गहू (wheat) हे भारतातील लोकांचा मुख्य आहार आहे. प्रत्येकाच्याच घरी कोणत्या ना कोमत्या स्वरूपात गव्हाचे सेवन केले जाते. 100 ग्राम गव्हात 71 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. याव्यतिरिक्त व्हिटामीन्स आणि मिनरल्स असतात पण जास्त कार्बोहायड्रेट्समुळे गहू आदर्श मानले जात नाही. याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतं. यात कारणामुळे वजन वाढू शकते. यात प्रोटीन कमी असते. म्हणूनच गव्हाच्या पीठात थोडं बेसन मिसळा. यात पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे आजारांचा धोका कमी होतो. (Surprising Benefits Of Besan Chapati Weight Loss)
आहारतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सांगितले की पौष्टीक बनवण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. गव्हाच्या पीठात बेसन मिसळा. बेसनात चण्याचे पीठ मिसळल्याने पोषक तत्व मिळतील. यात भरपूर प्रमाणात फायबर्स, प्रोटीन्स असतात. यात कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्सही कमी नसतात. यामुळे संपूर्ण आहारात पौष्टीक होतो. डॉ. प्रियंका सांगतात की, बेसन प्रोटीनचा खजिना आहे. रोजच्या जेवणात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बेसनाचा समावेश करू शकता.
हार्ट हेल्थसाठीही बेसन फायदेशीर ठरतं
युएसडीच्या रिपोर्टनुसार बेसनात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटामीन बी-१२, फॉलिक एसिड असते ही दोन्ही तत्व हृदयाच्या आरोग्यासाठी महत्वाची मानली जातात. ज्यामुळे हार्टचे मसल्स मजबूत होतात आणि हार्टसंबंधित समस्या उद्भवत नाहीत. रिसर्चमध्ये असे दिसून आले की बेसनात सोल्यूबल फायबर्स असतात. ज्यात एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्टेरॉल आणि टोटल कोलेस्टेरॉल कमी होते. (Ref)याव्यतिरिक्त ट्रायग्लिसेराईड्स कमी होते. बेसनाच्या पिठाने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येण्यासही मदत होते.
डायबिटीसचा धोका कमी होतो
फक्त गव्हाची चपाती खाल्ल्याने शुगर वाढण्याचा धोका असतो. बेसनाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही. या कारणामुळे डायबिटीसच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. बेसनात डायटरी फायबर्स असतात. अभ्यासानुसार नियमित बेसन किंवा काळ्या चण्यांचे सेवन केल्यानं ब्लड शुगर लेव्हल ३६ टक्के कमी होते.