Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > अचानक चिडचिड होते, रडू येतं, दमल्यासारखं वाटतं? शरीरातले 8 बदल ओळखायला शिका, ऐका आपल्या शरीराचं

अचानक चिडचिड होते, रडू येतं, दमल्यासारखं वाटतं? शरीरातले 8 बदल ओळखायला शिका, ऐका आपल्या शरीराचं

कधी कधी अचाक आरोग्याच्या तक्रारी उभ्या राहातात. त्यामागच्या कारणाचा काही अंदाजच येत नाही अशा तक्रारींमागे हार्मोन्स (hormones) असतात. पाळीच्या दरम्यान, गरोदरपणात, मेनोपाॅजमध्ये हार्मोन्समध्ये बदल (hormones change) होतात. पण अनेकदा काही औषधं, आरोग्य विषयक समस्या यामुळे हार्मोन्समध्ये बदल होतात. हार्मोन्स असंतुलित (hormonal imbalance) झाल्यास शारीरिक आणि मानसिक पातळीवर बदल ( effect of hormonal imbalance) होतात. हे बदल कोणते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2022 04:44 PM2022-07-25T16:44:56+5:302022-07-25T17:15:30+5:30

कधी कधी अचाक आरोग्याच्या तक्रारी उभ्या राहातात. त्यामागच्या कारणाचा काही अंदाजच येत नाही अशा तक्रारींमागे हार्मोन्स (hormones) असतात. पाळीच्या दरम्यान, गरोदरपणात, मेनोपाॅजमध्ये हार्मोन्समध्ये बदल (hormones change) होतात. पण अनेकदा काही औषधं, आरोग्य विषयक समस्या यामुळे हार्मोन्समध्ये बदल होतात. हार्मोन्स असंतुलित (hormonal imbalance) झाल्यास शारीरिक आणि मानसिक पातळीवर बदल ( effect of hormonal imbalance) होतात. हे बदल कोणते?

symptoms of hormonal imbalance ... Hormonal imbalance affect on physical and mental health. | अचानक चिडचिड होते, रडू येतं, दमल्यासारखं वाटतं? शरीरातले 8 बदल ओळखायला शिका, ऐका आपल्या शरीराचं

अचानक चिडचिड होते, रडू येतं, दमल्यासारखं वाटतं? शरीरातले 8 बदल ओळखायला शिका, ऐका आपल्या शरीराचं

Highlightsॲस्ट्रोजन या स्त्री हार्मोन्सचा परिणाम मेंदूतील हार्मोन्सवर होतो.ॲण्ड्रोजन हार्मोनमध्ये असंतुलन निर्माण झाल्यास चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येतात.गरोदरपणात, रजोनिवृत्तीदरम्यान डोक्यावरचे केस जातात ते हार्मोन्समधील असंतुलनामुळे.

वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर शरीर वेगवेगळ्या बदलांना सामोरं जातं. मासिक पाळी येण्यापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत शारीरिक आणि मानसिक पातळीवर वेगवेगळे बदल होतात. हे बदल विनाकारण घडत नाही. या बदलांमागे शरीरातील बदलणारे हार्मोन्स (hormones)  असतात असं डाॅ. एस. एस. मुदगील म्हणतात. हार्मोन्स म्हणजे रासायनिक संदेश वाहक असतात. हे हार्मोन्स शरीरातील पेशींचं कार्य नियंत्रित करतात. हार्मोन्स जर संतुलित असतील तर पेशींचं कार्य उत्तम चालतं आणि शरीर विनातक्रार काम करतं. पण जर हार्मोन्सचं संतुलन (hormonal imbalance)  बिघडलं तर मात्र त्याचा थेट परिणाम शरीरावर होतो. कधी कधी अचानक आरोग्याच्या तक्रारी उभ्या राहातात. त्यामागच्या कारणाचा काही अंदाजच येत नाही अशा तक्रारींमागे हार्मोन्स असतात असं डाॅ. मुदगील म्हणतात.  पाळीच्या दरम्यान, गरोदरपणात, मेनोपाॅजमध्ये हार्मोन्समध्ये बदल होतात. पण अनेकदा काही औषधं, आरोग्य विषयक समस्या यामुळे हार्मोन्समध्ये बदल होतात.  हार्मोन्स असंतुलित झाल्यास शारीरिक आणि मानसिक पातळीवर बदल (effect of hormonal imbalance)  होतात. हे बदल अचानक वाटत असले तरी ते हार्मोन्समुळे होतात , हे बदल ओळखायला शिका असं डाॅ. मुदगील म्हणतात. हे बदल कोणते हे देखील त्यांनी सविस्तरपणे सांगितले आहेत.

