Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रक्तवाहिन्यांचे काम उत्तम चालावे म्हणून खा ५ सुपर फुड्स, रक्ताभिसरण होईल चांगले आणि शरीर धडधाकट

रक्तवाहिन्यांचे काम उत्तम चालावे म्हणून खा ५ सुपर फुड्स, रक्ताभिसरण होईल चांगले आणि शरीर धडधाकट

The 4 Best Foods to Increase Blood Flow and Circulation नसांना मजबूत बनवण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं खा ५ सुपरफुड्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2023 01:14 PM2023-03-08T13:14:19+5:302023-03-08T14:03:32+5:30

The 4 Best Foods to Increase Blood Flow and Circulation नसांना मजबूत बनवण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं खा ५ सुपरफुड्स..

The 4 Best Foods to Increase Blood Flow and Circulation | रक्तवाहिन्यांचे काम उत्तम चालावे म्हणून खा ५ सुपर फुड्स, रक्ताभिसरण होईल चांगले आणि शरीर धडधाकट

रक्तवाहिन्यांचे काम उत्तम चालावे म्हणून खा ५ सुपर फुड्स, रक्ताभिसरण होईल चांगले आणि शरीर धडधाकट

मानवी शरीर हे रक्तवाहिन्या आणि धमन्यांच्या एका जटील मार्गाने बनलेले आहे. यातूनच विविध अवयवांना रक्तपुरवठा होतो. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे रक्तवाहिन्याही निरोगी ठेवणं गरजेचं आहे. निरोगी रक्तवाहिन्या मऊ आणि लवचिक असतात, ज्यामुळे त्यातून रक्तपुरवठा सुरळीत होतो. नसांची योग्य काळजी न घेतल्यास त्यांच्या आत घाण साचू लागते. ज्यामुळे नसा कमकुवत होतात, अशा स्थितीत शरीर व  हृदयाच्या संबंधित आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण होते(The 4 Best Foods to Increase Blood Flow and Circulation).

कमकुवत नसांमुळे कोणत्या समस्या उद्भवतात

यासंदर्भात यूएसएमधील व्हॅन्स क्लिनिकचे डॉ. यान कात्सनेल्शन सांगतात, ''लोक सहसा नसांमधील कमकुवतपणाकडे दुर्लक्ष करतात. पण जर मज्जातंतूंमध्ये कमकुवतपणा असेल, तर शरीराच्या विवध भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचत नाही. ज्यामुळे खूप थकवा येतो आणि कोणतेही शारीरिक काम करण्याची ताकद उरत नाही. अशा स्थितीत रक्ताभिसरणाचा वेग कमी होतो. याने वेरिकोज वेंस, डीप वेन थ्रोबोफ्लेबिट्स, वेनस अल्सर, एरटेरियोवेनस फिस्टुला अशा नसांच्या निगडीत आजार उद्भवण्याची स्थिती निर्माण होते.''

ॲसिडिटी झाली? घरात धणे आहेत का? - चमचाभर धण्यांची जादू, अनेक आजारावर गुणकारी

नसा कमकुवत होऊ नये म्हणून, तज्ज्ञांच्या सल्ल्याने या गोष्टींचे सेवन करा

व्हिटॅमिन सी

नसांमधील कमकुवतपणा भरून काढण्यासाठी व्हिटॅमिन सीचे सेवन करा. यासाठी फ्लॉवर, कोबी, स्ट्रॉबेरी, अननस, पालेभाज्या, संत्री, भोपळी मिरची इत्यादींचे रोज सेवन करा.

व्हिटॅमिन ई

कमकुवत नसांना पुनरुज्जीवित करण्यासाठी व्हिटॅमिन ईचे सेवन करा. ज्यात काजू, बियाणे, एवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल, भोपळा, आंबा, या पदार्थांचे सेवन करा. यात व्हिटॅमिन ई पुरेशा प्रमाणात आढळते.

शुगर असणाऱ्या व्यक्तींनी रोज किती पाणी प्यायला हवे? कमी पाणी पिण्याचा शुगरचा त्रास वाढण्याशी असतो संबंध?

रुटीन फूड

रुटीन फूडमध्ये भरपूर प्रमाणात फ्लेव्हॅनॉइड्स असतात. बेरी, तृणधान्य, सफरचंदाची साल, शतावरी, ग्रीन टी, लिंबूवर्गीय फळ इत्यादींमध्ये भरपूर फ्लेव्होनॉइड्स आढळतात.

चिया सिड्स खाऊन खरंच वजन कमी होते? ते भिजवून खावे की भाजून? - नक्की खरे काय..

फायबर

फायबर केवळ पचनासाठीच नाही तर, मज्जातंतूंमध्ये उर्जा निर्माण करण्यासाठी मदत करते. यासाठी ओटमील, ब्राऊन राईस, हिरव्या पालेभाज्या, फ्लॉवर, एवोकॅडो, चियासीड्स, मसूर इत्यादी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे.

Web Title: The 4 Best Foods to Increase Blood Flow and Circulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.