ऊन्हाळ्याच्या दिवसांत बाजारात ऊसाचा रस मोठ्या प्रमाणात दिसून येतो. गरमीच्या वातारवणात हा रस रिफ्रेशिंग वाटतो. प्रत्येक वयोगटातील लोक ऊसाचा रस आवडीने पितात. ऊसाचा रस प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि कब्ज, गॅस, एसिडिटीची समस्या उद्भवत नाही. (Summer Special Benefits Of Sugarcane Juice)
ऊसाचा रस प्यायल्याने एनर्जी लेव्हल चांगली राहण्यासही मदत होते.ऊसाचा रस तुम्ही कोणत्याही वेळी पिऊ शकता पण एक्सपर्ट्सच्या मते ऊसाचा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. ऊसाचा रस प्यायल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात ते पाहूया. (benefits of sugarcane juice)
१) ऊसाचा रस पिण्याचे फायदे
ऊन्हाळ्याच्या दिवसांत उसाचा रस प्यायल्याने शरीर पूर्ण दिवस हायड्रेट राहते. ऊसाचा रस प्यायल्याने दिवसभरातील पाण्याची कमतरता पूर्ण करता येते. डिहायड्रेशनमुळे जाणवणाऱ्या समस्याही कमी होतात.
२) इम्यूनिटी मजबूत राहते
ऊसाच्या रसात व्हिटामीन सी, आयर्न, कॅल्शिय यांसारखी पोषक तत्व असतात. ही पोषक तत्व इम्यूनिटी स्ट्राँग ठेवण्यास साहाय्याक ठरतात रिकाम्यापोटी ऊसाचा रस प्यायल्याने संक्रमण होण्याची शक्यता कमी होते.
३) गॅसची समस्या दूर होते
ऊसाच्या रसात ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते. ग्लुकोज तुम्हाला एनर्जी प्रदान करते. रिकाम्या पोटी ऊसाचा रस प्यायल्याने शरीराला एनर्जी मिळते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते. अनियमित खाणंपिणं आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे लोकांना पोटाच्या समस्या उद्भवतात. यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. बाऊल मुव्हमेंट चांगली राहते.
4) ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते
ऊसाच्या रसाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते. रिकाम्या पोटी ऊसाचा रस प्यायल्याने ब्लड शुगर नियंत्रात राहण्यास मदत होते. म्हणून योग्य प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला जातो.
5) किडनीचे कार्य चांगले राहते
सकाळी रिकाम्या पोटी ऊसाचा रस प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. किडनीचे आरोग्य चांगले राहते.