Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कडक उन्हातून घरी आल्याआल्या चुकूनही करु नका ३ गोष्टी, तब्येत बिघडते-ऊन बाधते कारण..

कडक उन्हातून घरी आल्याआल्या चुकूनही करु नका ३ गोष्टी, तब्येत बिघडते-ऊन बाधते कारण..

Summer Special Health Care Tips: भर उन्हातून घरी आल्यावर लगेचच कोणत्या गोष्टी करणं टाळावं, हे एकदा बघून घ्या... (must avoid 3 things after returning home from heat)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2024 12:20 PM2024-05-17T12:20:41+5:302024-05-17T14:54:37+5:30

Summer Special Health Care Tips: भर उन्हातून घरी आल्यावर लगेचच कोणत्या गोष्टी करणं टाळावं, हे एकदा बघून घ्या... (must avoid 3 things after returning home from heat)

summer special health care tips, must avoid 3 things after returning home from heat in summer, tips to avoid heatstroke  | कडक उन्हातून घरी आल्याआल्या चुकूनही करु नका ३ गोष्टी, तब्येत बिघडते-ऊन बाधते कारण..

कडक उन्हातून घरी आल्याआल्या चुकूनही करु नका ३ गोष्टी, तब्येत बिघडते-ऊन बाधते कारण..

Highlightsकडक उन्हातून  आपण जेव्हा घरी येतो, तेव्हा उन्हामुळे जीव अगदी कासावीस झालेला असतो. त्यामुळे आपण अशा काही गोष्टी करतो, ज्या आपल्या तब्येतीसाठी हानिकारक ठरू शकतात.

सध्या उन्हाचा पारा खूपच जास्त वाढला आहे. त्यामुळेच तर दुपारी १२ ते ४ यावेळेत खूप अर्जंट काम नसेल तर घराबाहेर जाणंही टाळा असा सल्ला डॉक्टर देतात. पण तरीही काही जणांना घरी बसणं शक्य नसल्याने बाहेर जावंच लागतं. म्हणूनच अशा लोकांनी उन्हात घराबाहेर पडताना तसेच भर उन्हातून घरी आल्यावर काही गोष्टींची काळजी घ्यावी. जेणेकरून त्यांना उन्हाचा, उष्माघाताचा त्रास होणार नाही (tips to avoid heatstroke). अगदी कडक उन्हातून  आपण जेव्हा घरी येतो, तेव्हा उन्हामुळे जीव अगदी कासावीस झालेला असतो. त्यामुळे आपण अशा काही गोष्टी करतो, ज्या आपल्या तब्येतीसाठी हानिकारक ठरू शकतात (summer special health care tips). म्हणूनच भर उन्हातून घरी आल्यावर लगेचच कोणत्या गोष्टी करणं टाळावं, हे एकदा बघून घ्या...(must avoid 3 things after returning home from heat)

 

उन्हातून घरी आल्यावर ३ गोष्टी करणं टाळा

१. गटागट पाणी पिणे
यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे गटागट पाणी पिणे. उन्हातून घरी आल्यावर बऱ्याचदा घशाला कोरड पडलेली असते. त्यामुळे मग बरेच जण थेट फ्रिज किंवा माठ गाठतात आणि बाटलीभर, तांब्याभर गार पाणी पितात.

असं कुणी करतं का? भाजीवाल्याने दुकानात लावला डोळे वटारून पाहणाऱ्या महिलेचा फोटो, लोक म्हणाले....

पण असं करणं खूप चूक आहे. कितीही तहान लागली तरी ५ मिनिटे तरी शांत बसा. त्यानंतर एकेक घोट करत सावकाश पाणी प्या.

 

२. अंघोळ

उन्हातून आल्यावर खूप घाम घाम होतो. त्यामुळे बरेच जण लगेचच गार पाण्याने आंघोळ करण्यासाठी बाथरुममध्ये जातात. पण असं करणंही चुकीचं आहे.

त्वचेवर केलेले 'हे' घरगुती उपाय पडतील महागात, ग्लो येणं तर सोडाच आहे ते सौंदर्यही जाईल... 

उन्हामुळे वाढलेलं शरीराचं तापमान एकदम अंगावर गार पाणी ओतून कमी करणं आरोग्यासाठी घातक आहे. घरी आल्यावर साधारण अर्ध्या तासाने अंघोळीला जाण्यास हरकत नाही. 

 

३. एसीचा वापर

कडक उन्हाळ्यात एसीच्या थंड हवेत बसण्यासारखं दुसरं सूख नाही. पण तुम्ही जर ऐन उन्हात घरात आला असाल तर हे सूख घेणं थोडं टाळा.

उन्हाळ्यात कॉन्स्टिपेशनचा त्रास वाढला? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय खास उपाय- पोट होईल साफ

अतिशय गरम वातावरणातून आल्यावर लगेचच एसी लावलेल्या अगदी थंड खोलीत जाऊन बसणं शरीरासाठी योग्य नाही. अतिथंड आणि अतिगरम हा वातावरणातला बदल आपले शरीर लगेच स्विकारू शकत नाही. त्यामुळे शरीराला काही मिनिटांचा वेळ द्या आणि मग एसी लावा. 

 

Web Title: summer special health care tips, must avoid 3 things after returning home from heat in summer, tips to avoid heatstroke 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.