आपल्या शरीरात प्रत्येक अवयव महत्वाचे आहे. त्यात किडनी देखील आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे. किडनी आपल्या शरीरात फिल्टर म्हणून काम करते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास किडनी मदत करते. किडनीची काळजी न घेतल्यास ती निकामी होण्याची शक्यता वाढते. आहारातील काही पदार्थांमुळे किडनी खराब होऊ शकते. ज्यामुळे किडनी स्टोन, थकवा, पोटदुखी, डोकेदुखी, सूज इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. जर किडनीचा त्रास होऊ नये असे वाटत असले तर, वेळीच आपल्या आहारात ५ भाज्यांचा समावेश करा(The 5 Best Foods for People with Kidney Disease).
यासंदर्भात आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल सांगतात, 'किडनी निरोगी, मजबूत आणि स्वच्छ ठेवण्यासाठी खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. काही विशिष्ट भाज्या खाल्ल्याने किडनी निरोगी राहते.'
सिमला मिरची
सिमला मिरची किडनीसाठी फायदेशीर ठरते. हे व्हिटॅमिन सीचे उत्तम स्त्रोत मानले जाते. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध सिमला मिरची खाल्ल्याने किडनीचे आरोग्य निरोगी राहते.
पचनाचे त्रास-पोटदुखीचा वैताग नको तर जेवण झाल्यावर हमखास होणाऱ्या ५ चुका टाळा
पालक
पालकामध्ये फायबर, फोलेट आणि आयर्न असते, जे किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. आहारात पालकाचा समावेश केल्याने रक्ताच्या शुद्धीकरणास प्रोत्साहन मिळते. ज्यामुळे किडनी स्टोनसारखा आजार होत नाही.
गाजर
गाजर व्हिटॅमिन ए ने समृद्ध आहे. जे किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आहारात गाजराचा समावेश केल्याने किडनी निरोगी राहण्यास मदत होते.
रोज पोळ्या करताना गव्हाच्या पिठात मिसळा १ गोष्ट चमचाभर, वजनच काय शुगरही होईल कमी
टोमॅटो
टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते, जे किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आहारात टोमॅटोचा समावेश केल्याने किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो. यासह ऍसिड बेसचे प्रमाण नियंत्रित करते.
लाल मिरची
लाल मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, व्हिटॅमिन बी ६ आणि फायबर आढळते. यासह शरीरातील उर्जा वाढवण्यास मदत होते. लाल मिरचीमध्ये लाइकोपीन देखील असते. जे एक अँटिऑक्सिडेंट आहे. ज्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारते.