Join us   

रोज स्वच्छ घासूनही दात पिवळट, खराब दिसतात? ५ उपाय, दात दिसतील पांढरेशुभ्र, चमकदार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 9:54 AM

Teeth Whitening Remedies : काही लोक तक्रार करतात की ते दररोज ब्रश करतात, तरीही त्यांचे दात पांढरे होत नाहीत आणि श्वासाची दुर्गंधी कमी होत नाही.

दात पिवळे पडणे, श्वासाची दुर्गंधी, हिरड्या कमकुवत होणे, थंड किंवा गरम काहीही खाल्ल्यानंतर संवेदनशीलता जाणवणे इत्यादी तोंडाशी संबंधित समस्या आहेत, ज्याचा सामना सामान्य जीवनात जवळजवळ सर्वच लोकांना करावा लागतो. (Teeth Whitening Remedies)खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि तोंडाच्या स्वच्छतेची काळजी न घेणे ही यामागची सर्वात मोठी कारणे आहेत. (Ayurveda doctor dixa bhavsar share 5 effective ayurvedic tips for teeth whitening at home)

काही लोक तक्रार करतात की ते दररोज ब्रश करतात, तरीही त्यांचे दात पांढरे होत नाहीत आणि श्वासाची दुर्गंधी कमी होत नाही. दात आणि हिरड्यांच्या समस्यांवर अनेक वैद्यकीय उपचार आहेत, परंतु काही घरगुती उपायांनीही तुम्हाला आराम मिळू शकतो.

हाडांना भरपूर कॅल्शियम देतात रोजच्या आहारातले ६ पदार्थ; नियमित खा, ठणकणार नाहीत हाडं

आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सांगतात की, जर तुम्ही बेकिंग सोडा, लिंबू, मीठ, संत्र्याची साल, केळ्याची साल यासारख्या गोष्टी वापरून कंटाळला असाल तर तुम्ही काही वेगळ्या आयुर्वेदिक पद्धती वापरून पाहू शकता. 

७ आजारांना लांब ठेवते 'ही' स्वस्तात मस्त भाजी; पोटाचे त्रास तर कायम राहतील लांब

डॉक्टरांनी सांगितले की कोणताही उपाय हळूहळू कार्य करतात, म्हणून तुम्ही  धीर धरा. खाली नमूद केलेले उपाय रातोरात चमत्कार करू शकत नाहीत. हे उपाय सातत्यानं केल्यान दातांचे आरोग्य चांगले राहील त्याचबरोबर दातांचा पिवळटपणाही जाईल.

ऑईल पुलिंग

ऑईल पुलिंग तंत्र हिरड्या आणि दातांमधून जंतू काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे तोंडाचे व्रण कमी होण्यास मदत होते. हे तोंडाच्या स्नायूंचा व्यायाम देखील करते, त्यांना मजबूत आणि टोन्ड बनवते. यासाठी तीळ/मोहरी किंवा खोबरेल तेल वापरा. 15-20 मिनिटे तोंडात फिरवा आणि थुंकून बाहेर फेका.

स्क्रॅपिंग

ओरल कॅविटी स्वच्छ करण्याचा आणि बॅक्टेरियाच्या वाढीस कारणीभूत असलेले सर्व विष काढून टाकण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. हे करण्यासाठी, तांबे किंवा स्टेनलेस स्टीलच्या जीभ स्क्रॅपरने तुमची जीभ अनेक वेळा स्क्रॅप करा.

कडूलिंब आणि बाभळाच्या काड्या

दात घासण्यासाठी कडुलिंब आणि बाभळीच्या फांद्या वापरा. या औषधी वनस्पती सूक्ष्मजीवविरोधी असतात. ते चघळल्याने अँटी-बॅक्टेरियल घटक बाहेर पडतात जे तोंडाचे आरोग्य राखण्यास मदत करतात. यासाठी तुमच्या करंगळीएवढी जाड डहाळी निवडा. एका कोपऱ्यावर चावा आणि थोड्या अंतराने लाळ बेसिनमध्ये थुंका. हे सर्व हिरड्या आणि दातांवर घासून घ्या. दातांना चिकटलेल्या फांदीचे तंतू थुंकून टाका.

हर्बल टीने गुळण्या करा

गुळण्या करण्यासाठी तुम्ही हर्बल टी वापरू शकता.  हे तोंडाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे, तसेच तोंडाचे व्रण कमी करण्यास मदत करते. यासाठी त्रिफळा किंवा यष्टिमधू पाण्यात अर्धे होईपर्यंत उकळा. थंड होऊ द्या. कोमट झाल्यावर स्वच्छ धुवा.

रोज दोनवेळा ब्रश करा

जेवल्यानंतर प्रत्येक वेळी ब्रश करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः चॉकलेटसारखे चिकट पदार्थ खाल्ल्यानंतर. दिवसातून ४-५ वेळा दात घास. अशक्य असल्याने दोनदा दात घासवे हा सर्वोत्तम उपाय आहे.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य