घरातल्या सगळ्यांच्या आहाराकडे, खाण्या- पिण्याकडे घरातली बाई लक्ष देते. पण स्वत:ची तब्येत, स्वत:चे आरोग्य असे विषय आले की मग मात्र ती त्याकडे सर्रास दुर्लक्ष करते. आपण जणू काही सुपर वुमन आहोत, काही पौष्टिक खाल्लं नाही, तरी आपल्याला काही होणार नाही, असंच जणू तिला वाटत असतं. म्हणूनच तर अनेक महिलांमध्ये वरील लक्षणं दिसून येतात. तुम्हाला माहिती आहे का, असा त्रास जर वारंवार होत असेल, तर ती तुमच्यासाठी एक धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे वेळीच ही लक्षणं (symptoms of Iron deficiency)कशाची आहेत ते ओळखा आणि योग्य उपचार करून घ्या.
अनेक महिलांना मासिक पाळीच्या (menstruation)काळात खूप ब्लिडिंग होतं आणि आहारातून योग्य पोषण मिळत नाही. या दोन्ही कारणांमुळे अनेक महिलांना रक्तामधील लोहाची कमतरता भासते. आयर्न म्हणजेच रक्तातील लोह हा हिमोग्लोबिनमधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. फुफ्फुसे आणि शरीरातील प्रत्येक टिश्यूला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी लोह खूप आवश्यक असते. लोहाच्या कमतरतेमुळे हे काम जर सुरळीत झाले नाही, तर यातून अनेक आजारा निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने बघा.
दररोज कुणाला किती लोहाची आवश्यकता... need of iron - १८ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या पुरूषांना ८.७ एमजी एवढ्या लोहाची गरज असते. - १९- ५० या वयोगटातील महिलांना १४. ८ एमजी एवढे लोह लागते. - ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या महिलांना ८.७ एमजी एवढ्या लोहाची गरज असते.
शरीरातील लोह वाढण्यासाठी काय करावं? - नॅशनल हेल्थ सोसायटी यांच्या अभ्यासानुसार आपण जे अन्न खातो, त्यातून मिळणारे लोह शरीरात व्यवस्थित शोषल्या जात नाही. त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता जाणवते. - आहारातले लोह शरीरात व्यवस्थित शोषल्या जावे यासाठी जेवणानंतर लगेचच चहा, दूध पिणे टाळा. - जेवणाआधी संत्र्याचा रस पिणे उपयुक्त ठरू शकते. - व्हिटॅमिन सी मुळे लोह शरीरात शोषले जाण्यास मदत होते. त्यामुळे व्हिटॅमिन सी असणारी फळं भरपूर प्रमाणात खावी. - राजमा, सोयाबीन, डाळी, अक्रोड, गुळ, शेंगदाणे यांचे आहारातील प्रमाण वाढवावे.
लोहाच्या कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे - सारखं डोकं दुखणे. - अशक्तपणा आणि वारंवार येणारा थकवा - निरूत्साह आणि नकारात्मकता वाढणे - नखे आणि केस वारंवार तुटणे - त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसणे - धाप लागणे, दम लागणे - श्वास घेताना आवाज येणे