Join us   

शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवतील ५ पदार्थ; रोज खा - ना शुगर वाढेल, ना तब्येत बिघडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 9:58 AM

Sugar Control Food : रक्तातील साखरेच्या समस्येचा सामना करणार्‍या मधुमेही आणि प्रीडायबेटिक लोकांसाठी काही आहार टिप्स शेअर केल्या आहेत.

रक्तातील साखर (Diabetes Care Tips)  ही शरीरातील ग्लुकोजची मात्रा आहे जी तुम्ही खाल्लेल्या अन्नातून येते आणि उर्जेचा मुख्य स्त्रोत आहे. पण जेव्हा ही पातळी वाढू लागते, तेव्हा मधुमेह आणि प्रीडायबेटिसची स्थिती निर्माण होऊ लागते. प्रीडायबेटिस म्हणजे काय? यामध्ये ब्लड शुगर वाढते पण एवढी वाढत नाही की ती मधुमेहाच्या श्रेणीत ठेवावी. (Nutritionist lovneet batra shared 5 natural insulin to control high sugar level in diabetic and prediabetic patients)

वयानुसार रक्तातील साखर किती असावी?

6 वर्षाखालील मुलांसाठी 110 ते 200 mg/dL, 6-12 वयोगटातील मुलांसाठी 100 ते 180 mg/dL, 13-19 वयोगटातील मुलांसाठी 90 ते 150 mg/dL. यापेक्षा मोठ्या लोकांसाठी, सामान्य पातळी 90 ते 150 mg/dL असते. यापेक्षा जास्त रक्तातील साखर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते. हे डोळ्याच्या रक्तवाहिन्यांना देखील नुकसान पोहोचवू शकते, ज्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथी आणि अंधत्व येते.

पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी असंतुलित रक्तातील साखरेच्या समस्येचा सामना करणार्‍या मधुमेही आणि प्रीडायबेटिक लोकांसाठी काही आहार टिप्स शेअर केल्या आहेत. त्यांनी त्यांच्या इन्स्टा पोस्टमध्ये लिहिले की विरघळणारे फायबर रक्तदाब वाढण्यापासून रोखते आणि साखरेचे शोषण कमी करण्यास मदत करू शकते.

डायबिटीस वाढण्याची लक्षणं

वारंवार मूत्रविसर्जन

थकवा

वाढलेली तहान

धूसर दृष्टी

डोकेदुखी

आहारात या पदार्थांचा समावेश करा

हरभरा

हरभऱ्यामध्ये आहारातील फायबरचे प्रमाण खूप जास्त असल्याचे पोषणतज्ज्ञ सांगतात. विशेषतः, रॅफिनोज नावाचा विरघळणारा फायबर, जो रक्तातील साखर कमी करण्याचे काम करतो.

सफरचंद

दररोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरांची फी वाचू शकते हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. कारण सफरचंद अनेक आजारांना दूर ठेवण्याचे काम करते. मधुमेह हा देखील या आजारांपैकी एक आहे. खरं तर, सफरचंद हे विरघळणाऱ्या फायबर पेक्टिनचा चांगला स्रोत आहे, जे साखरेचे शोषण कमी करण्याचे कार्य करते. आणि रक्तातील साखर वाढण्यापासून रोखते.

ओट्स

ओट्समध्ये सोल्यूबल आणि इन्सोल्यूबल दोन्ही प्रकारचे फायबर असते, परंतु विरघळणारे फायबर विशेषतः फायदेशीर आहे. कारण शरीर विरघळणारे फायबर तुमच्या रक्ताद्वारे शोषल्याशिवाय तुमच्या पोटात जाते. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी न वाढता तुमचे पोट भरलेले राहते. हे आतड्यांतील जीवाणूंसाठी उपयुक्त प्रीबायोटिक म्हणून देखील कार्य करते.

पावसाळ्यात गुडघेदुखी, सांधेदुखी वाढलीये? ४ उपाय, तब्येत कायम राहील ठणठणीत

जवस

जवसातमध्ये सुमारे 6 ग्रॅम फायबर असते जे बहुतेक विरघळणारे फायबर असते, जे कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर कमी करण्याचे काम करते. हे जळजळ कमी करणे आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर करणे यासारखे फायदे देखील देते.

तुळशीच्या बीया

तुळशीच्या बिया म्हणजे उच्च फायबरचा स्रोत आहेत. याचे सेवन चयापचय कमी करण्यास मदत करते आणि कार्ब्सचे ग्लुकोजमध्ये रूपांतर नियंत्रित करते. हे सुपरफूड म्हणून ओळखले जाते. जे टाइप 2 मधुमेह असलेल्यांसाठी खूप फायदेशीर आहे.

टॅग्स : मधुमेहहेल्थ टिप्सआरोग्य