रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहावी (Diabetes Care) यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी आपली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींची काळजी घेणे गरजेचे आहे. (Diabetes Control Tips) साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय आहेत. तज्ज्ञांच्या मते, तुळशी, ऑलिव्ह आणि गुडमार यांसारख्या वनस्पतींची हिरवी पाने तुम्हाला मधुमेहाच्या समस्येमध्ये फायदेशीर ठरतील. (How to control Sugar level)
ऑलिव्ह
ऑलिव्हची पाने चघळल्यानेही फायदा होईल. जर टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णांनी ऑलिव्हच्या पानांचे सेवन केले तर ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. वर्ष 2013 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, संशोधकांना असे आढळून आले की ऑलिव्हच्या पानांच्या सेवनाने इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारते. या अभ्यासात 46 लोकांना ऑलिव्हची पाने खायला दिली गेली आणि 12 आठवड्यांनंतर असे दिसून आले की त्याचा मधुमेहाच्या रुग्णांना फायदा झाला.
वय कमी पण चेहरा वयस्कर वाटतो? ५ फेशियल योगा प्रकार, आयुष्यभर येणार नाहीत सुरकुत्या
गोड तुळस
स्टीव्हिया म्हणजे गोड तुळस मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. 2018 च्या अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की ज्या रुग्णांनी गोड तुळस खाल्ली त्यांना रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत झाली. अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) आणि अमेरिकन डायबिटीज असोसिएशन (एडीए) नुसार गोड तुळशीच्या पानांचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
गुडमार
औषधी गुणधर्मांनी समृद्ध, गुडमार रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी ओळखले जाते. 2013 च्या अभ्यासानुसार, जेव्हा टाइप 1 आणि टाइप 2 च्या रूग्णांना 18 महिने जास्वंदाची पाने दिली गेली तेव्हा त्यांच्यामध्ये इन्सुलिन घेतलेल्या लोकांपेक्षा जास्त फरक होता. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली.
फक्त ६ गोष्टी वाढवतील तुमचं आयुष्य; तज्ज्ञांनी सांगितलं निरोगी दीर्घायुष्याचं सोपं सिक्रेट
टर्निप
टर्निपमध्ये म्हणजेच पानांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. अभ्यासानुसार, टाइप 1 मधुमेह असलेल्या लोकांनी फायबरचे सेवन केल्यास ते रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. टर्निपची पाने चघळल्याने टाइप २ मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर, लिपिड आणि इन्सुलिनची पातळी सुधारते.