते ५ मिनिटे याच स्थितीत बसावे. यादरम्यान, हलकेच श्वास घ्यावा आणि सोडावा. ही मुद्रा केल्याने आपले चोंदलेले नाक हळूहळू मोकळे होण्यास मदत होईल.
जर आपली डावी नाकपुडी सर्दीने चोंदली असेल तर वरील हीच कृती डावा हात वापरुन करावी. आणि जर आपल्या दोन्ही नाकपुड्या चोंदल्या असतील तर दोन्ही हातांचा वापर करुन वरील कृती करावी.
मासिक पाळी वेळेवर यावी म्हणून ५ चुका तुम्हीही करता? पीसीओएस असेल तर 'या' चुका वेळीच टाळा...
मोबाईल चुकीच्या पद्धतीने पकडला की दुखते मान- पाठ- कंबर, पाहा 'ही' आहे मोबाईल पकडण्याची योग्य पद्धत!
ही मुद्रा केल्याने नेमकं होत काय ?
सर्दीने नाकपुड्या चोंदल्यावर त्या मोकळ्या करण्यासाठी ही मुद्रा कशी उपयोगी ठरते हे सांगताना अंशुका म्हणते, खरंतर आपण एकाचवेळी दोन्ही नाकपुड्यांचा वापर करुन श्वास घेत नाही. एकावेळी आपण एकाच नाकपुडीचा वापर श्वास घेण्यासाठी करतो. असे करताना काहीवेळासाठी आपली एक नाकपुडी ही दुसऱ्या नाकपुडी पेक्षा अधिक जास्त अॅक्टिव्ह असते. दर काही तासांनी हे बदलत असेल, अशाप्रकारे काही काळासाठी अनुक्रमे एक एक नाकपुडी अॅक्टिव्ह असते. याचा परिणाम दिवसभरातील तुमच्या सर्व अॅक्टिव्हिटीज आणि उर्जेवर होतो. आधुनिक विज्ञानात याला 'अनुनासिक चक्र' असे म्हटले जाते. जर तुम्ही प्राचीन ऋषीमुनींची चित्रे पाहिली असतील, विशेषत: जे हिमालयात रहायचे, त्यांच्या काखेखाली एक लाकडाची इंग्रजी (T) टी आकारातील स्टिक ठेवायचे, यामुळे नाकपुडी अॅक्टिव्ह होण्यास आणि दिवसभरासाठी ऊर्जा सक्रिय करण्यासाठी मदत होते.