Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Sugar Level control tips : रोजच्या जेवणात ३ पदार्थांचा समावेश करा; वाढणार नाही ब्लड शुगर, CDC चा दावा

Sugar Level control tips : रोजच्या जेवणात ३ पदार्थांचा समावेश करा; वाढणार नाही ब्लड शुगर, CDC चा दावा

Sugar Level Control Tips : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगभरात 422 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. हा धोकादायक आजार जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 11:40 AM2022-06-03T11:40:37+5:302022-06-03T13:36:09+5:30

Sugar Level Control Tips : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगभरात 422 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. हा धोकादायक आजार जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण आहे.

Sugar Level Control Tips : According to cdc diabetes patients include these 3 foods in yourmeal plate to control blood sugar level | Sugar Level control tips : रोजच्या जेवणात ३ पदार्थांचा समावेश करा; वाढणार नाही ब्लड शुगर, CDC चा दावा

Sugar Level control tips : रोजच्या जेवणात ३ पदार्थांचा समावेश करा; वाढणार नाही ब्लड शुगर, CDC चा दावा

डायबिटीस मेलिटस (Diabetes Mellitus) हा एक गंभीर रोग आहे ज्यावर कायमस्वरूपी उपचार नाही. या आजारात शरीराचा मुख्य अवयव स्वादुपिंड हा इन्सुलिन नावाच्या संप्रेरकाचे उत्पादन कमी करतो किंवा थांबवतो. हा असा एक हार्मोन आहे, जो रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करतो. तसे न केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. (According to cdc diabetes patients include these 3 foods in yourmeal plate to control blood sugar level)

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) च्या मते, मधुमेहाचे तीन मुख्य प्रकार आहेत:  टाईप 1, टाईप 2 आणि गर्भधारणा मधुमेह. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगभरात 422 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. हा धोकादायक आजार जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण आहे. (Sugar Level Control Tips)

मधुमेहावर उपचार काय?

मधुमेहावर अद्याप कोणताही इलाज नाही, परंतु वजन कमी करणे, निरोगी खाणे आणि शारीरिकदृष्या सक्रिय असणे खरोखर मदत करू शकते. आवश्यकतेनुसार औषधे घेणे, मधुमेहाविषयी जाणून घेणे आणि आरोग्य विषयक नियमांचे पालन केल्याने मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. निरोगी आहाराद्वारे मधुमेह कसा नियंत्रित करता येईल हे CDC ने स्पष्ट केले आहे. सीडीसीच्या मते, तुमच्या जेवणाच्या ताटात चव आणि आरोग्य या दोन्ही दृष्टीने चांगल्या गोष्टींचा समावेश असावा.

आपलं हृदय आजारी पडतंय कसं ओळखाल? ४ वॉर्निंग साइन्स, हार्ट अटॅकचा धोका ओळखा

उदाहरणार्थ, स्टार्च नसलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करा, जसे की ब्रोकोली, पालक आणि फरसबी. परंतु कमी साखर आणि शुद्ध धान्य जसे की व्हाईट ब्रेड, भात आणि पास्ता यांसारख्या पदार्थांचा प्रति सर्व्हिंगमध्ये 2 ग्रॅमपेक्षा कमी समावेश करा. आपल्या आहारात शक्य तितक्या सर्व प्रकारच्या पदार्थांचा समावेश करा. जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ टाळले पाहिजेत.

 वाढलेलं कोलेस्ट्रेरॉल अन् बीपी कंट्रोल करण्यासाठी रामबाण आहे 'हे' भारतीय फळ; हार्वर्ड तज्ज्ञांचा दावा

मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घेतले पाहिजे. कधी, काय आणि किती खावे हे त्यांना कळायला हवे. यासाठी सीडीसीने एक उत्तम जेवण योजना तयार केली आहे, जी तुम्हाला चवीसोबतच आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते.

कार्बोहायड्रेट्सवर लक्ष ठेवल्याने तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येते. तुम्ही दररोज किती कार्ब खाऊ शकता हे शोधण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी किंवा आहारतज्ज्ञांशी संपर्क करा. सीडीसी मधुमेहाच्या रुग्णांना 9-इंच प्लेटमध्ये खाण्याची शिफारस करते. किंबहुना मधुमेही रुग्ण जेवताना ते काय आणि कोणत्या प्रमाणात खात आहेत हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे संस्थेचे मत आहे. यासाठी प्लेटचे तीन भाग केले जातात.

- स्टार्च नसलेल्या भाज्या जसे की कोशिंबिर, फरसबी, ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी आणि गाजर प्लेटच्या अर्ध्या भागात ठेवा.

- चिकन, बीन्स, टोफू किंवा अंडी यासारखे प्रथिनेयुक्त पदार्थ प्लेटच्या एक चतुर्थांश भागामध्ये ठेवा.

- कार्बोहायड्रेट पदार्थ एक चतुर्थांश ठेवा. यामध्ये धान्य, पिष्टमय भाज्या (जसे की बटाटे आणि वाटाणे), तांदूळ, पास्ता, बीन्स, फळे आणि दही यांचा समावेश होतो.

- मधुमेहावर कायमस्वरूपी इलाज नाही, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना सकस आहार, व्यायाम आणि सक्रिय जीवनशैली जगण्याचा सल्ला दिला जातो.  कोणतीही आहार योजना किंवा नियम अंगीकारण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Web Title: Sugar Level Control Tips : According to cdc diabetes patients include these 3 foods in yourmeal plate to control blood sugar level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.