High Blood Sugar Symptoms: भारत डायबिटीसची राजधानी म्हटला जातो. कारण देशात दिवसेंदिवस शुगरच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. ब्लड शुगर लेव्हल जर कंट्रोल राहत नसेल, तर शरीरावर वाईट परिणाम होतात. खासकरून हाय ब्लड शुगरचे पायांवर अनेक लक्षणं दिसतात. डायबिटीसच्या रूग्णांमध्ये या समस्या कॉमन आहेत. जेव्हा शरीरात शुगर लेव्हल वाढते, तेव्हा ब्लड वेसल्स आणि नर्वस सिस्टीमचं नुकसान होतं. ज्यामुळे पायांवर अनेक लक्षणं दिसू लागतात.
पायांवर सूज
ब्लड शुगर लेव्हल वाढल्यावर शरीरात सूज वाढू शकते. खासकरून पाय आणि टाचांवर सूज वाढते. मुख्यपणे ही समस्या ब्लड सर्कुलेशनमधील अडथळ्यामुळे होते. जर तुमच्या पायांवर सतत सूज येत असेल तर हा तुमची ब्लड शुगर लेव्हल हाय झाल्याचा संकेत असू शकतो.
पायांमध्ये वेदना किंवा जळजळ
हायपोग्लायसीमियामुळे नसांचं नुकसान होतं. ज्याला डायबेटिक न्यूरोपॅथी असं म्हटलं जातं. यामुळे पायांमध्ये जळजळ, सूज किंवा असह्य वेदना होऊ शकतात. ही समस्या सामान्यपणे पाय, टाचा आणि हातांमध्ये जाणवते.
पाय सुन्न पडणे
ब्लड शुगरची लेव्हल जास्त वाढल्यावर नर्व्स प्रभावित होऊ शकतात, ज्यामुळे पाय सुन्न पडणे किंवा झिणझिण्या जाणवू शकतात. ही लक्षणं सामान्यपणे खालच्या अवयवांमध्ये दिसून येतात.
जखमा उशीरा भरणे
जर पायांमध्ये जखम असेल किंवा कापलं असेल आणि जखम लवकर भरत नसेल तर हा ब्लड शुगर लेव्हल वाढल्याचा संकेत असू शकतो. हाय ब्लड शुगरमुळे शरीराची नॅचरल हीलिंग प्रक्रिया प्रभावित होते. ज्यामुळे जखमा उशीरा भरतात.
पायांवर खाज आणि कोरडेपणा
हाय ब्लड शुगरमुळे त्वचेवरील मॉइश्चर नष्ट होतं, ज्यामुळे पायांची त्वचा कोरडी आणि रखरखीत होते. यामुळे पायांवर खाज आणि जळजळ होते. ही समस्या डायबिटीसच्या रूग्णांमध्ये कॉमन बघायला मिळते.
पायांना जास्त गरमी लागणे
ब्लड शुगर लेव्हल वाढल्यानं पायांना जास्त गरमी जाणवते, हे सामान्यपणे नर्वस सिस्टीम प्रभावित झाल्याचं कारण असतं.
पायांमध्ये आखडलेपणा आणि कमजोरी
ब्लड शुगर लेव्हल वाढल्यानं नर्वस सिस्टीम प्रभावित होते, ज्यामुळे पायांमध्ये आखडलेपणा किंवा कमजोरी जाणवते. या स्थितीत चालण्या-फिरण्यात अडचण होऊ शकते.