तोंडाशी संबंधित समस्या जसे दात पिवळे पडणे, श्वासाची दुर्गंधी येणे, हिरड्यांतून रक्त येणे, दात कमकुवत होणे अशा समस्या सामान्य झाल्या आहेत. अनेकदा असे दिसून येते की लोक तोंडाच्या स्वच्छतेची फारशी काळजी घेत नाहीत आणि त्यामुळेच त्यांना अशा समस्यांना सामोरे जावे लागते. (Teeth Whitening Tips) डॉ. विमल अरोरा यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. (मुख्य क्लिनिकल ऑफिसर, क्लोव्ह डेंटल केअर)
तोंडाची स्वच्छता राखणे प्रत्येकासाठी आणि सर्व वयोगटासाठी आवश्यक आहे. यामुळे एकूण आरोग्य सुधारते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि तोंडाच्या आरोग्याकडे लक्ष न दिल्याने आजकाल अनेक लोक दात आणि हिरड्यांशी संबंधित आजारांनी त्रस्त आहेत. (Clove dental care chief clinical officer vimal arora share 5 dental care tips to get sparkling healthy teeth)
साहजिकच, तोंडाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या केवळ तुमच्या आरोग्यासाठीच हानिकारक ठरत नाही तर चारचौघात अवघडल्याप्रमाणेही वाटतं. डॉक्टरांनी खाली काही उपाय सांगितले आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचे दात पांढरे आणि मजबूत बनवू शकता.
रोज व्यवस्थित ब्रश करा
दिवसातून दोनदा दात घासणे हा प्लाक आणि बॅक्टेरिया काढून टाकण्याचा आणि दात स्वच्छ ठेवण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. लोकांनी दात घासताना योग्य तंत्राचा वापर केला तरच ब्रशिंग प्रभावी ठरू शकते. म्हणूनच रोज काहीही खाल्ल्यानंतर दात खासा.
दिवसातून एकदातरी फ्लॉसिंग करा
कधीकधी दातांमध्ये प्लेक आणि बॅक्टेरिया अडकतात आणि टूथब्रशही पोहोचू शकत नाही. या प्रकरणात, ते फ्लॉसिंग वापरून काढले जाऊ शकतात. हे दातांमध्ये अडकलेली घाण आणि अन्न साफ करण्यास आणि श्वासाची दुर्गंधी टाळण्यास देखील मदत करू शकते.
शरीरातले घातक पदार्थ बाहेर काढतील ५ उपाय; आजारांपासून चार हात लांब राहाल
रुटिन डेंटल चेकअप
दर सहा महिन्यांनी लोकांनी डेंटिस्टकडून तपासणी केली पाहिजे. तपासणीनंतर दात स्वच्छ होतील आणि टार्टर आणि प्लेकपासून आराम मिळेल. डेंटिस्ट तोंडाचा कर्करोग, हिरड्यांचे रोग, पोकळी अशी समस्यांचे उत्तर शोधून उपचार घेण्यास मदत करतात.
पांढरा भात खाण्याचे ३ फायदे-तोटे, तज्ज्ञ सांगतात भात खाल्ल्याशिवाय जेवणच पूर्ण होत नसेल तर...
खाण्यापिण्यवर लक्ष द्या
गोड किंवा आम्लयुक्त पदार्थ तुमचे दात खराब करतात आणि त्यामुळे ते टाळावे. चहा, कॉफी आणि वाईन या सर्व गोष्टी कालांतराने तुमचे दात काळे करतात. तुम्हाला तुमचे आवडते पदार्थ आणि पेये सोडण्याची गरज नाही. आपल्याला फक्त प्रत्येक जेवण किंवा पेय नंतर आपले तोंड पूर्णपणे धुवावे लागेल.
ओरल पिअर्सिंग करू नका
फॅशनसाठी काही लोक जीभेवर पिअर्सिंग करतात. ज्यांच्या जिभेला छिद्र असते, ते खाताना, झोपताना, बोलताना आणि चघळताना जीभ, दात दुखण्याचे कारण ठरू शकते. इतकंच नाही तर जखम वाढल्यास रूट कॅनाल किंवा दात काढावा लागू शकतो. तोंडावाटे टोचल्याने संसर्ग होण्याचा धोकाही असतो. तोंडाला बराच वेळ छिद्र राहिल्याने तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.