Join us   

99 टक्के लोक चुकीच्या पद्धतीनं करतात चहा; डॉक्टर सांगतात चहा पावडर नेमकी कधी घालावी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 12:47 PM

Tea Making Tips : चहा करण्याची आयुर्वेदीक पद्धत दुसरी आहे ज्यामुळे चहाची चव वाढते आणि चहा हेल्दी बनतो.

चहा पिणं (Tea) हे प्रत्येक भारतीय  कुटुंबातील लोकांच्या मॉर्निंग रूटीनचा एक भाग आहे. अनेकजण चहा बिस्कीट खाऊन दिवसाची सुरूवात करतात जर तुम्ही आयुर्वेदीत पद्धतीनं विचार केला तर  ९९ टक्के लोकांना चहा करण्याची योग्य पद्धत माहिती नसते. आयुर्वेदीत डॉक्टर अंकीत अग्रवाल यांनी एका हिंदी वेब पोर्टलशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. (How to Make Perfect Tea) जास्तीत जास्त लोक चहा करताना गॅस पॅनवर चढवतात आणि सगळ्यात आधी पाणी घालतात. त्यानंतर चहा पावडर, आलं, साखर, दूध घालतात पण चहा करण्याची आयुर्वेदीक पद्धत दुसरी आहे ज्यामुळे चहाची चव वाढते आणि चहा हेल्दी बनतो. (According To Ayurvedic Doctor Know When You Should Add Tea Leaves in Chai)

डॉक्टर सांगतात की काही पेशंट विचारतात की तुम्ही आम्हाला चहा प्यायला का मनाई करतात. तेव्हा डॉक्टरांचे उत्तर असे असते की तुम्हाला चहा बनवण्याची योग्य पद्धत माहिती नाही. आयुर्वेदात चहा बनवण्यासाठी सगळ्यात आधी दूध घ्यावं लागतं. नंतर त्याच साखर, आलं, वेलची घालावी आणि नंतर चहा पावडर घालून झाकण ठेवावे आणि उकळ्यानंतर गॅस बंद करा. या पद्धतीने चहा उत्तम बनतो.

गुड कोलेस्टेरॉलची पॉवरहाऊस आहे 'ही' चटणी; रोज १ चमचा खा, हृदय राहील निरोगी

जास्त चहा पिण्याचे नुकसान 

जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त चहा पित असाल तर तब्येतीचं नुकसान होऊ शकतं.  जास्त चहा प्यायल्यानं झोप व्यवस्थित येत नाही. पचनासंबंधित समस्या उद्भवतात. जर तुम्ही सकाळी गरम पाणी पिऊन नंतर चहा पित असाल तर गॅस, एसिडीच्या समस्येपासून बचाव करू शकता. अधिक चहा प्यायल्यानं दात खराब होण्याची समस्याही उद्भवते. 

आयुर्वेदात हर्बल चहाचा उपयोग करण्याचा सल्ला दिला जातो कारण हर्बल चहाच्या सेवनानं पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. ज्यामुळे पाचन रस उत्तेजित होतो. अन्न लवकर पचते. हर्बल चहा जडी बुडी आणि काही मसाल्यांचे संयोजन असते ज्यात दुधाचा वापर केला जात नाही यात दूधाचा उपयोग केला जात नाही. दुधाच्या चहाचे व्यसन फार चांगले नाही.

चहाची सवय अनेकांना असते. काहीजणांना तर चहा प्यायल्याशिवाय शौचासही जाता येत नाही. काहींना दिवसाच्या सुरूवातीला चहा मिळाला नाही तर डोकेदुखी, चिडचिड होणं अशी लक्षणं दिसून येतात.  जे चहाच्या सवयींवर अवलंबून आहे.

चहातील एंटीऑक्सिडेटंस गुणांमुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो असं म्हटलं जातं की अति सर्वत्र वर्जयेत अर्थात चहाचे नियमित, अत्याधिक सेवन केल्यानं चिडचिड होणं, राग येणं या समस्या उद्भवतात. रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानं एसिडीटी किंवा डोकेदुखीची समस्या उद्भवते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य