Join us   

आंबे खाल्ले-उष्णता वाढली-चेहऱ्यावरच्या पुटकुळ्यांनी हैराण? ३ सोपे उपाय, ऋजुता दिवेकर सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2023 5:49 PM

Summer Care Tips For Skin & Health By Celebrity Nutritionist Rujuta Diwekar : अनेकांना आंबे खाल्ले की चेहऱ्यावर मुरुम-पुटकुळ्या येण्याचा त्रास होतो? त्यावर उपाय काय?

उन्हाळा म्हटलं की आपल्याला अनेक शारीरिक समस्या व त्वचेसंबंधित वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. वाढत्या उष्णतेमुळे आणि गरम्यामुळे आपल्या त्वचेवर पुरळ किंवा रॅशेज येऊ शकतात. हवामानातील बदलामुळे मुरुम, पुटकुळ्या आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासोबतच उन्हाळा ओळखला जातो तो खास आंब्यांसाठी. उन्हाळ्यात येणारे आंबे खाण्याची मज्जा काही औरच असते. आंबा हे वर्षातून एकदा येणारे फळ आहे त्यामुळे ते मनसोक्त, पोट भरून खाल्ले जातात. 

आंबा खाताना आपण कसलाही विचार न करता हवे तेवढे आंबे खाऊन मन तृप्त करुन घेतो. असे असले तरीही आंबा खाल्ल्यानंतर आपल्या शरीरावर त्याचे परिणाम दिसू लागतात. जास्त आंबे खाल्ल्याने अंगावर पुरुळ आणि पिंपल्स देखील येऊ शकतात. वास्तविक आंबा हा उष्ण गुणधर्माचा असतो, अशा स्थितीत आवश्‍यकतेपेक्षा जास्त आंबे खाल्ल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत उष्णतेमुळे चेहऱ्यावर मुरुम, फोड आणि पुरळ येऊ शकतात. आंबा खाल्यानंतर चेहेऱ्यावर मुरूम, पुरळ येऊ नयेत म्हणून सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सोपे ३ उपाय सांगितले आहेत... ते नेमके कोणते आहेत ते पाहूयात(Summer Skin Care: Nutritionist Rujuta Diwekar Shares 3 Secrets For Healthy, Flawless Skin).

जास्त आंबे खाल्ल्यानंतर अंगावर पुरळ किंवा पिंपल्स का येतात ? 

माफक प्रमाणात आंबा खाणे त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असते. पण आंबा खाल्ल्यानंतर काहीजणांना अंगावर पुरळ येण्याची समस्या जाणवू लागते.    “आंब्यामध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे इंसुलिन प्रतिरोधक लोकांना पिंपल वाढल्याचे जाणवू शकते. याचा अर्थ असा होतो की ते रक्तातील साखर वाढवते. फक्त आंबाच नाही तर उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले कोणतेही पदार्थ (चॉकलेट, गोळ्या, पेस्ट्री, जंक फूड इ.) खाल्ल्यास आपल्या शरीरात ब्लड शुगर वाढू शकते व त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेतील तेल ग्रंथींवर होतो ज्यामुळे आंब्याच्या हंगामात अंगावर पिंपल्स किंवा पुरळ येऊ शकतात.   

जेवण झाले की पोट फुगल्यासारखे वाटते? बडीशोपेचा १ उपाय, पचन सुधारते लवकर...

आंबे खाल्ल्याने अंगावर पुरळ येऊ नये म्हणून सोपे उपाय :- 

१. बडीशेपचे सरबत :- जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. त्याचबरोबर उन्हाळ्यात बडीशेप खाणे फायदेशीर ठरते. ऋजुता दिवेकर यांच्या मते, उन्हाळ्यांत आपण बडीशेपपासून सरबत बनवू शकतो आणि आपल्या रोजच्या आहारात त्याचा समावेश करू शकतो. उन्हाळ्यात बडीशेपचे सरबत प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात येणारा थकवा, अशक्तपणा दूर करून आपण दिवसभर हायड्रेटेड आणि उत्साही राहू शकतो. पचनसंस्था मजबूत झाल्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित इतर समस्यांपासून आराम मिळेल. याशिवाय शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होईल. अशा स्थितीत चेहऱ्यावर पडलेले डाग, डाग, पिंपल्स निघून जातील आणि नैसर्गिक चमक येईल. चेहऱ्यावरील चमक परत आणण्यासाठी आपण  हा उपाय करू शकतो. 

जास्वंद-मोगरा घालून केलेलं तेल लावा, विसरा केसाच्या समस्या! ऋजुता दिवेकरच्या आईने शेअर केला खास उपाय...

२. वाळाचे पाणी पीत रहा :- निरोगी राहण्यासाठी प्रत्येक ऋतूमध्ये भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पण उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी रोज ८ ते ९ ग्लास पाणी प्यावे. यावर न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर सांगतात की, तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितके तुम्ही स्लिम, फिट आणि सुंदर दिसू शकता. यासाठी तुम्ही खसखसचा देखील वापर करू शकता. वाळा पाण्यात टाकून तुमच्या शरीरात ठंडावा निर्माण करु शकतो. यासाठी एका भांड्यात २ ते ४ वाळ्याची मुळे पाण्यात भिजवून ठेवावी. हे पाणी सुमारे ३ तास बाजूला ठेवावे. त्यानंतर दिवसभर हे पाणी पिण्यासाठी वापरावे. एकदा तयार केलेले वाळाचे पाणी आपण २ ते ३ दिवस पिऊ शकता. हे आरोग्यदायी पाणी प्यायल्याने तुम्ही दिवसभर उत्साही राहाल. हे पाणी तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत करेल. यासोबतच उन्हाळ्यात गारवा जाणवेल. तुम्ही वाळाचे मूळ एकदा वापरून सुकवून पुन्हा देखील ते वापरू शकता. याशिवाय बॉडी स्क्रबर म्हणूनही याचा वापर करता येतो. याच्या मदतीने त्वचेवरील लहान पिंपल्सची समस्या टाळता येते. 

वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

३. चंदनाचा असा करा वापर :-  उन्हाळाच्या दिवसात आपण चंदनाचा देखील वापर करू शकतो. यासाठी २ ते ३ चमचे चंदन पावडर अर्धी बादली पाण्यात मिसळा. याशिवाय १ चमचा चंदन पावडरमध्ये थोडेसे गुलाबपाणी मिसळून हे मिश्रण चेहेऱ्यावर १० मिनिटे लावा. नंतर चेहेरा स्वच्छ धुवून घ्यावा. यामुळे त्वचेला आणि शरीराला कूलिंग इफेक्ट मिळेल. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होतील आणि थंडपणा जाणवेल. हा उपाय केल्याने आपापली त्वचा चमकू लागेल.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स