Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सुश्मिता सेनचे डॉक्टर सांगतात, हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरणाऱ्या ५ गोष्टी; धोका सर्वांनाच आहे..

सुश्मिता सेनचे डॉक्टर सांगतात, हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरणाऱ्या ५ गोष्टी; धोका सर्वांनाच आहे..

Heart Attack Sushmita Sen Doctor Give Some Health Tips To Women's : सुश्मिता सेन भरपूर व्यायाम करत होती तरी हार्ट ॲटॅक आलाच कसा असा प्रश्न अनेकांना पडला, तिचे डॉक्टर सांगतात त्याचं उत्तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2023 05:53 PM2023-03-15T17:53:47+5:302023-03-15T17:56:36+5:30

Heart Attack Sushmita Sen Doctor Give Some Health Tips To Women's : सुश्मिता सेन भरपूर व्यायाम करत होती तरी हार्ट ॲटॅक आलाच कसा असा प्रश्न अनेकांना पडला, तिचे डॉक्टर सांगतात त्याचं उत्तर..

Sushmita Sen's Doctor Says, 5 Things That Can Cause Heart Attack; Everyone is at risk. | सुश्मिता सेनचे डॉक्टर सांगतात, हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरणाऱ्या ५ गोष्टी; धोका सर्वांनाच आहे..

सुश्मिता सेनचे डॉक्टर सांगतात, हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरणाऱ्या ५ गोष्टी; धोका सर्वांनाच आहे..

प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. खुद्द सुष्मिताने सोशल मीडियावर पोस्ट करत आपली ॲन्जिओप्लास्टी झाली असून आपल्या हृदयात स्टेंट टाकला अशी माहिती दिली. सुश्मितावर वेळीच उपचार झाले म्हणून ठीक नाहीतर तिच्या मुख्य धमणीत ९५ टक्के ब्लॉकेज होते. ४७ वर्षीय सुष्मिता सेन तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते. ती जिममध्ये जाते, योगा करते, तरीही तिच्या बाबतीत असे कसे झाले असा प्रश्न अनेकांना पडला मात्र व्यायाम करत असल्याने आणि योग्य उपचार झाल्याने ती वाचू शकली. तिचे डॉक्टरच सांगतात की महिलांच्या संदर्भातही आता हृदयविकाराचा धोका वाढतो आहे (Heart Attack Sushmita Sen Doctor Give Some Health Tips To Women's).

सुश्मिता सेनवर उपचार करणारे कार्डीओलॉजिस्ट डॉ. राजीव भागवत यांनी  टाइम्स ग्रूपला दिलेल्या मुलाखतीत हृदयविकाराचा धोका आणि त्याची कारणं यांचे सविस्तर विश्लेषण केले आहे. वेळी डॉ. भागवत यांनी हार्ट ॲटॅकला कारणीभूत असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. सुश्मिताप्रमाणेच सामान्य स्त्रियांनाही रोजच्या धावपळीत अशाप्रकारे हार्ट ॲटॅकचा धोका असू शकतो. त्यामुळे महिलांनी कोणत्या ५ गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे याविषयी त्यांनी काय सांगितले पाहूया... 

१. व्यायाम 

सुश्मिता नियमितपणे व्यायाम करत असल्याने तिच्यावरचे मोठे संकट टळले असे सुश्मिता म्हणाली. त्यामुळे तुम्ही कितीही बिझी असाल तरी आठवड्यातले ३ ते ४ तास आवर्जून व्यायाम करायला हवा असे तिने सांगितले. मात्र व्यायामाच्या आधी तुमची ७ ते ८ तास झोप झालेली असणे गरजेचे आहे. ती झाली नसेल आणि तुम्ही स्वत:ला स्ट्रेच केले तर त्याचा तुमच्यावर उलटा परीणाम होऊन तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. 

२. पोटावरची चरबी

पोटावर वाढलेली चरबी हे हार्ट ॲटॅकचे आणखी एक महत्त्वाचे कारण असते. पोटात इन्शुलिन साचून राहते आणि शरीराच्या इतर भागांना इन्शुलिन न मिळाल्याने हार्ट ॲटॅकची समस्या वाढण्याची शक्यता असते. भारतात अनेकांना आपल्याला डायबिटीस आहे किंवा आपले कोलेस्टेरॉल वाढलेले आहे हे माहितीच नसते. त्यामुळेही हार्ट ॲटॅकचा धोका उद्भवू शकतो. 

३. अपुरी झोप

झोप ही उत्तम आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. पण आपली झोप पूर्ण झाली नसेल तर शरीराच्या सर्व अवयवांना पुरेसा आराम मिळत नाही आणि त्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. 


४. व्हिटॅमिन डी

भारतासारख्या देशात सध्या ही मोठी समस्या झाली आहे. आपल्याकडे पुरेशा प्रमाणात ऊन असूनही आपण त्याचा योग्य प्रकारे वापर करुन घेत नाही. शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तरी हार्टवर त्याचा परीणाम होण्याची शक्यता असते. व्हिटॅमिन डी साठी सप्लिमेंटस घेण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने त्याचा आहारात समावेश करणे जास्त गरजेचे आहे.

५. स्ट्रेस

मानसिक ताण, त्या ताणाचा निचरा न होणं आणि त्यामुळे सतत तणावात जगणं यामुळेही ॲटॅकचा धोका वाढतो. ताणाचा निचरा करत उत्तम जीवनशैली कशी निवडायची याचाही विचार आवश्यक आहे.

 

 

Web Title: Sushmita Sen's Doctor Says, 5 Things That Can Cause Heart Attack; Everyone is at risk.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.