डायबिटीस (Diabetes) एक असा आजार आहे ज्यात शरीरातील साखरेची पातळी सतत कमी जास्त होत असते. डायबिटीसच्या रुग्णांनी आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. निष्काळजीपणामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी जास्त होऊ शकते. अनेक घरातील बायकांचे कामाच्या नादाच्या आपल्या खाण्यापिण्याकडे फारसं लक्ष नसतं. जर तुम्ही आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर नकळतपणे 'सायलेंट किलर' आजारांचा धोका वाढत जातो. पण योग्य आहार घेतल्यास शुगर नियंत्रणात ठेवता येऊ शकते. म्हणूनच तुम्हाला शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी काही सुपरफूड्स सुचवणार आहोत. (Superfoods for Type 2 Diabetes)
शेंगा
राजमा, शेवग्याच्या शेंगा खाल्यास शरीराला बरेच फायदे मिळतात. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बीन्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. याव्यतिरिक्त त्यात फाबरर्स आणि लोह मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे डायबिटीस टाईप २ चा धोका कमी होतो.
मासे
हेल्थ एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार आठवड्यातून कमीत कमी एकदा मासे खायला हवेत. यात ओमेगा ३ ऑईल मोठ्या प्रमाणात असल्यानं हृदयाचं आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. डायबिटीसच्या जास्तीत जास्त रुग्णांमध्ये किडनीचे आजार झाल्याचं पाहायला मिळतात. मासे खाल्ल्यानं डायबिटीक रुग्णांमध्ये किडनीचे आजार वाढण्याची समस्या कमी होते.
नट्स
काहीजण फक्त जीभेला चांगले लागत असल्यानं नट्स खाण्याचा आनंद घेतात. पण रोजच्या आहारात नट्सचा समावेश केला तर डायबिटिक रुग्णांना बरेच फायदे मिळू शकतात. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार काजू, बदाम, हेजलनट्स, पिस्ता खाल्ल्यानं टाईप २ डायबिटीसचा धोका कमी होतो. नट्समुळे हेल्दी फॅट्स वाढतात पण प्रमाणात खाल्ले तरच याचा योग्य फायदा मिळतो.
रताळे
टाईप १ डायबिटीस असल्यास काही प्रमाणात कार्ब्सही खायला हवेत. अन्यथा साखरेच्या पातळीच चढ उतार होऊ शकतो. बटाट्याच्या तुलनेत रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. रताळ्यात फायबर्सचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होते.
चुकीचे इनरवेअर्स घातल्यामुळे अनेक स्त्रियांना होतात गंभीर आजार: कपडे निवडताना चुकतात ५ गोष्टी
ओट्स
ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे ओट्सचा ब्रेकफास्ट असणं हे डायबिटीस रुग्णांसाठी चांगला पर्याय आहे. यात मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासह पचनक्रिया सुरळीत राहते. अभ्यासानुसार अन्य पदार्थांच्या तुलनेत ओट्सचा नाश्त्यात समावेश केल्यास शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
ब्लूबेरीज
लहान लहान ब्लूबेरीज शरीराला बरेच फायदे देऊन जातात. फळांच्या तलनेत यात अनेक एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ब्लूबेरीतील फायटोकेमिक्लस शरीराला वेगेवगळ्या आजारांपासून लांब ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ पेपरअनुसार ब्लूबेरिज खाल्ल्यानं डायबिटीसपासू लांब राहण्यास मदत होते.