Join us

ॲसिडिटी झाली? घरात धणे आहेत का? - चमचाभर धण्यांची जादू, अनेक आजारावर गुणकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2023 13:39 IST

Surprising Health Benefits Of Coriander Seeds You Should Know धणे आपल्या घरात असतातच, त्यांचा आहारात योग्य वापर आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरतो.

भारतीय मसाले फक्त पदार्थाची चव वाढवत नाही तर त्यातील औषधी गुणधर्मांमुळे शरीरासाठी उपकारक ठरतात. याच मसालांपैकी एक म्हणजे धणे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात. अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून धणे कार्य करते. यासंदर्भात, आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसर सांगतात, ''ॲसिडिटी, मायग्रेन, डोकेदुखी, रक्तस्त्राव, थायरॉईड, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, फॅटी-लिव्हर, लठ्ठपणा, अपचन यांसारखे आजार असतील तर आहारात धणे हवेच. त्यानं त्रास कमी होतो. हार्मोनल असंतुलन असेल तर धणे आहारात हवेच''(Surprising Health Benefits Of Coriander Seeds).

डॉक्टरांच्या मते, धणे आयुर्वेदिक डिटॉक्स म्हणून काम करते. त्यामुळे आहारात धणे हवेतच. ते कसे वापरायचे याच्याच काही टिप्स.

फॅटी लिव्हर-मधुमेह रुग्णांसाठी धण्याचा चहा

फॅटी-लिव्हर, मधुमेह आणि पचनाच्या समस्यांपासून त्रस्त असाल तर, धण्याचा तयार चहा प्या. या चहामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. यासाठी धणे - जिरे व बडीशेप घालून चहा करा. हा चहा पचनक्रिया शुद्धीकरण करण्याचे काम करते. हा चहा फॅटी लिव्हर व मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी प्रभावशाली आहे.

उन्हाळयात रोज लिंबू पाणी प्यावे का? कुणी आणि कधी - किती प्यावे?

थायरॉईडच्या रुग्णांसाठी फायदेशीर

थायरॉईड कमी करण्यासाठी, १ चमचा धणे पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी उकळवत ठेवा, यानंतर गाळून हे पाणी प्या. या पेयाचे सेवन केल्याने चयापचय वाढण्यास मदत होते. यात आपण कडीपत्ता किंवा कोरड्या गुलाबाच्या पाकळ्या घालून उकळवू शकता.

जर तुम्ही थायरॉईडचे रुग्ण असाल तर, गोळी घेतल्यानंतर १ तासानंतरच धण्याचे पाणी प्या. टॅब्लेट घेतल्यानंतर एक तास साध्या पाण्याशिवाय इतर काहीही पिणे/खाणे टाळणे चांगले.

शुगर असणाऱ्या व्यक्तींनी रोज किती पाणी प्यायला हवे? कमी पाणी पिण्याचा शुगरचा त्रास वाढण्याशी असतो संबंध?

अ‍ॅसिडिटीसाठी धणे उत्तम

ॲसिडिटी आणि जळजळ यासारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी, २५ ग्राम धणे बारीक वाटून घ्या. एका भांड्यात पाणी घेऊन ते रात्रभर किंवा ८ तास झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते गाळून घ्या आणि त्यात थोडी साखर मिसळून रिकाम्या पोटी सेवन करा.

टॅग्स : आरोग्यमधुमेहलाइफस्टाइल