Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चहा गाळण्याच्या गाळणीमुळे होऊ शकतो कॅन्सर; चहा करताना १ चूक करणं टाळा, सुरक्षित राहाल

चहा गाळण्याच्या गाळणीमुळे होऊ शकतो कॅन्सर; चहा करताना १ चूक करणं टाळा, सुरक्षित राहाल

Tea Strainer Can Cause Cancer : दीर्घकाळ या गाळणीचा वापर केल्यास कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 03:34 PM2024-11-28T15:34:43+5:302024-11-28T15:48:05+5:30

Tea Strainer Can Cause Cancer : दीर्घकाळ या गाळणीचा वापर केल्यास कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो.

Tea Strainer Can Cause Cancer According To Study And How To Clean Strainer | चहा गाळण्याच्या गाळणीमुळे होऊ शकतो कॅन्सर; चहा करताना १ चूक करणं टाळा, सुरक्षित राहाल

चहा गाळण्याच्या गाळणीमुळे होऊ शकतो कॅन्सर; चहा करताना १ चूक करणं टाळा, सुरक्षित राहाल

भारतात प्रत्येक घरामध्ये चहा गाळण्यासाठी चहाच्या गाळणीचा वापर केला जातो. चहाची गाळणी अनेक प्रकारची असते जसं की स्टेनलेस स्टिल, सिलिकॉन, प्लास्टीक.... आता फक्त चहाच नाही तर सूप, ज्यूस अन्य पेय गाळण्यासाठी याचा वापर केला जातो.  जास्तीत जास्त लोक चहा गाळण्यासाठी गाळणीचा वापर करतात. (Tea Strainer Can Cause Cancer According To Study And Which Strainer  Is best And How To Clean Strainer)

दीर्घकाळ या गाळणीचा वापर केल्यास कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. अमेरिकन केमिकलस सोसायटी जर्नल ऑफ एनवायरमेंटल सायंस एंड टेक्नोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार प्लास्टीकपासून तयार झालेल्या  गाळणीत अरबो मायक्रोप्साटीक आणि नॅनोप्लास्टीक निघतात जे कॅन्सरचं कारण ठरतात.

कॅनेडीयन संशोधकांनी अमेरिकन केमिकल सोसायटीच्या जर्नल ऑफ एनव्हायरमेंटल सायंस एंटी टेक्नोलॉजीमध्ये एका अभ्याससात प्रकाशित केले की उष्ण वातावरणामुळे जेवण किंवा पेय प्लास्टीकच्या रसायनांमध्ये मिसळले जाते. ज्यातून कॅन्सरसारखी तत्व निघतात (Ref). प्लास्टीक टि बॅग्स कॅन्सरचं कारण ठरू शकतात. कारण गरम पाण्यात प्लास्टीक टी बॅग्स  भिजवल्यानं प्रत्येक कपमधून जवळपास ११६ बिलियन सुक्ष्म कण निघतात . ज्याला मायक्रोप्लास्टीक आणि नॅनोप्लास्टीक असं म्हटलं जातं.  

चहाच्या गाळणीमुळे कॅन्सरचा धोका वाढतो

प्लास्टीकच्या चहाची गाळणी ही खराब क्वालिटीच्या प्लास्टीकपासून बनलेली असते. इतकंच नाही तर  चहा गाळताना अनेकदा त्यातील कण वितळतात. खराब प्लास्टीकपासून बनलेली गाळणी जेव्हा गरम चहात घातली जाते तेव्हा यातील धोकादायक केमिकल्स आणि हजारो मायक्रोप्लास्टीक वितळून चहात येतात.

चहाची गाळणी कशी स्वच्छ ठेवावी?

बरेच लोक चहाची गाळणी व्यवस्थित साफ करत नाही ज्यामुळे  घाण जमा होते. हे प्लास्टीक फक्त शरीरातच जात नाही तर यामुळे घाणही पसरते आणि आजारांचा धोका वाढतो. गरम पाणी आणि ब्रशचा वापर  करा. गरम पाण्यात काही मिनिटं ब्रश भिजवून नंतर गाळणीचे छिद्र स्वच्छ करून घ्या नंतर पाण्यानं स्वच्छ धुवा.

एक कप गरम पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा आणि १ ते २ चमचे व्हिनेगर मिसळा. ही गाळणी १५ ते २० मिनिटं बुडवून ठेवा. नंतर ब्रश हलका रगडून गाळणी धुवून घ्या. ज्यामुळे हट्टी डाग निघून जाण्यास मदत होईल. गाळणीवर लिंबाचा रस लावा आणि हलकं मीठ शिंपडा काही मिनिटं तसंच सोडून द्या. नंतर ब्रशने साफ करा आणि थंड पाण्यानं धुवून सुकवा. 

प्लास्टीकच्या चहाच्या गाळणीचा वापर कसा करावा?

प्लास्टीकच्या चहाची गाळणी स्वस्त असते पण ही जास्त दिवस टिकत नाही आणि त्यावर डाग लागतात. त्याऐवजी तुम्ही स्टेनलेस स्टिल आणि सिल्वर ब्रासची चहाची गाळणी वापरू शकता. यासाठी तुम्ही टी बॉलचा वापरही करू शकता. संशोधकांच्या मते जास्तीत जास्त टी बॅग्समध्ये २५ टक्के प्लास्टीक असते. गरम खाल्ल्यानं किंवा पेय पदार्थांसह प्लास्टीकची भांडी वापरणं नुकसानकारक ठरतं.  टि बॅग्समध्ये प्लास्टीक पॉलिमर मिसळले जाते. ज्याला पॉलिप्रोपाइलिन असं म्हणतात. प्लास्टीक असल्यामळे टी बॅग पूर्णपणे सडत नाही.

Web Title: Tea Strainer Can Cause Cancer According To Study And How To Clean Strainer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.