Join us   

५ पदार्थ खा, रात्री झोप येत नाही ही तक्रारच संपून जाईल ! लागेल गाढ झोप रोज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2023 5:47 PM

5 Best Food For Better sleep According To Dietitians : रात्री झोप येत नाही, झोप लागली तर जाग येते अशी तक्रार असेल तर हे ५ पदार्थ खा

आपल्यापैकी बऱ्याचजणांना रात्री लवकर झोप न येण्याची समस्या सतावते. रात्रीची झोप ही अतिशय महत्वाची असते. रात्री झोप लवकर येत नाही यामुळे  सकाळी लवकर उठणे देखील कठीण होते. जर आपली रात्री व्यवस्थित झोप नाही झाली  तर आपला येणारा दिवस खराब जातो. रात्री झोप न येणे ही एक त्रासदायक समस्या आहेच याचबरोबर, झोप न येण्याच्या समस्येमुळे वेगवेगळे आजार देखील उद्भवू शकतात. अपुऱ्या झोपेमुळे डोकेदुखी, चिडचिड होणे, लक्ष्य विचलित होणे असे परिणाम शरीरावर दिसू लागतात. या सर्वांचा आपल्या कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होतात. अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकारांनाही आयते आमंत्रण मिळते. पुरेशा प्रमाणात झोप छान झाली की संपूर्ण दिवसही एकदम मस्त जातो. किमान सात ते आठ तासांची झोप मिळावी. 

शरीर निरोगी ठेवण्यासाठी चांगली झोप सर्वात आवश्यक आहे. पुरेशी झोप न मिळाल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. चांगल्या पोषणाबरोबरच पुरेशी झोप देखील महत्त्वाची आहे. काही लोकांना बिछान्यावर पडताच झोप येते तर काहींना तासंतास झोपच येत नाही. या झोपेच्या समस्येवर काहीतरी उपाय म्हणून आपण झोपेच्या गोळ्या घेतो परंतु हे चुकीचे आहे. याउलट काही घरगुती पदार्थांचा वापर करुन आपण नैसर्गिकरित्या झोप आणण्यास मदत करु शकतो. लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या आहारतज्ज्ञ काजल तिवारी यांनी रात्रीच्या झोपेची समस्या कायमची दूर करण्यासाठी आहारात काही खास गोष्टींचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे(The 5 Absolute Best Foods to Eat For Better Sleep).

रात्रीची चांगली गाढ झोप येण्यासाठी काही घरगुती उपाय :- 

१. कोमट दूध :- कोमट दूध आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. बहुतेजण रात्री झोपण्यापूर्वी न चुकता कोमट दूध पिणे पसंत करतात. कोमट दूध प्यायल्याने शरीराला आराम मिळतो, त्यामुळे अस्वस्थता दूर होते आणि झोप चांगली लागते. दुधात ट्रिप्टोफॅन आणि मेलाटोनिन सारख्या घटकांमुळे असे घडते. रात्री झोपण्यापूर्वी १ कप कोमट दूध प्यायल्याने ते आरोग्यास अधिक फायदेशीर ठरते. 

मासिक पाळीच्या ४ दिवसात आंघोळ करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची ? आरोग्य आणि हायजिन सांभाळा...

२. अक्रोड :- चांगली झोप येण्यासाठी अक्रोड खाणे अधिक प्रभावी मानले जाते. अक्रोड सारख्या नट्सला मेलाटोनिनचा चांगला स्रोत मानले जाते. या नट्समध्ये फॅटी अ‍ॅसिड देखील असते, जे आपल्याला चांगली झोप येण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, त्यात अल्फा लिनोलेनिक अ‍ॅसिड असते जे ओमेगा -३ फॅटी ऍसिडचा एक प्रकार आहे. हे शरीरात डीएचएमध्ये बदलते आणि चांगली झोप आणण्यास मदत करते.

ब्लॅक कॉफी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का ? ब्लॅक कॉफी कधी आणि कशी प्यावी, पाहा खास टिप्स...

३. केळी :- केळी आरोग्यासाठी जितकी फायदेशीर आहे तितकीच चांगली झोप येण्यासही मदत करतात. केळ्यांमध्ये मॅग्नेशियम, ट्रिप्टोफॅन, व्हिटॅमिन बी-६, कार्ब्स आणि पोटॅशियम यांसारख्या घटकांचा खजिना मानला जातो. केळ्यामध्ये असलेले हे सर्व घटक चांगली झोप येण्यास मदत करतात. 

वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

४. भोपळ्याच्या बिया :-निद्रानाशाच्या बाबतीत भाजलेल्या भोपळ्याच्या बियादेखील खूप प्रभावी मानल्या जातात. भोपळ्याच्‍या बिया ट्रिप्टोफॅनचा चांगला स्रोत आहेत. याशिवाय जस्त, तांबे आणि सेलेनियम सारखे पौष्टिक घटकही भोपळ्याच्या बियांमध्ये आढळतात. हे सर्व घटक शांतपणे झोपण्यास मदत करतात. भाजलेल्या भोपळ्याच्या बिया यांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास रात्रीची गाढ झोप लागण्यास मदत होते. 

५. बदाम :- बदामामध्येही भरपूर मॅग्नेशियम असते. त्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते आणि स्नायूंचा ताणही कमी होतो. बदाम खाल्ल्याने शांत झोप लागते.  

 चांगल्या झोपेसाठी इतर काही टिप्स :- 

१. चांगली झोप येण्यासाठी रात्री डोक्यावर आणि तळव्यांना मोहरीच्या तेलाची मालिश करा. २. झोपण्यापूर्वी हातपाय धुवून पलंग स्वच्छ करा. ३. झोपण्यापूर्वी पुस्तक वाचा किंवा गाणी ऐका. यामुळे आपल्याला चांगली झोप लागेल. ४. झोपण्यापूर्वी मन शांत करा आणि सकारात्मक विचार करा.  ५. रात्री झोपण्यापूर्वी थोडा वेळ चालावे.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स