Join us   

व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे दात कमकुवत झालेत? 'अशी' घ्या दातांची काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2022 1:33 PM

Tooth Care Vitamins Deficiency अनेकांमध्ये दातांच्या निगडीत समस्या वाढत चालल्या आहे. खूपच कमी वयात दातांच्या समस्या उद्भवत आहेत. आजच करा जीवनशैलीत बदल

सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना स्वतःकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. अनेकांमध्ये दातांच्या निगडित समस्या वाढत चालले आहे. खूपच कमी वयात दातांच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे दातांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. पण कोणत्या कारणांमुळे दातांच्या समस्या उद्भवतात हे बऱ्याच लोकांना कळुन येत नाही. जर आपल्या हिरड्या कमकुवत झाल्या असतील. हिरड्या दुखत असतील किंवा त्यांना सूज आली असेल, तर समजा शरीरात पोषक तत्वांची कमतरता आहे. दातांच्या समस्या हे जीवनसत्व ए, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी याच्या कमतरतेमुळे उद्भवतात. त्यामुळे आहारात बदल करुन तुम्ही ती कमतरता दूर करु शकतात.

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी मुळे केस आणि त्वचा चांगली तर राहतेच, पण ते दातांसाठीही खूप महत्त्वाचे आहे. दातांमध्ये बॅक्टेरियाचे संक्रमण रोखण्याचे काम व्हिटॅमिन सी करते. आपण टोमॅटो, संत्री, ब्रोकोली, सफरचंद आणि मोसंबी खावून व्हिटामिन सीचे जीवनसत्वे मिळवू शकतात. आणि दातांना मजबूत करण्यास देखील मदत करतात.

व्हिटॅमिन डी

दातांसाठी व्हिटॅमिन डी खूप महत्त्वाचे आहे. कारण ते दात निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच कॅल्शियम शोषण्यास मदत करते. त्यामुळे दररोज सकाळी 20 मिनिटे सूर्यप्रकाशात घालवणे आवश्यक आहे. दातांसह आपल्या शरीराला देखील सूर्यकिरण महत्तवाचे आहे.

व्हिटॅमिन बी

दातांच्या आरोग्यासाठी आणखी एक महत्त्वाचे व्हिटॅमिन म्हणजे बी12. आहारात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन अधिक केले पाहिजे. यासह मशरूम व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्रोत देखील मानला जातो. त्यामुळे व्हिटॅमिन बीच्या निगडित असलेले सर्वच पदार्थांचे सेवन केले पाहिजे.

व्हिटॅमिन ए

व्हिटॅमिन ए हे जीवनसत्त्व आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. या जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी दूध, गाजर, पिवळ्या किंवा केशरी भाज्या, पालक, रताळे, पपई, दही, सोयाबीन आणि इतर पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. दातांसाठी खूप किफायतशीर ठरेल.

मॅग्नेशियम आणि झिंक

दातांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम बहुतेकदा मुख्य घटक मानले जाते. ज्यात मॅग्नेशियम, सेलेनियम आणि झिंक यांचाही महत्त्वाचा सहभाग असतो. या खनिजांमध्ये विषाणूविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे दातांचे संरक्षण होते.

टॅग्स : होम रेमेडीहेल्थ टिप्सलाइफस्टाइल