Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मेंदू करेल सुपरफास्ट काम-येईल तरतरी! बाबा रामदेव सांगतात भिजवलेल्या बदामासोबत खा ३ गोष्टी

मेंदू करेल सुपरफास्ट काम-येईल तरतरी! बाबा रामदेव सांगतात भिजवलेल्या बदामासोबत खा ३ गोष्टी

Swami Ramdev baba shared healthy food for brain, it includes Almond.. : बोलण्यात अडचण-कायम गोष्टी विसरत असाल तर? बदामासोबत ३ गोष्टी रोज खा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2024 01:38 PM2024-04-10T13:38:52+5:302024-04-10T16:28:20+5:30

Swami Ramdev baba shared healthy food for brain, it includes Almond.. : बोलण्यात अडचण-कायम गोष्टी विसरत असाल तर? बदामासोबत ३ गोष्टी रोज खा..

Swami Ramdev baba shared healthy food for brain, it includes Almond.. | मेंदू करेल सुपरफास्ट काम-येईल तरतरी! बाबा रामदेव सांगतात भिजवलेल्या बदामासोबत खा ३ गोष्टी

मेंदू करेल सुपरफास्ट काम-येईल तरतरी! बाबा रामदेव सांगतात भिजवलेल्या बदामासोबत खा ३ गोष्टी

तंदुरुस्त शरीरासोबत मेंदूही तंदुरुस्त असणे गरजेचं आहे. कारण कोणतीही गोष्ट करण्यासाठी मेंदूच आज्ञा देत असते. मेंदू निरोगी राहील तर, आपण आपल्या शरीराची योग्य काळजी घेतो (Swami Ramdev Baba). मेंदू आणि स्मरणशक्ती निरोगी राहण्यासाठी आपण बरेच उपाय करून पाहतो. ब्रेन गेम्सपासून ते मेंदूला चालना देणाऱ्या गोष्टी करतो (Brain Healthy Foods). परंतु, आपण आपल्याला खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतो (Health Care).

पोषक तत्वांनी परिपूर्ण आहार घेतल्याने मेंदू उत्तम पद्धतीने कार्य करते. नाहीतर बऱ्याचदा गोष्टी आठवत नाहीत? बोलण्यात अडचण किंवा डोकेदुखी कायम राहते. आयुर्वेदानुसार बदाम खाल्ल्याने मेंदू योग्यरित्या कार्य करते. पण फक्त बदाम पुरेसे नाही. बदाम व्यतिरिक्त कोणते पदार्थ खाल्ल्याने मेंदू योग्यरित्या कार्य करते? याची माहिती योगगुरु बाबा रामदेव यांनी दिली आहे(Swami Ramdev baba shared healthy food for brain, it includes Almond..).

मेंदूला तीक्ष्ण करणारे पदार्थ

बदाम

बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि ओमेगा -३ फॅटी ऍसिडसह अनेक महत्त्वाच्या पोषक घटकांचा समावेश आहे. हे सर्व घटक मेंदूचे कार्य सुधारण्याशी आणि स्मरणशक्तीशी निगडीत आहेत. पबमेड या वेबसाईटनुसार, बदामामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे मेंदू पन्नाशीनंतरही तरतरीत राहते. शिवाय नियमित बदाम खाल्ल्याने कॉग्नीटिव्ह फॅक्शन वाढते. ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमताही वाढते.

एक काकडी-कपभर बेसन; अवघ्या १० मिनिटात करा काकडीचा झणझणीत कोरडा-पाहा रेसिपी

देशी तूप, लोणी आणि खोबरेल तेल

बदामासोबत गायीचे तूप, लोणी आणि खोबरेल तेल देखील मेंदूच्या कार्यक्षमतेला वाढ देते. या तिन्हींमध्ये ओमेगा फॅटी ऍसिड असतात, जे मेंदूच्या पेशी निरोगी बनवतात. पेशी तरुण ठेवण्यासाठी निरोगी चरबीचा वापर केला जातो. त्यामुळे हे तीन प्रकारचे पदार्थ नियमित जरूर खा.

पण हे देखील लक्षात ठेवा

तूप, लोणी किंवा खोबरेल तेलाचे अतिप्रमाणात सेवन करू नये. या तिन्ही गोष्टी हृदयरोग्यांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे या तिन्ही गोष्टींचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

धुळीने माखलेला कुलर स्वच्छ कसा करावा? ५ जबरदस्त ट्रिक्स; मिनिटात होईल क्लिन-दिसेल चकचकीत

बाबा रामदेव सांगतात

योगगुरु बाबा रामदेव यांनी सकाळी उठल्यावर १ चमचा तूप, १ चमचा खोबरेल तेल किंवा १ चमचा पांढरे लोणीसोबत ५ बदाम खाण्याचा सल्ला दिला आहे. पण जर आपण विशिष्ट आजाराने ग्रासले असाल तर, खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

Web Title: Swami Ramdev baba shared healthy food for brain, it includes Almond..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.