दिवसेंदिवस तापमानात अधिकच वाढ होत आहे. (Summer Health Tips) अशा स्थितीत निवडणूकांच्या प्रचारासाठी काम करणं काही सोपं नाही. २४ फेब्रुवरीला एका रॅलीत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तब्येत बिघडली. (Summer Health Care) आता ते एकदम फिट आणि निरोगी आहेत. नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगतिले की, त्यांची तब्येत आता पूर्णपणे बरी आहे. रॅलीदरम्यान त्यांना उन्हामुळे अस्वस्थ वाटत होतं. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. (Consume These 2 Homemade Drinks Before Leaving Home in Summer To Prevent Heat)
ऊन्हाळ्याचा त्रास टाळण्यासाठी कोणते ड्रिंक्स घ्यावेत?
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहाड्रेशन आणि हिट स्ट्रोकची समस्या उद्भवते. ज्यामुळे फक्त पाण्याची कमतरता भासत नाही तर जास्त घाम येणं, उलट्या होणं, लघवीला त्रास होणं अशा समस्या उद्भवतात. जॉन हॉपकिन्सच्या रिपोर्टनुसार डिहायड्रेशनची समस्या उद्भवल्यास चक्कर येणं, डोके दुखी, श्वास घ्यायला त्रास होणं अशा समस्या उद्भवू शकतात. यापासून बचावासाठी तुम्ही घरातून निघताना सातूचे सरबत किंवा लिंबू पाणी पिऊ शकता.
Tribute to the great mathematician Srinivasa Ramanujan on his death anniversary. 🙏🏻#SrinivasaRamanujanpic.twitter.com/RqTYayktTt
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) April 26, 2024
सातूचे सरबत
ऊन्हाळ्याच्या दिवसांत मसालेदार किंवा गोड सातूचे सरबत पिऊन तुम्ही तब्येतीची काळजी घेऊ शकता. ज्यामुळे फक्त शरीर थंड राहत नाही. यात फायबर्स, इलेक्ट्रोलाईट्स, प्रोटीन्सही मिळतात. काळं मीठ, लिंबांचा वापर करू शकता.
लिंबू पाणी
जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि सातू सरबत बनवता येत नसेल. त्यामुळे एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस, काळे मीठ आणि हलकी साखर मिसळून प्या. हे इलेक्ट्रोलाइट्सचे भांडार आहे आणि शरीराला पाणी एनर्जी पुरवते. उन्हाळ्यात दररोज याचे सेवन करावे. लिंबू पाण्याऐवजी तुम्ही लेमन सोडा पिऊ शकता याशिवाय संत्र्याचा रस, मोसंबीचा रसही उत्तम ठरतो.