Join us   

हुशारी वाढेल म्हणून जास्त बदाम खाऊ नका! 'अति तेथे माती' होईल आणि बिघडेल तब्येत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2024 5:22 PM

Surprising side effects of eating too many almonds : जास्त बदाम खाण्याचे ३ तोटे, पौष्टीक म्हणून खात असाल तर पोट बिघडलेच म्हणून समजा..

'खा बदाम वाढेल ब्रेन पॉवर' हा सल्ला आपल्याला अनेकांकडून मिळाला असेल. बदाम खाल्ल्याने फक्त ब्रेन हेल्थ नसून, आरोग्याला देखील फायदा होतो. पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीची 'अति तेथे माती' होतेच. जास्त प्रमाणात बदाम खाण्याचे देखील दुष्परिणाम आहेत (Health Tips). बदाम खाल्ल्याने आरोग्याला पौष्टीक घटक मिळतात. पण जास्त प्रमाणात खाल तर, आरोग्य बिघडू शकते (Side effects of Almonds).

बदाम खाण्यासंदर्भात योग्य पद्धत, वेळ आणि किती प्रमाणात खावे याबद्दलची योग्य माहिती हवी. बरेच जण आपल्या मुलांना दररोज बदाम खाऊ घालतात, व स्वतः ही खातात. पण पौष्टीक्तेने परिपूर्ण बदाम खाल्ल्याने तब्येत बिघडूही शकते. ते कसे पाहा(Surprising side effects of eating too many almonds).

पचन बिघडेल

जर आपण आवडते म्हणून जास्त प्रमाणात बदाम खात असाल तर, पोटाचे विकार वाढू शकतात. यामुळे बद्धकोष्ठता, पोट फुगणे, पोट खराब होऊ शकते. बदमामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनक्रियेत अडथळे येऊ शकतात.

आंघोळीनंतर पाणी पिणे योग्य की अयोग्य? नेमकं किती वेळानंतर पाणी प्यावे? तज्ज्ञ सांगतात..

अतिसार

बदामामध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. १०० ग्रॅम बदामामध्ये सुमारे २५ मिलीग्राम व्हिटॅमिन ई असते, तर शरीरासाठी दररोज १५ मिलीग्रॅम व्हिटॅमिनची आवश्यकता असते. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ईचे सेवन केल्याने अतिसार होऊ शकते. शिवाय पोटात ढवळणं, उलट्या, जुलाब यांसारख्या समस्या छळू शकतात.

बाहेरचं चमचमीत खाऊनही वजन वाढणार नाही! फॉलो करा ४-३-२-१ चा वेट लॉस रूल

मुतखडा

बदामामध्ये विरघळणारे ऑक्सालेट भरपूर प्रमाणात असतात. शरीरात जास्त प्रमाणात ऑक्सालेट झाल्यास मूतखड्याचा त्रास होऊ शकतो. १०० ग्रॅम भाजलेल्या बदामामध्ये ४६९ मिलीग्रॅम ऑक्सालेट असतात. त्यामुळे मूतखड्याचा धोका टाळण्यासाठी बदाम हे नियंत्रित प्रमाणात खायला हवे. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य