Image: Google

1.हार्मोन्समध्ये वेगानं बदल झाल्यास सतत मूड बदलतात. ॲस्ट्रोजन या स्त्री हार्मोन्सचा परिणाम मेंदूतील सेरोटोनिन, डोपामेन आणि नाॅरपेनफ्रिन या हार्मोन्सवर होतात. त्यामुळे ॲस्ट्रोजन हार्मोन्समध्ये असंतुलन झाल्यास त्याचा मेंदूतील हार्मोन्सवर परिणाम होवून मूड स्विंग्ज होतात. अचानक अस्वस्थ होणं, भीती वाटणं, चिडचिड होणं, रडायला येणं हे परिणाम  हार्मोन्समध्ये असंतुलन झाल्याने निर्माण होतात. 

2.ॲस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेराॅन या हार्मोन्समध्ये असंतुलन झाल्यास ब्रेन फाॅग निर्माण होवून त्याचा परिणाम स्मरणशक्तीवर होतो. रजोनिवृत्तीच्या सुरुवातीला आणि रजोनिवृत्ती दरम्यान या दोन हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होवून स्मरणशक्ती कमी होते. 

3. प्रोजेस्टेराॅन हे हार्मोन वाढलं तर झोप विस्कळीत होते. थायराॅइड ग्रंथीतून थायराॅइड हे हार्मोन कमी निर्माण होत असल्याव खूप थकवा येतो. 

Image: Google

4. मेनोपाॅजच्या काळात ॲस्ट्रोजनची पातळी कमी होते. यामुळे शरीरातील लेप्टिनच्या पातळीवर परिणाम होवून भूक वाढते. त्यामुळे जास्त खाल्लं जातं आणि वजन वाढतं. मेनोपाॅजच्या काळात वजन वाढण्यामागे हे प्रमुख कारण  असतं.  मेनोपाॅजच्या काळात त्वचा कोरडी होते, खराब होते त्याचं कारणही हार्मोन्समधील असंतुलन हेच असतं. 

5.  ॲण्ड्रोजन हे हार्मोन स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही असतं. ॲण्ड्रोज हे हार्मोन जर वाढलं तर त्यामुळे तेल ग्रंथी अधिक सक्रीय होवून चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येतात. ॲण्ड्रोजनमुळे शरीरावरील लव आणि त्वचेखालील पेशी यावर परिणाम होवून त्वचेवरची रंध्र बंद होवून मुरुम पुटकुळ्या येतात. 

Image: Google

6.  मासिक पाळीच्या आधी किंवा मासिक पाळी दरम्यान अनेकींना डोकेदुखीचा त्रास होतो. कारण तेव्हा शरीरातील ॲस्ट्रोजन या हार्मोनची पातळी कमी झालेली असते त्यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो.  मासिक पाळीच्या काळात ॲस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेराॅन या हार्मोन्समध्ये बदल झाल्यानं  त्याचा शरीरातील पाण्याच्या पातळीवर परिणाम होतो. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात किंवा आधी खूप तहान लागते. 

7. गरोदरपणात , रजोनिवृत्तीदरम्यान किंवा गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात तेव्हा ॲस्ट्रोजन या हार्मोनची पातळी कमी होते. ॲस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेराॅन यावरही परिणाम होवून त्याचा प्रभाव केसांवर पडतो. त्यामुळे केस गळतात, पातळ होतात. 

8. पोटातील आतड्यात रिसेप्टर्स नावाचा पेशींचा थर असतो. ॲस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेराॅनमध्ये असंतुलन झाल्यास या रिसेप्टर्सवर परिणाम होवून पोटात दुखतं, आतड्यांना सूज येतो, मळमळ होते. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात या समस्या प्रामुख्यानं जाणवतात. 

Web Title: symptoms of hormonal imbalance ... Hormonal imbalance affect on physical and mental health.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.