Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हाय बीपीचा त्रास- कधीही चक्कर येते? रोज 'या' फळाचा रस प्या; दीपिका पदुकोणच्या डायटिशियनचा सल्ला

हाय बीपीचा त्रास- कधीही चक्कर येते? रोज 'या' फळाचा रस प्या; दीपिका पदुकोणच्या डायटिशियनचा सल्ला

Suffering from high blood pressure? This one drink can help : डायटीशियन श्वेता शाह यांनी उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी १ घरगुती उपाय सांगितला आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2024 05:45 PM2024-08-21T17:45:17+5:302024-08-21T17:49:01+5:30

Suffering from high blood pressure? This one drink can help : डायटीशियन श्वेता शाह यांनी उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी १ घरगुती उपाय सांगितला आहे..

Suffering from high blood pressure? This one drink can help | हाय बीपीचा त्रास- कधीही चक्कर येते? रोज 'या' फळाचा रस प्या; दीपिका पदुकोणच्या डायटिशियनचा सल्ला

हाय बीपीचा त्रास- कधीही चक्कर येते? रोज 'या' फळाचा रस प्या; दीपिका पदुकोणच्या डायटिशियनचा सल्ला

वाढतं वय आणि तणावामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते (Blood Pressure). उच्च रक्तदाबाला सायलेंट किलरही म्हणतात. यामुळे हृदयाच्या निगडीत समस्या, पक्षाघात यांसारखी जीवघेणे आजार निर्माण होऊ शकतात (Health Tips). तज्ज्ञांच्या मते, रक्तदाबाची सामान्य पातळी (BP नॉर्मल रेंज) 80/120 mmHg आहे. जर आपल्यालाही उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर, वेळीच यावर उपचार घेणे गरजेचं आहे. गोळ्या औषधांव्यतिरिक्त आपण अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) आहारतज्ज्ञांनी सांगितलेल्या एक घरगुती उपायही करून पाहू शकता.

डायटीशियन श्वेता शाह यांच्या मते, 'सकाळी बीटरूटचा रस प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येऊ शकते.  बीटरूटचा रस प्यायल्याने सिस्टोलिक रक्तदाब सरासरी ४-५ गुणांनी कमी होतो. २०१२ अभ्यासाचा रेफ्रेन्स देत त्यांनी उच्च रक्तदाबासाठी या घरगुती उपायाबद्दल सांगितले(Suffering from high blood pressure? This one drink can help).

उच्च राक्तदाबाच्या समस्येवर बीटरूट कसे काम करते?


आहारतज्ज्ञांच्या मते, बीटरूटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात. जे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होते. त्याच्या मदतीने रक्त वाहून नेणाऱ्या नसा शिथिल होतात आणि रक्तदाब सामान्य होतो.

मुलांशी सतत वादावादी-कडाक्याची भांडण? जनरेशनवर गॅप विसरा, करा फक्त ४ गोष्टी-मुलांशी पटेल मस्त

बीटरूट ज्यूस पिण्याची योग्य वेळ कोणती?

बीटाचा रस आपण कोणत्याही वेळी पिऊ शकता. पण तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्याच्या एक तास आधी बीटाचा रस प्यायल्याने शरीराला संपूर्ण फायदा मिळू शकतो.

बसायला जागा मिळवायची म्हणून पाहा महिला कशी चढली गाडीत.. कौतुक करावं की..

बीटाच्या रसाचे इतर फायदे

हेल्थलाइन या वेबसाईटनुसार, 'उच्च रक्तदाबाची पातळी नियंत्रित करण्यासोबत स्टॅमिना वाढवण्याचं काम बीटाचा रस करते. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. शिवाय यात आयर्न, फोलेट आणि मँगनीज असते. जर आपण हृदयविकार, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल किंवा यकृताच्या आजाराने त्रस्त असाल तरीही बीटरूटचा रस पिणे सुरू करा.

Web Title: Suffering from high blood pressure? This one drink can help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.