Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यात गॅस-ॲसिडीटीमुळे मळमळ, छातीतही दुखते? ५ सोप्या टिप्स, अपचनाचे त्रास लगेच होतील कमी

उन्हाळ्यात गॅस-ॲसिडीटीमुळे मळमळ, छातीतही दुखते? ५ सोप्या टिप्स, अपचनाचे त्रास लगेच होतील कमी

Summer acidity relief tips: Home remedies for bloating and acidity: How to reduce chest pain from acidity: Natural ways to relieve bloating: Summer season stomach discomfort remedies: Easy tips for acidity relief: Relieve bloating with simple home remedies: आपल्यालाही या समस्यांना वारंवार सामोरे जावे लागत असेल तर हे सोपे उपाय नक्की करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2025 16:12 IST2025-03-25T15:57:29+5:302025-03-25T16:12:31+5:30

Summer acidity relief tips: Home remedies for bloating and acidity: How to reduce chest pain from acidity: Natural ways to relieve bloating: Summer season stomach discomfort remedies: Easy tips for acidity relief: Relieve bloating with simple home remedies: आपल्यालाही या समस्यांना वारंवार सामोरे जावे लागत असेल तर हे सोपे उपाय नक्की करुन पाहा.

summer season gas acidity stomach chest pain how to relief bloating problem do this home remedies simple 5 easy tips | उन्हाळ्यात गॅस-ॲसिडीटीमुळे मळमळ, छातीतही दुखते? ५ सोप्या टिप्स, अपचनाचे त्रास लगेच होतील कमी

उन्हाळ्यात गॅस-ॲसिडीटीमुळे मळमळ, छातीतही दुखते? ५ सोप्या टिप्स, अपचनाचे त्रास लगेच होतील कमी

उन्हाळा सुरु झाला की, आपल्या आरोग्यावर अनेक परिणाम होतात. वाढत्या उन्हामुळे आपल्याला डिहायड्रेशन, अपचन, गॅस सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. (Summer acidity relief tips)मसाल्याचे, तेलाचे पदार्थ खाल्ल्याने पोट फुगल्यासारखं किंवा गच्चं झाल्यासारखं वाटतं. (Home remedies for bloating and acidity)
बदलेल्या जीवनशैलीमुळे आपण एकाच ठिकाणी तासन्तास बसल्याने, शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे, चहा-कॉफीचे सेवन अति प्रमाणात केल्याने पोट फुगण्याचा, गॅसेसच्या, मळमळ आणि छातीत दुखण्यासारख्या समस्यांना सामोरे जावं लागते.(How to reduce chest pain from acidity) अनेकदा छातीत दुखणे किंवा पोटदुखीची समस्या उद्भवते तेव्हा लोक घाबरतात. हृदयविकाराचा झटका किंवा अगदी अपेंडिक्सची समस्या असे वाटू लगाते. पोटात गॅस तयार होणे आणि तो शरीरातून बाहेर पडणे हा पचनाचा एक भाग आहे. परंतु, हा वायू कधीकधी पोटात अडकून राहिल्याने आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जर आपल्यालाही या समस्यांना वारंवार सामोरे जावे लागत असेल तर हे सोपे उपाय नक्की करुन पाहा. (Easy tips for acidity relief)

रोज सकाळी प्या १ कप ‘गुलाबी चहा!‘ दिवसभर थकवा गायब, स्ट्रेस होईल कमी-चेहऱ्यावर ग्लो

1. जर आपल्या पोटात गॅस झाला असेल तर आपल्याला शरीराची हालचाल करायला पाहिजे. यासाठी आपण शतपावली किंवा व्यायाम करायला हवा. ज्यामुळे पोटातून गॅस बाहेर पडण्यास मदत होईल. गॅस-ब्लोटिंगची समस्या दूर होईल. 

2. पोटाच्या ज्या ठिकाणी आपल्याला वेदना होत आहे. त्या ठिकाणी हलक्या हाताने मालिश करायला सुरुवात करा. जेव्हा आपण हे असे करु तेव्हा पोटातील गॅस बाहेर पडण्यास मदत होईल. तसेच अशावेळी हिंगाचे पाणी पोटावर लावल्याने देखील आराम मिळतो. 

3. पोटात दुखत असेल किंवा ब्लोटिंगची समस्या होत असेल तर यासाठी आपण काही योगासने करायला हवी. त्यासाठी जमिनीवर झोपावे लागेल. यानंतर दोन्ही पाय हवेत उचलून पोट आणि छातीजवळ वाकवा. दोन्ही हातांनी पायांना घट्ट वेढा मारा. या स्थितीमध्ये २० मिनिटे राहा. असे केल्याने पोटातील गॅस बाहेर पडण्यास मदत होईल. 

4. ब्लोटिंगच्या समस्येमुळे वैतागले असाल तर कोमट पाणी किंवा हर्बल टी प्या. यामध्ये आपण पुदीन्याचा किंवा आल्याचा चहा घेऊ शकतो. यात असणारे घटक अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसेसच्या समस्येपासून आराम देतात. 

5. पोटात गॅस तयार झाल्याने आपल्याला सतत ब्लोटिंगची समस्या होते. नसा देखील फुगतात. त्यामुळे उठताना-बसताना त्रास होतो. अशावेळी स्वयंपाकघरात असणारे बडीशेप, जिरे, धणे आणि हळद यांसारख्या मसल्यांचे पाणी तयार करुन प्यावे. त्यामुळे आराम मिळतो. 

 

Web Title: summer season gas acidity stomach chest pain how to relief bloating problem do this home remedies simple 5 easy tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.