उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.(Summer health problems) पोटादुखी, अपचन, डिहायड्रेशनची समस्या यांसारखे आजार उद्भवतात. उन्हामुळे त्वचा टॅन होणे, सतत तहान किंवा लघवीला येणे हा त्रास सुरु होतो. रखरखत्या उन्हात घराच्या बाहेर गेल्याने आपण घामाने भिजतो.(Why do hands and legs sweat excessively) परंतु अनेकदा आपल्या हाता-पायांना सतत घाम येतो.
उन्हाळ्यात हातांना वारंवार घाम येणे ही एक सामान्य समस्या आहे, ज्याला हायपरहाइड्रोसिस असं म्हटलं जाते.(Sweaty hands and feet causes) जेव्हा आपल्या घामाच्या ग्रंथी सामान्यपेक्षा जास्त सक्रिय होतात तेव्हा ही परिस्थिती उद्भवते. घाम आल्याने शरीरातील तापमान नियंत्रित राहाते. (Summer sweating issues and solutions)परंतु, हाताला सतत घाम आल्याने आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. जेव्हा आपण कुणाला तरी शेक हॅन्ड करतो, मोबाईल किंवा लॅपटॉप वापरतो तेव्हा ही समस्या आणखी त्रासदायक ठरु शकते. याची कारणे आणि उपाय काय जाणून घेऊया. (Hyperhidrosis causes and treatment)
रोज थंड पाण्याने आंघोळ केली तर...? शरीराला मिळतात ६ जबरदस्त फायदे
हातांना घाम का येतो?
1. हायपरहाइड्रोसिस - ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीरातील घामाच्या ग्रंथी जास्त घाम निर्माण करतात. ज्यामुळे हात आणि पायांवर जास्त परिणाम होतो.
2. ताण आणि चिंता - अति ताण किंवा सतत चिंतेत असाल तर साहाजिकच हातांना घाम येणे सामान्य आहे.
3. उष्ण आणि दमट हवामान- उन्हाळ्यात वातावरणातील आर्द्रता जास्त असल्यामुळे आपल्याला घाम जास्त येतो.
4. थायरॉइड समस्या - थायरॉइड ग्रंथातील अनियमिततेमुळेही हातांना जास्त प्रमाणात घाम येऊ शकतो.
5. कॅफिन आणि मसालेदार पदार्थ - जास्त मसालेदार पदार्थ आणि कॅफिनचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढून घाम येऊ शकतो.
रोजच्या 'या' ६ पदार्थांमुळे हाडं होतात ठिसूळ!वाढते कॅल्शियमची कमतरता, पाठ-कंबरेचं दुखणं कायमच...
हातांना सतत घाम येत असेल तर हे उपाय करा
1. अँटीपर्स्पिरंट वापरा - हातांवर अँटीपर्स्पिरंट लावल्याने घामाच्या ग्रंथी नियंत्रित होतात, ज्यामुळे हातांना येणारा घाम कमी होतो.
2. बेकिंग सोडा - बेकिंग सोड्यामध्ये अँटीपर्स्पिरंट गुणधर्म असतात. ते पाण्यात मिसळून हातांना लावल्यास घाम कमी होण्यास मदत होते.
3. ॲपल सायडर व्हिनेगर- ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये असलेले अॅस्ट्रिंजंट घटक हातांना जास्त घाम येण्यापासून रोखतात.
4. पुदिना आणि कडुलिंबाचे पाणी - पुदिना आणि कडुलिंबाच्या पाण्याने हात धुतल्याने तुम्हाला फ्रेश राहण्यास मदत होते. तसेच हातावर येणारा घामही कमी होतो.
5. टॅल्कम पावडर- हातावर टॅल्कम पावडर लावल्याने घाम शोषण्यास मदत होते आणि हात कोरडे राहतात.