Join us   

रोज ३० मिनिटांपेक्षा जास्त मोबाइलवर बोलता? हाय बीपीचा त्रास होणारच, संशोधन सांगते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2023 3:26 PM

Talking over mobile for more than 30 minutes linked with increased risk of high blood pressure : जास्त वेळ फोनवर बोलत असाल तर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शनचा त्रास होण्याचा धोका हा १२ टक्क्यांनी वाढतो.

फोनवर एकमेकांशी बोलणे हे आता काही फार नवीन राहिलेले नाही. कधी कामानिमित्त तर कधी दूरवर असलेल्या व्यक्तीसोबत गप्पा मारण्याच्या निमित्ताने, तर कधी आणखी काही कारणाने आपण नातेवाईकांशी, मित्रमंडळींशी किंवा अगदी बिझनेस रिलेटेड गोष्टींच्या निमित्तानेही कित्येक तास फोनवर बोलतो. कॉल सेंटर किंवा यांसारख्या ठिकाणी काम करणाऱ्यांचे तर कामच फोनवर बोलण्याचे असते. त्यामुळे अनेकदा फोनवर बोलण्याशिवाय पर्यायच नसतो. बराच वेळ चालणारा हा फोन कल ठेवल्यानंतर आपलं डोकं, कान सुन्न झाल्यासारखं झालेलं असतं. मग काही वेळ शांत डोळे मिटून बसावं असंही आपल्याला वाटतं (Talking over mobile for more than 30 minutes linked with increased risk of high blood pressure). 

(Image : Google)

बराच वेळ सलग बोलल्याने किंवा ऐकल्याने असे झाले असेल असं आपल्याला वाटतं खरं. पण यामागे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे कारण आहे ते म्हणजे बराच वेळ फोनवर बोलल्यावर आपला रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर वाढलेले असण्याची शक्यता असते. आठवड्यातून तुम्ही ३० मिनीटे किंवा त्याहून जास्त वेळ फोनवर बोलत असाल तर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शनचा त्रास होण्याचा धोका हा १२ टक्क्यांनी वाढतो. चीनच्या ग्वांगझू येथील शियानहुई किन या दक्षिण वैद्यकीय विद्यापीठातील अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार फोनवर बोलण्याचा कालावधी ३० मिनीटांपेक्षा जास्त असेल तर ही रिस्क जास्त वाढते. हे संशोधन युरोपियन हार्ट जनरलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.  

(Image : Google)

सध्या एकूण लोकसंख्येच्या १० पेक्षा जास्त वय असलेल्या तीन चर्तुर्थांश लोकांकडे स्वत:चा मोबाइल असतो. मोबाइल फोनमधी रेडिओफ्रिक्वेन्सी ऊर्जा ही कमी पातळीची असते. याचा रक्तदाबाशी थेट संबंध असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. तसेच हायपरटेन्शनमुळे हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो ज्यामुळे अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते. या संशोधनासाठी जवळपास १४ हजार जणांचा अभ्यास करण्यात आला असून हे संशोधन जास्त नेमके होण्यासाठी यावर आणखी अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे किन यांचे म्हणणे आहे. आता थेट फोनवर बोलण्यापेक्षा हेडस फ्रिचा वापर केला तर रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता कमी होईल, असे आपल्याला वाटू शकते, मात्र हेडस फ्रिमुळे विशेष फरक पडत नाही आणि शरीराला जो त्रास व्हायचा तो होतोच. मात्र याविषयी आणखी संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचेही किन यांचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समोबाइल