Join us   

पाईल्समुळे त्रस्त आहात? ४ योगासने - मुळव्याधीच्या समस्येपासून मिळेल आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2023 1:29 PM

4 Effective Yogasanas for Curing Piles मुळव्याध हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. यासमस्येपासून आराम देतील ४ योग

बदलता आहार आणि लाईफस्टाईलमुळे बहुतांश जणांना मूळव्याध म्हणजेच पाईल्स या समस्येला सामोरे जावे लागते. हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जर मूळव्याधीची समस्या असल्यास, हा आजार इतर घरातील सदस्यांना देखील होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, मूळव्याधामध्ये व्यक्तीला  गुदद्वाराच्या जवळील नसांमध्ये सूज येते. तीव्र अतिसार, गर्भधारणा, आतड्यांवर ताण येणे, जड वस्तू उचलणे यामुळे देखील मूळव्याधीची समस्या उद्भवू शकते. यात सुरुवातीच्या स्टेजमध्ये रक्तस्त्राव होतो. त्यामुळे शरीरातील रक्त पुरवठा कमी होतो. यासाठी ४ योग येईल कामी.

पवनमुक्तासन

पवनमुक्तासन हा एक योगचा प्रकार आहे. हे आसन केल्याने पचनक्षमतेचे कार्य व्यवस्थित होते. हे आसन अधिक करून पचनाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी करावा असा सल्ला दिला जातो. हे आसन केल्याने पोटातील अतिरिक्त हवा बाहेर पडते. त्यामुळे मूळव्याधीची समस्या काही प्रमाणात कमी होते. याने पोटदुखी देखील कमी होते. महिलांसाठी हे आसन खूप उपयुक्त ठरते. गर्भाशयाशी निगडीत अनेक समस्या हे योग केल्याने दूर होते.

सर्वांगासन

सर्वांगासन केल्याने ब्लड सर्क्युलेशन योग्यरित्या काम करते. या आसनामध्ये संपूर्ण शरीराचा तोल खांद्यावर पडतो. हे आसन नियमित केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होते. यात हृदयाच्या स्नायूंना ताण पडल्यामुळे अशुद्ध रक्ताचे हृदयाकडे अधिक वहन होते. हा योग केल्याने  मूळव्याधाच्या समस्येपासून काहीसा आराम मिळतो.

अर्ध मत्स्येद्रासन

अर्ध मत्स्येद्रासन हा योगचा उत्तम प्रकार आहे. अर्ध म्हणजे अर्धा, मत्स्य म्हणजे मासा आणि इंद्र म्हणजे देव. अर्ध मत्स्येद्रासन या योगात शरीराला अर्धवट वाकवणे किंवा फिरवणे. या आसनाचे अनेक फायदे आहेत. याने फुफ्फुसांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहचण्यास मदत मिळते. यासह गुप्तांगांसाठी देखील फायदेशीर आहे. हा योग केल्याने पचनशक्ती मजबूत होते. पोटाच्या समस्येपासून हा योग आराम देतो.

बाल मुद्रा आसन

बाल मुद्रा आसन केल्याने पोटाच्या निगडीत समस्या दूर होतात. याला चाईल्ड पोझ देखील म्हणतात. याच्या नियमित सरावामुळे शरीराला अनेक फायदे होतात. या आसनात शरीर गर्भाच्या स्थितीत जाते. त्यामुळे अॅसिडिटी, पचनसंस्थेच्या निगडीत समस्या दुर होतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सयोगासने प्रकार व फायदेआरोग्य