Join us   

डॉक्टर नेने सांगतात उत्तम आरोग्यासाठी फॉलो करा ५ गोल्डन रुल्स, मधुमेह-लठ्ठपणाचा होणार नाही त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2023 5:10 PM

The 5 Essentials To Better Health | Dr Shriram Nene : साठीपर्यंत कोणतेही आजार स्पर्श करणार नाही, फक्त डॉक्टर नेनेंनी सांगितलेल्या ५ गोष्टी नियमित पाळा..

धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit) पती श्री राम नेने (Shree Ram Nene) हे व्यवसायाने कार्डियाक आणि व्हॅस्कुलर सर्जन आहेत. शिवाय सोशल मीडियातही तितकेच अॅक्टिव्ह असतात. निरोगी आयुष्य जगण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करणं गरजेचं आहे, याची माहिती ते व्हिडिओद्वारे देत असतात. ते नियमित व्यायाम, सकस आहार, मेडीटेशन करतात (Lifestyle Habits). पन्नाशी गाठल्यानंतरही ते चिरतरुण दिसतात.

जर आपल्यालाही कायम फिट आणि हेल्दी राहायचं असेल तर, जीवनशैलीत काही बदल करणं गरजेचं आहे. पण धावपळीच्या या जीवनात अनेकांना स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. ज्यामुळे शारीरिकसह मानसिक आरोग्यावरही (Health Care) परिणाम होतो. नुकतंच डॉक्टर नेने यांनी व्हिडिओद्वारे ५ टिप्स शेअर केले आहेत. ते फॉलो केल्याने आपले आरोग्य सुधारू शकते(The 5 Essentials To Better Health | Dr Shriram Nene).

उत्तम आरोग्यासाठी फॉलो करा ५ टिप्स

संतुलित आहार घ्या

धावपळीच्या या जीवनात अनेकांना संतुलित आहाराचे सेवन करायला वेळ मिळत नाही. त्याऐवजी बरेच लोकं अरबट-चरबट खाणं पसंद करतात. पण हे आरोग्याच्या दृष्टीने घातक मानले जाते. आपल्या आहारात प्रोटीन, गुड फॅट्स, कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि खनिजे  या पौष्टीक घटकांचा समावेश करा. नियमित सकस आहार खाल्ल्याने कर्करोग, बीपी आणि मधुमेह सारखे आजार होणार नाहीत.

सकाळी चुकूनही खाऊ नका ६ पदार्थ, शरीराच्या अनेक अवयवांना होईल त्रास, वजन-कोलेस्टेरॉलही वाढेल झपाट्याने

प्या भरपूर पाणी

पाणी प्यायल्याने वजन कण्ट्रोलमध्ये राहते. पाण्यामुळे पचनसंस्था सुधारते, शिवाय खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचते. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील घाण निघून त्वचा चमकदार होते. महिलांनी दररोज २.७ लिटर पाणी प्यावे तर, पुरुषांनी ३.७ लिटर पाणी प्यावे.

वर्कआउट करा

अनेकदा अरबट चरबट खाल्ल्याने वजन वाढते, ज्यामुळे इतर गंभीर आजारही निर्माण होतात. त्यामुळे नियमित व्यायाम करायला हवा. नियमित व्यायाम केल्याने वजन तर कमी होतेच, शिवाय एनर्जी बुस्ट होते. त्यामुळे नियमित एक तास व्यायाम करणं गरजेचं आहे.

लोखंडी भांड्यात चुकूनही शिजवू नका ४ पदार्थ, मधुमेहासह ३ गंभीर आजार होण्याचा धोका अधिक-बिघडेल तब्येत

आराम हवाच

उत्तम आरोग्यासाठी झोप हवीच. झोप पूर्ण झाल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. मात्र, झोपेच्या कमतरतेमुळे तणाव, एकाग्रता कमी होणे आणि आरोग्याच्या निगडीत विविध समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नियमित ८ तासांची झोप घ्या. यामुळे शरीरात उर्जा आणि कार्यक्षमता सुधारण्यास मदत होईल.

मेडीटेशन करा

आजकाल बरेच जण तणावग्रस्त जीवन जगत आहेत. अनेक जणांना स्ट्रेस आहेच. स्ट्रेसचा नकारात्मक परिणाम थेट आरोग्यावर होतो. त्यामुळे स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडीटेशन किंवा योग करा. नियमित मेडीटेशन केल्याने हृदय उत्तमरित्या कार्य करते, शिवाय मानसिक आरोग्यही सुधारते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य